पॅलेस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी-सुआद, परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते. पुरुषसत्ताक व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या घरात तिच्या उमलत्या भावनांना अक्षरश: पायदळी तुडवले जाते. तिचा मित्र लग्नाचे वचन देऊन तिला फसवतो. तिच्यामुळे घराण्याची अब्रू चव्हाटय़ावर येईल, या भीतीने घरातील कर्त्यां पुरुषाकडून तिला जिवंत पेटवून दिले जाते. पोटात चार महिन्यांचा गर्भ असताना, अग्नीच्या ज्वालांच्या लपेटय़ात अडकलेली सुआद, तिची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. ऑनर कििलगच्या या घटनेमुळे उन्मळून पडलेली सुआद केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचते. जॅकलिन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या
सुआद तिची शोकांतिका मांडते आहे, अशा प्रथमपुरुषी स्वरातून पुस्तकाची सुरुवात होते आणि अगदी सहज, सोप्या भाषेत तिच्या पॅलेस्टिनी घराचे, गावाचे, तिथल्या समाजाचे चित्र आपल्यापुढे उभे राहते. भूतकाळातील तपशील, घटनांची सुसंगती लावण्यात गोंधळात पडलेली सुआद, तिची ही केविलवाणी मन:स्थिती पाहिल्यावर या आठवणी तिच्यासाठी इतक्या वर्षांनंतरही किती नकोशा, जीवघेण्या आहेत याची खात्री पटते.
नूरा, कैनात, सुआद आणि.. तिच्या चौथ्या बहिणीने नाव काही केल्या तिला लक्षात येत नाही. काही प्रसंग सोडले तर तिला तिच्याविषयी काहीच आठवत नाही. तिच्या घरातला अंधार, मुलींनी पायघोळ, गळाबंद करडय़ा वा मळकट रंगाचे झगे घालावे हा वेष, मुलींसाठी शिक्षण निषिद्ध. परक्या पुरुषाशी सोडाच अनोळखी स्त्रीशीसुद्धा संभाषण करायचे नाही हा शिरस्ता, दिवसभर कष्ट करून, राबूनही मुलींपेक्षा घरातील शेळ्या-मेंढय़ांची पत जास्त चांगली अशा मताचे वडील व हिसंक वृत्तीचा तिचा भाऊ या वर्णनामुळे तत्कालीन पुरुषसत्ताक व्यवस्थेचे चित्र आपल्यासमोर स्पष्ट होते. सुआदच्या आईला एकूण १४ मुले झाली. मात्र त्यातली ५ जगली, मात्र उरलेल्यांना जन्माला आल्या आल्या आईनेच अंथरुणात लपेटून संपवून टाकले होते. मुली जन्माला आल्या तर त्यांचे काय करायचे, हा धडा इथूनच तिच्या मोठय़ा बहिणीला मिळाल्याचे सुआद म्हणते. बाहेरख्याली मुलीला ‘चारमुटा’ म्हणत व त्यांच्या या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांना जिवे मारले जाई, याचीच तर सुआद साक्षीदार होती.
जॅकलिन ही कार्यकर्ती, कर्तव्यभावनेपेक्षा माणुसकीच्या दृष्टीने सुआदला व तिच्या बाळाला वाचवते. तिला युरोपात घेऊन जाते. नव्याने आयुष्य जगण्यासाठी सुआदला किती मानसिक व शारीरिक दिव्यातून जावं लागलं. तिच्या मुलाशी तिचे विभक्त होणे, नव्याने प्रेमात पडून संसार थाटणे, दोन कन्या रत्नांच्या प्राप्तीनंतर, आपली कहाणी जगासमोर मांडायला तयार झालेली सुआद, इतक्या वळणांवर असहाय, केविलवाणी झालेली दिसते की आता ही संपलीच असे वाटत असताना नवऱ्याच्या, मुलींच्या व आप्तेष्टांच्या प्रेमामुळे/ पािठब्यामुळे ती पुन्हा उभी राहते. मुलगा मारूआनचा तिच्या आयुष्यात झालेला पुनप्र्रवेश तिला पूर्णत्वाकडे घेऊन जातो.
मात्र या सगळ्यात सुआदचा एक गुण अधोरेखित करावा असा वाटतो, घोर अन्यायाला सामोरी गेल्यावरही तिच्यातील माणुसकी संपत नाही. तिच्या आठ आणि दहा वर्षांच्या मुलींना ती तिच्या भूतकाळाबद्दल अत्यंत संवेदनशीलपणे माहिती देते, त्यांना कळेल, समजेल अशा स्वरूपात तिच्या जखमांची ओळख करून देते. पण मुलींनी, तिच्यावरच्या अन्यायाचा सूड उगवावा असा तिचा सूर नाही. मुलींनी सगळ्याच अरबी पुरुषांचा तिरस्कार करावा असे तिला वाटत नाही. हा तिचा समजूतदारपणा कौतुकास्पद आहे.
सुआदच्या धैर्याची, दुर्दम्य इच्छाशक्तीची, जगण्याच्या चिवट महत्त्वाकांक्षेची व पॅलेस्टिनी भूमीतील स्त्रियांच्या जगण्याच्या आलेखाची कल्पना येण्यासाठी ..तरीही जिवंत मी हे पुस्तक वाचावयास हवे. एकूण ३९ भाषांमध्ये अनुवादित झालेली ही कहाणी अत्यंत प्रेरक आहे.
..तरीही जिवंत मी
मूळ लेखिका- सुआद,
अनुवाद : गौरी देशपांडे, मेहता पब्लिशिंग हाऊस,
पृष्ठे- २०२, मूल्य- २५० रु.
पुस्तकाचं पान -फिनिक्स भरारी
पॅलेस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी-सुआद, परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-01-2015 at 01:17 IST
मराठीतील सर्व पुस्तकाचं पान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review