हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मराठीचे धडे गिरविताना आज पद्मजाला नातेसंबंध शिकविण्याचे ठरविले. नाश्त्याच्या टेबलवर गरम गरम घावन खाताना मी पद्मजाला म्हटले की, ‘‘पुढेमागे तुझे लग्न होईल आणि नवीन नातेसंबंध निर्माण होतील. इंग्रजीमध्ये सगळे संबंध लॉच्या अधीन असतात. जसे की मदर इन लॉ, सन इन लॉ वगैरे; पण मराठीमध्ये मात्र जावई, सून, सासू असे विविध शब्द आहेत व त्या शब्दांवरून मजेशीर म्हणीपण आहेत.’’
पद्मजा म्हणाली, ‘‘हो ना! मला हे अर्थ शिकलेच पाहिजेत.’’
त्यावर सौ. हसत म्हणाली, ‘‘म्हणजे एखादा मराठी मुलगा नजरेत आहे वाटते तुझ्या!’’
पद्मजा पण इरसाल होती. ती म्हणाली, ‘‘काकू यू नेव्हर नो.’’
पद्मजाला मी म्हटले, ‘‘आता मस्करी पुरे व शिकवणी चालू.’’
आईपासून म्हणजे मदरपासून मी सुरुवात केली. एव्हाना पद्मजाला मदर म्हणजे आई व फादर म्हणजे बाबा हे माहीत होते, पण मी पद्मजाला म्हटले, ‘‘मदर म्हणजे जसे आई होते तसे मायदेखील होते व फादर म्हणजे बाबा तसे बापही होते.’’
आईची महती सांगण्यासाठी मी ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे वाक्य उच्चारताच सौमित्र म्हणाला, ‘‘पद्मजाताई, तुला दीवार चित्रपटातील डायलॉग आठवतो का? मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है?’’ पद्मजा लगेच म्हणाली, ‘‘मेरे पास माँ है.’’
मी पद्मजाला म्हटले, ‘‘बरोब्बर! जगातील सर्व ऐश्वर्य एका जागी व आईचे प्रेम एका जागी यासाठी हे वाक्य वापरले जाते.’’
‘आई खाऊ घालीना, बाप भीक मागू देईना’ ही म्हण सांगताच पद्मजाच्या कपाळावर आठय़ा पडल्या. मी म्हटले, ‘‘याचा अर्थ होणार सर्व बाजूंनी र्निबध आल्याने एखाद्या समस्येवर काही उपाय शोधणे कठीण होऊन बसणे.’’
बाप शब्द आला म्हणून मग मी पद्मजाला ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ हा वाक्प्रचार सांगितला. हा अर्थ समजावून सांगायला स्नेहा आजी पुढे आली. एखाद्या गोष्टीचा पुरावा लगोलग सादर कर हे सुचविण्यासाठी हे वाक्य वापरतात, असे सांगितले.
‘बाप से बेटा सवाई’ असा हिंदीतील एक वाक्प्रचार मराठीमध्येदेखील प्रचलित आहे, असे सांगत सौ. म्हणाली, ‘‘सद्गुणांच्या बाबतीत मुलगा वडिलांच्या पुढे जातो तेव्हा हे वाक्य वापरतात.’’
मावशी म्हणजे आईची सख्खी बहीण व आत्या म्हणजे वडिलांची सख्खी बहीण, असे सांगून मी पद्मजाला समजावले की, इंग्लिशमधील ‘आंटी’ या एकाच शब्दाला मराठीमध्ये मात्र दोन वेगवेगळे शब्द आहेत. ‘माय मरो, मावशी उरो’ किंवा ‘माय मरो, मावशी जगो’ अशी म्हण सुचवत नूपुरने सहभाग घेतला.
पूतनामावशीचा अवतार किंवा पूतनामावशीचे प्रेम असा अजून एक अर्थ सुचविण्याचा मोह मला आवरता आला नाही. भले करण्यासाठी आलो आहोत असे भासवून प्रत्यक्षात नुकसान करण्याच्या इराद्याने आलेल्या व्यक्तीला उद्देशून असे म्हणतात, हा अर्थ पद्मजाने तिच्या डायरीमध्ये नोट केला.
मावशी म्हटले की साहजिकच आठवतो मामा. मामावरून ‘कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी’ हा वाक्प्रचार आमच्या सौ.ने सुचविला. जेव्हा एखादा फायदा उपटण्यापुरते एखादे नाते जोडले जाते तेव्हा हा मतलबीपणा उघड करण्यासाठी हा वाक्प्रचार वापरला जातो, असे स्पष्टीकरण पद्मजाने लिहून घेतले.
आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले नसते..? असा मजेशीर सवाल मी टाकताच पद्मजा म्हणाली की, काका ही म्हण म्हणजे माझ्यासाठी गृहपाठ असू दे.
आमच्या संभाषणामध्ये आता भर पडली ती माझ्या सासूबाईंची. त्या म्हणाल्या सासू-सून-जावई या नात्यांवर खूप म्हणी आहेत; जसे की, ‘लेकी बोले सुने लागे’. याचा अर्थ होणारे बोलणे जरी एखाद्याला उद्देशून केले असले तरी तो टोमणा मात्र दुसऱ्याच कोणासाठी असतो.
आमच्याकडे लादी पुसायला येणाऱ्या मावशी म्हणाल्या, ‘‘आमच्या गावाकडे सुनेवरून खूप म्हणी आहेत; जशा की, ‘लेक द्यावी श्रीमंताघरी, सून करावी गरिबाकडली’ किंवा ‘लेक नाही, तोवर लेवून घ्यावे, सून नाही तोवर खाऊन घ्यावे.’ आपल्या माहेरच्या श्रीमंतीचा तोरा सुनेने सासरी मिरवू नये म्हणून पहिली म्हण प्रचारात आली, तर सुनेच्या राज्यात सासूची परवड होऊ शकते हे दर्शविण्यासाठी दुसरी म्हण प्रचारात आली. हे पुराण ऐकून पद्मजा खट्टू झाली व म्हणाली, ‘‘नेहमी सुनेलाच का खलनायिका दाखवितात.’’ त्यावर मी म्हटले, ‘‘सूनच नाही, तर जावयाला पण खलनायक बनविण्यात आलेले आहे; जसे की, जावयाचे पोर हरामखोर व ‘जामात: दशम ग्रह’.
‘जावईशोध लावणे’ म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्वामध्ये नसलेली गोष्ट असण्याचा दावा करणे, असा एक अर्थ माझ्या सौ.ने म्हणजे प्राजक्ताने सांगून गंभीर होत जाणाऱ्या विषयाला काहीसे दुसऱ्या दिशेकडे वळविले.
एवढय़ात सौमित्र म्हणाला, ‘‘अरे आधी नवरा-बायको काय ते शिकवा, एकदम सासू-सुना-जावई यांच्यावर काय घसरलात तुम्ही.’’ मी म्हटले, ‘‘हो बरोबर आहे तुझे. मी पद्मजाला म्हटले की ब्राइड म्हणजे नवरी किंवा वधू व ग्रूम म्हणजे नवरा किंवा वर.’’
नवरा या शब्दावरून चटकन आठवणारी म्हण म्हणजे ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’. याचा अर्थ निवडणुका जाहीर व्हायच्या आधीच राजकीय पक्षामध्ये अनेक पुढारी मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. पद्मजा म्हणाली, ‘‘काका, लेट मी गेस. याचा अर्थ होणार एखाद्या गोष्टीसाठी खूप उतावळे असणे.’’ आम्ही सर्वानी एकसुरात म्हटले.. ‘‘भले शाब्बास पद्मजा! ‘म्हसोबाला नव्हती बायको अन् सटवीला नव्हता नवरा’ अशी एक इरसाल म्हण स्नेहा आजीने सुचवली. ‘जिचा नवरा दासट, तिचा संसार चोखट’ अशी एक मिश्कील म्हण प्राजक्ताने सुचविली. पद्मजाने त्याचा अर्थ विचारताच सौ. जरा गोंधळली व हळूच पद्मजाच्या कानात पुटपुटली की, तुझे काका ऑफिसला गेले व सासूबाई देवळात गेल्यावर सांगेन याचा अर्थ. पण चाणाक्ष स्नेहा आजीने ते बोलणे ओळखलेच व म्हणाली, ‘‘पद्मजा, लग्नानंतर नवऱ्याला मुठीत ठेवायला आपसूकच शिकशील तेव्हा हा अर्थ तुला खऱ्या अर्थाने कळेल. यावर सर्वच दिलखुलास हसले व याच आनंदी क्षणाला आम्ही मराठीची शिकवणी आवरती घेतली.