मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे उपस्थित करणारा नलिनी दर्शने यांचा लेख ‘लोकप्रभा’ने प्रसिद्ध केला होता. त्यावर वाचकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्या प्रतिक्रियांना उत्तर देणारा लेख-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘लोकप्रभा’च्या १९ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबर या अंकांत माझ्या पत्रावर आलेल्या प्रतिक्रिया वाचल्या. दिवाकर मोहनी (नागपूर), महादेव भा. बासुतकर, सिकंदराबाद, तेलंगणा आणि २६ सप्टेंबरच्या अंकात मालती भाटे, सांगली आदी मान्यवर आणि भाषेचे अभ्यासक यांच्या प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला.
वास्तविक मी मांडलेले मुद्दे आणि त्यांचे मुद्दे यात मतभेद आहे असे मला वाटतच नाही. कारण माझ्या पत्रातील मूळ मुद्दा आहे तो ‘श्र’ या अक्षराला पुन्हार् दर्शक ‘ ृ ’ हे चिन्ह जोडण्याचा! हे तर दिवाकर मोहनी यांनीही मान्य केलेले आहे. शृंगार हा शब्द, श्रृंगार असा लिहिणे योग्य नसून ‘शृंगार’ असा लिहिणे योग्य व बरोबर आहे. याबाबत त्यांचे भिन्न मत नाही हे स्पष्ट आहे.
महादेव भा. बासुतकर, सिकंदराबाद, तेलंगणा यांच्या म्हणण्यातूनही तोच सूर आहे. ‘श्रुंगार’ हे उच्चाराबरहुकूम एक वेळ ठीक आहे, असे मी म्हटले होते. ‘र’मिश्रित अक्षराला पुन्हा ‘र्’दर्शक ‘ ृ ’ हे चिन्ह जोडण्यापेक्षा निदान उकार दिल्यावर तो उच्चार ठीक होईल म्हटले. पण ‘श्रुंगार’ हे बरोबर किंवा ग्रा असे म्हटले नव्हते. ‘शृंगार’, ‘शृखंला’ हे ठीक असे म्हटले होते.
राहिली गोष्ट ‘o’ या मानक देवनागरी लिपीतील अक्षराविषयी! जुन्या वाङ्मयात किंवा मानक देवनागरीत ‘श’ हे अक्षर ‘o’ असे लिहिले जात असे. आजच्या वाङ्मयात ते प्रचारात नाही. आज ‘श’ केवळ ‘श’ असाच लिहिला जातो. किंबहुना तो प्रचारात नसल्यामुळे अलीकडे हा ‘o’ कित्येक जणांना माहीतही नसेल. त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून ‘श्रंगार’ असा शब्द लिहिला न जाता ‘श्रृंगार’, ‘श्रृंखला’ असाच लिहिला जातो. म्हणून मी म्हणते सरळ ‘शृंखला’, ‘शृंगार’ असे लिहिणे योग्य! ‘र्’मिश्रित ‘श्र’ला पुन्हा ‘र्’ ( ृ ) जोडू नये इतकेच. ही चूक होऊ नये.
‘o’ हे जुन्या वाङ्मयातील अक्षर आता प्रचारात नसले तरी आपल्याला ईष्टद्धr(२२४)वर, ष्टद्धr(२२४)वास, अष्टद्धr(२२४)व, विष्टद्धr(२२४)व या शब्दातून या o(श)चा वापर करणे ग्रा वाटते. पूर्वसुरींनी, विद्वानांनी ‘श’मधील शेपटी काढून ‘श’चे नवे रूप ‘o’ असे केले आणि ते संयुक्त जोडाक्षरात वापरले. हे मात्र मी मान्य करते. तेव्हा हा ‘o’ ईष्टद्धr(२२४)वर, निष्टद्धr(२२४)चय, प्रष्टद्धr(२२४)न, ज्ञानेष्टद्धr(२२४)वर या शब्दांतून जरूर जिवंत राहील. हे एकदम मान्य!
त्यांनी म्हटले आहे ‘o’ आणि ‘श्र’ची गल्लत करू नये आणि माझे म्हणणे नेमके तेच तर आहे. फक्त मी नवा ‘श’ वापरला, त्यांनी जुना ‘o’ वापरून दाखविला. त्यांनी लिहिले आहे तेच मला म्हणायचे आहे. ‘कृष्ण’ हा शब्द तर क्रुष्ण किंवा क्रिष्ण असा लिहितील असे का म्हटले कळले नाही. असा शब्द तर भाषा न येणारा किंवा अज्ञच माणूस लिहू शकतो, बाकी कुणी नाही.
श्र, ज्ञ, क्ष, त्र ही संयुक्त अक्षरे दोन-तीन अक्षरांच्या मिश्रणातून झालेली आहेत आणि त्यांचे महत्त्व मराठी वर्णमालेत वा देवनागरीत अनन्यसाधारण आहे असेच म्हणावे.
क् + ष् = क्ष (मी नजरचुकीने शेंडीफोडय़ा श लिहिला होता.)
त् +र् = त्र
द् + न् + य = ज्ञ (त्यांनी ज + ञ यांचा उल्लेख केला तोही बरोबर आहे.)
श् +र् = श्र असे मी लिहिले. (त्यांनी o +र् = श्र असे लिहिले.)
यात मतभेद कुठे आला?
पुन्हा या सर्व व्यंजनांत स्वर मिसळून संपूर्ण अक्षर तयार होते, हे तर आहेच.
तेव्हा त्यांनी म्हटल्याप्रमाणे जुन्या वाङ्मयातील ‘o’ हा ईष्टद्धr(२२४)वरसारख्या शब्दातून जिवंत राहील पण ‘श्रृंगार’ असे लिहिण्यापेक्षा ‘शृंगार’ लिहिणे योग्य वाटते. ‘o’ हा (श) ‘श्र’ची मोडतोड केल्यासारखे अलीकडच्या वाङ्मयात वाटू शकते. ‘श्र’ संपूर्णच लिहिलेला योग्य वाटतो. आपल्या अंकलिपीतही ‘श’ आणि ‘ष’ ही ‘श’ची दोनच रूपे अस्तित्वात आहेत. जुना ‘o’ नाही. त्या दृष्टीने पूर्वसुरींनी मानलेला हा ‘o’ ‘ईष्टद्धr(२२४)वर’सारख्या कैक शब्दांत आहे तेवढय़ा आणि त्या ठिकाणी तो तसाच राहावा असे निष्टिद्धr(२२४)चतच वाटते.
आता राहिला मुद्दा तो उच्चाराबरहुकूम. हा मुद्दा शुद्धलेखनाच्या ऱ्हस्व दीर्घाबाबत विचार करता जसा बरोबर आहे तसाच तो काही ठिकाणी अर्थाभिव्यक्तीच्या बाबतही खरा ठरतो. उदा. ‘माहीत’मधला ‘ही’ हा उच्चारावरूनच कळतो दीर्घ आहे. तसेच ‘माहिती’मधला ‘हि’ हा तो शब्द उच्चारतानाच कळते ऱ्हस्व आहे. तसेच काही ठिकाणी अर्थही उच्चारावरून स्पष्ट होतात. यासाठी मी दिवाकर मोहनी यांनी दिलेली उदाहरणेच उदाहरणादाखल घेते. सुत (पुत्र), सूत (दोरा) या दोन शब्दांत ‘सु’च्या ऱ्हस्व-दीर्घ उच्चारानेच अर्थ सिद्ध होतो ना? आणखी त्यांनीच दिलेले उदाहरण, दिनचर्या- दिवसाचा उपक्रम, वेळापत्रक या अर्थी वापरतो. यातील ‘दि’ ऱ्हस्व आहे यावरून आणि तो शब्द आपण सलग उच्चारतो, ‘दिनचर्या’ तेव्हा त्याचा अर्थ लगेच आपणास लक्षात येतो. हे त्याच्या विशिष्ट उच्चारानेच ना? तसेच दीन-चर्या याबाबत सांगता येईल. इथे दीन म्हणजे केविलवाणा, गरीब, बापुडा हा अर्थ दीर्घ ‘दी’च्या उच्चाराने कळतो आणि चर्या म्हणजे चेहरा! दिनचर्या हा शब्द आपण सलग उच्चारतो त्याच्या विरुद्ध दीन चर्या आपण तुटक म्हणजे दोन शब्द तोडून उच्चारतो. तेव्हा त्यांच्या उच्चारातूनच आपल्याला केविलवाणा, गरीब, बापुडा चेहरा हा अर्थ समजतो. तेव्हा लिपीत, लिखाणात काही शब्द ऱ्हस्व-दीर्घ उच्चारावरून तुटक, सलग लिहिण्यावरूनच त्याचा अर्थ लागतो. अर्थात अर्थाभिव्यक्ती होतेच ना? या अर्थी उच्चाराबरहुकूम. पण घोडय़ाचे खिंकाळणे लिपीत कसे दाखवता येईल? प्राण्यांचे आवाज लिपीत किंवा मानवी उच्चाराने कसे दाखविता येतील? तेव्हा त्या विशिष्ट कृतीला किंवा आवाज काढण्याला आपण आपल्या मानवी भाषेत खिंकाळणे, हंबरणे हे विशिष्ट शब्द तयार केले. त्या अर्थाने उच्चाराबरहुकूम असे म्हणण्याचा प्रष्टद्धr(२२४)नच उद्भवत नाही. हे सिद्धच आहे.
भाषा ही अर्थाभिव्यक्तीसाठी असते. यात काही शंकाच नाही. मूळ मराठी (वा कुठलीही भाषा) समृद्ध साहित्य वा वाङ्मय हेच प्रमाण मानले जाते. तसे तर मनुष्य देहबोलीनेही व्यक्त होऊ शकतो, अर्थाभिव्यक्ती करू शकतो. पण वाङ्मयात ते ते शब्द निर्माण झाले ते कशासाठी? तोच अर्थ अभिव्यक्त करण्यासाठीच ना?
त्यांनीच दिलेले एक उदाहरण घेऊ. ते म्हणतात, काही ठिकाणी ‘ण’चा उच्चार ‘न’सारखा तर ‘न’चा उच्चार ‘ण’सारखा करतात. हे मूळ वाङ्मयाच्या, साहित्यिक आणि प्रमाण मानलेल्या भाषेच्या दृष्टीने चुकीचेच नव्हे काय? एक अक्षर बदलले तर मूळ शब्दाच्या अर्थातच बदल होत नाही काय? उदा. त्यांनीच दिलेले उदाहरण ‘खूण’ या शब्दाचा साहित्यात अर्थ पुस्तकातील खूण, एखाद्या स्थानाजवळील विशिष्ट खूण किंवा खूणगाठ अशा अर्थी! मग हा शब्द खूण असा लिहूनच त्याचा खरा अर्थ सिद्ध होतो ना? तिथे खून लिहिला तर किती विपरीत अर्थ होईल. येथे खूण करा असे लिहिण्याऐवजी येथे खून करा असे लिहिले तर किती भयंकर अर्थ होईल? मग अमक्या ठिकाणी असा उच्चार करतात याला काय अर्थ? अवघ्या महाराष्ट्राची मराठी एकसारखी शुद्ध नको काय? अर्थाचा अनर्थ करणारे शब्द महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात करणे चूकच नव्हे काय? म्हणूनच प्रमाण कोणाला मानावे? साहित्यातील समृद्ध भाषेलाच ना? का काही भागात वा ग्रामीण भाषेत ‘ण’च्या ठिकाणी ‘न’ आणि ‘न’च्या ठिकाणी ‘ण’ उच्चारणाऱ्या ग्रामीण भाषेला? तुम्ही ग्रामीण भाषेतच कथा वा कादंबरी लिहिली तर समजू शकेल. पण आपल्या बोली भाषेत वा शहरी भाषेत म्हणजेच वाङ्मयीन भाषेत त्याचा अर्थ विपरीतच होईल ना? तेव्हा अवघ्या महाराष्ट्राची मराठी कागदोपत्री एकच असली पाहिजे आणि ती शुद्ध अन् समृद्ध असली पाहिजे.
काही ठिकाणी ‘ळ’च्या ठिकाणी ‘ल’ किंवा ‘र’ वापरतात, हा तर लगतच्या प्रांताचा मराठीवर झालेला परिणामच असतो. अन्यथा ‘ळ’ या मराठीतील अक्षराला डच्चू देऊन त्या ठिकाणी ‘ल’ किंवा ‘र’ वापरण्याचे कारण काय? उदा. इतर प्रांतात वा हिंदीत होली हा शब्द आहे. तसेच काही प्रांतात होरीपण म्हणतात. पण मराठीत मूळ शब्द होळी हाच आहे ना? बरं तुम्हाला काही परप्रांतीय वा हिंदी शब्द आवडले म्हणून तसेच घेतले तरीही काही हरकत नाही. काही कथा, कादंबरी वा कवितात ते तसे घेतलेही जातात. ते आपले इतर भाषांवरचे प्रेम म्हणून. म्हणून महाराष्ट्रातील अमुक भागातील मराठी वेगळी हे मला पटत नाही. मूळ मराठी साहित्य, मराठी वाङ्मय यातील शुद्ध भाषा हीच प्रमाण भाषा ना? प्रत्येक शब्द जोखून, पारखून घेणारी शुद्ध भाषा हीच प्रमाण भाषा ना?
याबाबतीत मालती भाटे, सांगली यांची काही विधाने मला आवडली. ‘काळाबरोबर भाषेत बदल होणारच. भाषा ही प्रवाही आहे. आपल्यासमवेत येणाऱ्यांना बरोबर घेऊन जाणारी आहे. मात्र तसे करताना ती दूषित होता कामा नये. ती समृद्धच होत गेली पाहिजे.’
त्यांनी या वाक्यातून माझ्या मनातले विचारच मांडले आहेत. भाषा दूषित झाली की मनाला त्रास होतो. तिचे मूळ शुद्ध रूप आपल्या समृद्ध साहित्यातून वाहत राहावे असे वाटते. ते दूषित होता कामा नये असे माझेही ठाम मत आहे. आपण ज्या समृद्ध मराठी भाषेवर प्रेम केले तशीच ती शुद्ध आणि संपन्न रूपात आपल्या वाणी आणि नजरेत राहो!
माझा मूळ मुद्दा ‘श्र’ ला ‘र्’ जोडू नये एवढाच होता आणि त्या शृंगार या एका शब्दावरून चर्चा-मंथनातून हा सगळा पसारा मांडला गेला.
(एक मुद्दा मांडायचा राहून गेला. तसा प्रत्येक मुद्दा मी मांडला आहे. पण एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे ‘श्र’ हा श्रीगणेशासाठीच निर्माण झाला आहे असे नाही. त्यांना माझ्या लिहिण्याचा अर्थ लक्षात घेता कळेल की, जणू श्रीगणेशासाठीच ‘श्र’ची निर्मिती झाली म्हणजे या अक्षराचे मराठी वर्णमालेत इतके अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण, श्रेयस, श्रवण यांसारख्या सर्वच शब्दांतून ते दिसून येते. त्याला पर्याय नाही. हाच माझ्याही म्हणण्याचा अर्थ आहे.)
(या विषयावरील चर्चा आता थांबवण्यात येत आहे. – संपादक)
मनुष्य देहबोलीनेही
व्यक्त होऊ शकतो, अर्थाभिव्यक्ती करू शकतो. पण वाङ्मयात
ते ते शब्द निर्माण झाले
ते कशासाठी? तोच
अर्थ अभिव्यक्त करण्यासाठीच ना?