मराठीमध्ये सापडणे हे क्रियापद कितीतरी प्रकारे वापरले जाते. आपण मराठी माणसं कात्रीत सापडतो, आपल्याला दुवा सापडतो, आपल्याला हुकमाचा एक्का सापडतो..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज सकाळी नाश्ता घेत असताना मित्राचा मुलाच्या मुंजीप्रीत्यर्थ आमंत्रण देण्यासाठी फोन आला. मी त्याला म्हटले, ‘‘मित्रा, चांगलाच कात्रीत सापडलो बघ! तुझे आमंत्रण पण चुकविता येत नाही व ऑफिसदेखील. मी मुहूर्ताच्या अक्षता टाकून लगेच पळेन.’’ मित्र राजी झाला. मी फोन ठेवला. पद्मजाला म्हटले, ‘‘चल मुंजीला. बघ तरी कशी मजा येते ते.’’ त्यावर पद्मजा म्हणाली, ‘‘मला घेऊन जाण्यापेक्षा, काका तू आता कात्रीत सापडणे असे काही तरी म्हणालास, त्याचा अर्थ काय ते सांग.’ मी म्हटले, ‘कात्रीत सापडणे म्हणजे दोन परस्परविरोधी गोष्टींमध्ये अडकणे, ज्यामुळे दोन्ही गोष्टींवर समाधानकारक उपाय मिळणे कठीण होऊन बसणे.’
मी टीव्ही चालू केला. खेळांविषयी बातम्या होत्या. सायना नेहवालला अजून लय सापडत नसल्याने तिची पराभवांची मालिका चालूच आहे, असा मथळा होता. मी पद्मजाला म्हटले लय सापडणे म्हणजे to get momentum for winning.
खेळांच्या बातम्यांनंतर भविष्यविषयक कार्यक्रम चालू झाला. त्यात निवेदक म्हणत होता की प्रतिकूल ग्रहमानात यशाचा मार्ग सापडणे फार कठीण होते. त्यावर पद्मजा पटकन म्हणाली, ‘‘आता काका मार्ग सापडणे म्हणजे काय?’’
मी म्हटले, ‘‘याचे दोन अर्थ होतात. एक शब्दश: व दुसरा, जो इथे होईल. मार्ग सापडणे म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन सापडणे व शब्दश: अर्थ होईल अनोळखी ठिकाणी वाट चुकलेल्या माणसाला योग्य तो रस्ता मिळणे.’’
टीव्ही बंद करून मी वर्तमानपत्र चाळायला घेतले. त्यात बलात्कार करून फरारी झालेले आरोपी अजून तावडीत सापडत नसल्याची बातमी होती. मी लगेच पद्मजाला डायरी उघडण्याचा इशारा केला. तावडीत सापडणे म्हणजे ताब्यात येणे असे त्यात तिला लिहून घ्यायला सांगितले.
एवढय़ात नूपुर म्हणाली, ‘‘ताई मी अजून एक अर्थ सांगते. बरेचदा बँकेमध्ये आíथक गरव्यवहार होतात, अशा वेळी छोटे गुन्हेगार जाळ्यात सापडतात, पण त्याच वेळी मुख्य सूत्रधार कायद्याच्या कचाटय़ात सापडतातच असे नाही. याला कारण म्हणजे छोटय़ा गुन्हेगार व मुख्य सूत्रधारामध्ये असलेला महत्त्वाचा दुवाच कित्येकदा पोलिसांना सापडत नाही. दुवा सापडणे म्हणजे मिसिंग िलक मिळणे.’’ जाळ्यात सापडणे, कचाटय़ात सापडणे हे दोन्ही अर्थ तावडीत सापडणे याच्याशी मिळतेजुळते आहेत असे पुढे सांगायलादेखील ती विसरली नाही.
मी पुढची बातमी वाचायला घेतली त्यात पुरातत्त्व खात्याला उत्खननामध्ये प्राचीन शिलालेख सापडले असे लिहिले होते. सापडणे म्हणजे गहाळ झालेली एखादी वस्तू परत मिळणे किंवा एखादी नवीन गोष्ट सर्वप्रथम आढळणे असा अजून एक अर्थ मी माझ्या शिष्येला सांगितला.
ऑफिसची जाण्यापूर्वी मी पद्मजाला गृहपाठ दिला.. घबाड सापडणे व शब्द न सापडणे.
मी वेळेवर सर्व काही आटोपून ऑफिसला पोहोचलो. पण ठाण्यासाइड वरून येणारे माझे सहकारी मात्र ऑफिसला अजून पोहोचले नव्हते. त्यांना यायला एक तास उशीर झाला. शाळेला जाणारा एक विद्यार्थी हायवे ओलांडत असताना धावत्या ट्रकखाली सापडला त्यामुळे जमाव चिडला व त्याने हायवे रोखून धरला. हे त्यांच्या उशिरा येण्यामागचे कारण होते. त्या मुलाबद्दल हळहळ व्यक्त करत असतानाच धावत्या ट्रकखाली सापडणे म्हणजे टू मीट विथ अॅन अॅक्सिडेंट असा एक अर्थ मी पद्मजासाठी लिहून ठेवला.
ऑफिसमध्ये मला दगडाखाली हात सापडणे हा वाक्प्रचारही आठवला होता, पण तो अर्थ, हात हा शब्द शिकवताना पद्मजाला सांगूया असा विचार मी स्वत:च्या मनाशी केला.
ऑफिसच्या आजच्या मीटिंगमध्ये आमच्या सेल्स हेडने घोषणा केली की नवीन प्रोडक्टच्या माध्यमातून कंपनीच्या हाती हुकमाचा पत्ता सापडला आहे; ज्यायोगे प्रतिस्पर्धी कंपनीवर कुरघोडी करणे सहज शक्य होणार आहे. हुकमाचा पत्ता सापडणे म्हणजे हमखास यश देणारा व वरचढ होण्याचा उपाय हाती लागणे असा अर्थ पद्मजासाठी मी लगेच एका चिठ्ठीवर लिहून ठेवला.
सेल्स मीटिंगमधून काढता पाय घेऊन, शब्द दिल्याप्रमाणे मी मित्राच्या मुलाच्या मुंजीला पोहोचलो, पण तिथे जेवणाचा आग्रह झाल्याने थांबावेच लागले. गोडाचे जेवण अंगावर आल्याने मग मी घरीच जायचे गेलो.
नित्यनेमाप्रमाणे पद्मजाने संध्याकाळचा चहा व नाश्ता देत देत मला तिचा गृहपाठ सांगितला. घबाड सापडणे म्हणजे खूप मोठा धनलाभ होणे व शब्द न सापडणे म्हणजे खूप आनंद, दु:ख किंवा आश्चर्य वाटल्यावर भावना व्यक्त करायला योग्य ते शब्द न सुचणे. मी म्हटले होप, पद्मजा आता तू गृहपाठासाठी काकूची मदत घेत नाहीस. पद्मजाने त्यावर मानेनेच होकार दिला.
संध्याकाळ झाली असल्याने एका बाजूला टीव्हीवर ‘आई’च्या सीरिअल्स लागल्या होत्या. त्यामध्ये एका पात्राच्या तोंडात संवाद होता की शुभ्रा, तू मला हे काम सांगितलेस खरे, पण मी त्यामुळे धर्मसंकटामध्ये सापडलो आहे. मी पद्मजाला म्हटले, ‘‘अजून एक अर्थ सापडला धर्मसंकटामध्ये सापडणे म्हणजे एखादे काम केले तरी प्रॉब्लेममध्ये येणे व ते काम नाही केले तरी .. म्हणजे दोन्ही बाजूंनी मरण ओढविणे.’’
एवढय़ात माझी सौ माझ्या मुलीला, म्हणजे नूपुरला दमात घेत होती. ‘‘आज काय मत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी, उद्या काय डान्स क्लासची रिहर्सल, परवा काय वही राहिलेला अभ्यास उतरवण्यासाठी मत्रिणीला दिली. नूपुर तुला अभ्यास न करण्याची रोज रोज बरी नवीन निमित्त सापडतात! हे आता चालायचे नाही, परीक्षा जवळ आल्या आहेत.’’ त्यावर नूपुर हसत हसतच म्हणाली करते गं अभ्यास.. आधी पद्मजा ताईला अर्थ सांगते. निमित्त सापडणे म्हणजे टु गिव्ह एक्स्क्युज असा एक नवीन अर्थ मग डायरीमध्ये नोट झाला.
सापळ्यात सापडणे म्हणजे ३ ऋं’’ ्रल्ल ३१ंस्र् असा अजून एक अर्थ सांगून मी आजचा अभ्यास आवरता घेण्याचे ठरविले. आजकाल ल्ल’्रल्ली ’३३ी१८ च्या नावाखाली अनेक उच्चशिक्षित लोकदेखील नायजेरियन भामटय़ांच्या सापळ्यात सापडतात असे स्पष्टीकरण देऊन मी पद्मजाची डायरी आजच्या दिवसापुरती बाजूला ठेवली.