दि. ११ जुलै २०१४ च्या ‘लोकप्रभा’तील नलिनी दर्शने यांचे ‘वाचक प्रतिसाद’मधील ‘‘मराठीतील ‘श्र’ आणि ‘शृ’ची चूक’’ या पत्राच्या निमित्ताने..

दिवाकर मोहनी, नागपूर<br />दि. ११ जुलैच्या ‘लोकप्रभा’च्या अंकात नलिनी दर्शने यांचे ‘भाषा आणि विवेक’ या सदराखाली आलेले पत्र वाचले. त्यात त्यांनी आपल्या मराठीसाठी वापरल्या जाणाऱ्या देवनागरी लिपीविषयी व तिच्यातील श्रृ या जोडाक्षराच्या चुकीच्या लेखनाबद्दल आपली निरीक्षणे मांडली आहेत. त्यांची ही दोन्ही निरीक्षणे बरोबर आहेत. त्यांनी आपल्या मायबोलीविषयी दाखविलेल्या जिज्ञासेबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. देवनागरी ही अत्यंत घाटदार वळण असलेली रेखीव लिपी आहे हे तर खरेच आहे. पण यासंबंधात नलिनीताई अधिक बारकाईने निरीक्षण करतील तर त्यांना या लिपीची आणखीही काही वैशिष्टय़े लक्षात येतील. ही लिपी अत्यंत ूेस्र्ूं३ असल्याने थोडय़ा जागेत खच्चून मजकूर बसविणारी आहे. रोमन लिपीसारखी पसरट नाही.
हा तिचा गुण तिच्यातील जोडाक्षरांच्या रचनेमुळे किंवा त्यांच्या रचनेच्या विशिष्ट पद्धतीमुळे आलेला आहे. या लिपीचे बारकाईने निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की जोडाक्षरांच्या रचनेत काही तरी सारखेपणा आहे. म्हणजे त्यामागे काही नियम आहेत व त्यानुसार ही जोडाक्षरे बनविली जातात. याप्रमाणे तिच्यातील जोडाक्षरे नियमांनी बांधलेली असल्याने जगातील सर्वात तर्कसंगत (’ॠ्रूं’) अशी ही एकमेव लिपी आहे.
नलिनी दर्शने यांचे आपल्या लिपीविषयी काही गैरसमजही झाले आहेत. ते कोणते ते आधी पाहू.
पहिला मुद्दा असा की आपल्या लिपीने आपले उच्चार यथावत् दाखवले पाहिजेत. त्याबद्दल मला असे म्हणायचे आहे की, कोणतीच लिपी यथावत् उच्चार दाखवीत नाही. भाषेचे लेखन उच्चारदर्शनासाठी नव्हे तर अर्थाभिव्यक्तीसाठी केलेले असते. कारण असे की एकाच वर्णाचा उच्चार निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळा होतो. आपण सध्या महाराषट्रापुरता विचार करू या. काही ठिकाणी ‘ळ’चा उच्चार ‘ल’सारखा करतात तर कुठे ‘ळ’चा उच्चार य, ई असा करतात. तर विदर्भात ‘ळ’चा ‘ड’सारखा उच्चार करतात. आणखी पुढे भंडाऱ्याकडे गेल्यास ‘ळ’चा उच्चार ‘र’सारखा होतो. तेथील लोकांच्या मुखाच्या वळणाप्रमाणे किंवा सवयीप्रमाणे उच्चार होतो. बंगाली लोक श, ष, स यांच्या उच्चारात फरक करू शकत नाहीत. तर काही ठिकाणचे लोक ‘ण’चा उच्चार ‘न’ करतात. येथे खूण करा असे लिहिले असले तरी ते वाचताना येथे खून करा असा उच्चार काही ठिकाणी केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचे असे की जे जन्मबधिर आहेत त्यांना कोणताही उच्चार बहिरेपणामुळे माहीत नसला तरी तेसुद्धा कागदावरील अक्षरांना केवळ डोळ्यांनी पाहून त्याचा अर्थ समजू शकतात. तेव्हा आपण हे लक्षात घेऊ या, की लेखन डोळ्यांसाठी आहे व ते अर्थ सांगण्यासाठी केलेले असते; उच्चार दाखवण्यासाठी नाही. उच्चार दाखवणे हा जर लिखाणाचा हेतू असता आणि आपली लिपी तशी घडवली गेली असती तर आपल्याला घोडय़ांचे िखकाळणे, गाई-म्हशींचे हंबरणे हे सारे हुबेहूब लिहिता व वाचता आले असते- अर्थ माहीत नसतानाही!
लेखनाने उच्चार दाखवला जात नाही तर अर्थ दाखवला जातो. त्या त्या शब्दाला अर्थ कसा प्राप्त होतो? शब्दाला अर्थ प्राप्त व्हावा ह्यासाठी एकच शब्द त्याच संदर्भात पुन्हा पुन्हा सातत्याने वापरला जावा लागतो. तसा तो वापरला गेल्यासच त्या शब्दाच्या ठिकाणी, मग तो कानांनी ऐकलेला असो किंवा डोळ्यांनी पाहिलेला असो, त्यास निश्चितार्थ प्राप्त होतो. उदा. ‘ध्रुव’ व ‘धृव’ यांपैकी पहिलाच बरोबर असला तरी दोन्ही प्रकारे लिहीत राहिल्याने त्याच्या अर्थाचे सातत्य टिकत नाही.
एकाच उच्चाराचे एकाहून अधिक शब्द निरनिराळे अर्थ दाखवू शकतात. पण लिहिताना त्यांचा अर्थ सांगायचा/ दाखवायचा असल्यामुळे ते वेगवेगळ्या विशिष्ट पद्धतींनी लिहिले जातात. हे वेगळेपण दाखविण्यासाठी मराठी भाषेत ऱ्हस्व-दीर्घ व अनुच्चारित अनुस्वार उदा. तें (्र३) व ते (३ँी८) असा अनुच्चारित अनुस्वाराचा वापर करतात. ऱ्हस्व-दीर्घाचे उदा. सुत (पुत्र), सूत (दोरा); दिनचर्या (दिवसाचा उपक्रम) व दीनचर्या (दीनवाणा चेहरा) इ. इंग्लिशमध्ये हा समान उच्चाराच्या शब्दांमधील अर्थभेद स्पेिलग बदलून दाखविला जातो. उदा. १्रॠँ३/ ६१्र३ी; ल्ल/ ‘ल्ल६; ळँी१ी/ ळँी्र१ इ. आपल्या मायमराठीतील ऱ्हस्व-दीर्घ व अनुच्चारित अनुस्वारांचे काय व किती महत्त्व आहे हे एवढय़ावरून कळावे.
‘श्री’ आणि ‘विश्व’ ही अक्षरे अशी का लिहिली जातात हे पुढे पाहू-
देवनागरी लिपी एका तर्कशुद्ध पायावर रचलेली आहे. तो पाया समजावून देण्याचा प्रयत्न करतो. ते करताना थोडा अपरिचित शब्दांचा वापर करावा लागणार आहे. लिहिताना आपण काही व्यंजनांचा आणि स्वरांचा वापर करतो. क, ख, ग, घ ही व्यंजने आणि अ, आ, इ, ई हे स्वर आहेत. केवळ व्यंजने उच्चारता येतच नाहीत. क म्हटले की त्याबरोबर ‘अ’ येतो. का म्हटले की ‘अ’ची जागा ‘आ’ घेतो. येथे नियम कोणता ठरला तर कोणत्याही व्यंजनाच्या उच्चाराला स्वराचा आधार लागतो. ज्या वेळेला नुसते व्यंजन उच्चारायचे असेल तेव्हा त्याच्यापूर्वी एखादे अक्षर उच्चारावे लागते. उदा. दिक् यातल्या शेवटच्या ‘क्’ला पायमोड चिन्ह लावले आहे; याचा अर्थ असा की ‘क’मधल्या ‘अ’चा निरास झाला. ‘अ’तेथून निघून गेला. व ‘दि’मधल्या ‘इ’ या स्वराच्या आधाराने ‘क’चा उच्चार झाला. या चिन्हाला व्यंजनचिन्ह किंवा हलन्तचिन्ह असेही म्हणतात. जोडाक्षरांमध्ये एक व्यंजन आणि एक स्वर अशी जोडी नसून एकापेक्षा जास्त व्यंजने एका स्वराच्या आधाराने उच्चारलेली असतात. देवनागरीमध्ये ती सगळी व्यंजने एका स्वराच्या म्हणजे एकाच स्वरचिन्हाच्या आधाराने लिहिली जातात. हे देवनागरीचे वैशिष्टय़ आहे, जे दुसऱ्या कोणत्याही लिपीत आढळत नाही. प्रत्येक वर्णामध्ये व्यंजन दाखवणारा काही भाग असतो आणि स्वर दाखवणारा काही भाग असतो. व्यंजन दाखवणाऱ्या भागास व्यंजनांश व स्वर दाखवणाऱ्या भागास वर्णाचा स्वरांश असे म्हणता येईल.
‘श्री’ या वर्णामध्ये दोन व्यंजने आणि एक स्वर आहे. ‘श्’ आणि ‘र्’ ही दोन व्यंजने आणि ‘ई’ हा स्वर.
श्रावणमध्ये ‘श्’, ‘र्’ आणि ‘आ’ असे आहेत. ‘श्री’ मधील खालचा ‘र’ हा आणखी अनेक अक्षरांत सापडतो.
उदा. चक्र, उग्र, व्याघ्र, वज्र नेत्र, रुद्र, विप्र, अभ्र, आम्र इ. हा ‘र’ वेगळा केला की वरचा भाग ‘श्’ दाखवणारा आहे असे ठरते. हाच ‘श’ आश्चर्य, प्रश्न, ष्टद्धr(२२४)लोक, अश्व वगैरे शब्दांमध्ये आढळतो. जोडाक्षरात ज्या क्रमाने व्यंजने उच्चारली जातात त्याच क्रमाने ती वरून खाली लिहायची आणि प्रत्येक व्यंजनचिन्हाचा स्पर्श प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे स्वरचिन्हाला घडवायचा; असा नागरीचा आणखी एक नियम आहे. व्यंजनाचा उच्चार जसा स्वराच्या आधाराशिवाय करता येत नाही. तसेच त्याचे लिखाणदेखील स्वराच्या आधाराशिवाय होऊ शकत नाही. श्रीमध्ये ‘ी’ वेलांटी हे चिन्ह त्यातील ‘ई’ हा स्वर दाखविते.
जोडाक्षरांमध्ये येणाऱ्या ‘र’चा व्यंजनांश एकूण चार प्रकारांनी लिहिला जातो. पहिला प्रकार आपण ‘श्री’ वगैरे शब्दांत वर पाहिला. ‘श्री’मधला ‘र’ जसा वर्णात शेवटी उच्चारला गेला आहे तसाच तो राष्ट्रमध्येसुद्धा शेवटी उच्चारला जातो. ्रछ, ट्र, ्रठ, ड्र, ्रढ या वर्णात ‘र’ चे चिन्ह खाली आहे. ‘्र ’ हा झाला दुसरा प्रकार. (त्यातला डावीकडचा भाग हा व्यंजनाचा व उजवीकडचा स्वराचा) जोडाक्षरात व्यंजनांचा उच्चार ज्या क्रमाने होतो त्या क्रमाने ती वरून खाली लिहिली जातात. हे आपण वर पाहिले. आता सूर्य, वर्ष, पर्व हे शब्द पाहा. सूर्यमध्ये पहिल्या अक्षरानंतर ‘र्’ आणि ‘य’ ही दोन व्यंजने आहेत. त्यात ‘र्’ हा पहिल्याने उच्चारला जातो. म्हणून ‘र्’ हे व्यंजन ‘य’च्या आधी लिहिले गेले पाहिजे. पाश्र्वमध्ये तीन व्यंजने आहेत. ती ‘र्’, ‘श्’ आणि ‘व’ या क्रमाने आहेत. तेव्हा ती वरून खाली लिहिली गेली पाहिजेत व एकाच स्वरचिन्हाला चिकटली पाहिजेत. हे साधण्यासाठी ‘श्’ आणि ‘व’ याच्या आधी येणारा ‘र’ शिरोरेषेच्या वर गेला. त्याला रफार म्हणतात. आता ‘र’चा आणखी एकच प्रकार राहिला. तो वऱ्हाड, तऱ्हा, सुऱ्या यातील ‘र्’चा उच्चार निराघात होतो. या शब्दामध्ये वापरला गेलेला ‘ऱ्’ हा ‘ ्र’ पेक्षा थोडासा वेगळा आहे.
शृंगारमधल्या व्यंजन ‘श’च्या नंतर ‘ऋ’ हा स्वर आला आहे. हा ऋषीचा ‘ऋ’ आहे. रुपयाचा ‘रु ’ म्हणजे व्यंजन ‘रु’ नाही. त्यामुळे त्याला खाली ऋकार लावावा लागतो. ‘श्रुती’ या शब्दांत ‘श’च्या नंतर रुपयाचा ‘रु ’ आहे. नागरी लिपीचा आणखी एक नियम आहे. ‘ऋ’कार हा बाकीच्या व्यंजनांप्रमाणे ‘र’ला लावता येत नाही. संस्कृत भाषेमध्ये फक्त एकाच शब्दात ‘र’ला ‘ऋ’कार लागला आहे. तो ‘निर्ऋति’ या शब्दात. त्यापासून बनलेल्या ‘नैर्ऋत्य’ या शब्दामध्ये ‘नैऋत्य’ असे लिहिणे चुकीचे आहे. हे सारे शब्द आपण संस्कृतमधून घेतले आहेत. त्यामुळे ते संस्कृतसारखेच लिहिले पाहिजेत. आपल्याला ऋषीच्या ‘ऋ’ ऐवजी रुपयाचा ‘रु ’ अशी अदलाबदल करण्याचा अधिकार नाही. श्रुती, अश्रुतपूर्व, श्रुतिस्मृतिपुराणोक्त यांमधील ‘ा्रु’ व ‘ाृ’ यांची अदलाबदल करता येत नाही. ही अदलाबदल करता येत नाही याचे कारण आपण जे लेखन आणि मुद्रण करतो ते उच्चार दाखवण्यासाठी नसते तर अर्थ दाखवण्यासाठी असते. निर्थक बडबड आपण लिहीत नसतो. जेव्हा आपल्याला काही सांगायचे असते तेव्हाच आपण ते लिहितो.
‘श्री’ मधला ‘श’ आणि विश्व मधला ‘श’ हा एकच आहे हे वरील विवेचनावरून स्पष्ट झालेच असेल. पण ते रूप बदलले व ‘श्’ला ‘ष्टद्धr(२२४)’ केले याचे कारण ते व्यंजनचिन्ह स्वरांशाला चिकटवता यावे म्हणून. आता ‘विश्व’, ‘विश्व’ ही दोन्ही रूपे वापरात आली याचे कारण काय? हाताने लिहिली जात असलेली लिपी यंत्रावर छापताना काही अडचणी आल्या. त्या मुख्यत: जोडाक्षरांचे असंख्य खिळे पाडण्याच्या बाबतीतल्या होत्या. जलद जुळणी करण्यासाठी पुढे पुढे यंत्रांचा वापर सुरू झाला. ही यंत्रे भारतात बनत नव्हती; ती युरोपातून येत होती आणि ती रोमन लिपीतील फक्त २६ अक्षरांसाठी बनवलेली होती. त्यामुळे त्यांत जोडाक्षरे बसणे अशक्य होते. बालभारतीने तर कहरच केला. तिने एका टाइपराईटरवर जेवढी अक्षरे बसू शकत होती तेवढीच वापरायला सुरुवात केली. आणि मुलांच्या वाचनाच्या सवयी बिघडवून टाकल्या.
लिपीशी असा खेळ केल्याने वाचकांचे फार नुकसान झाले. लिपीत वारंवार बदल करता येत नाही याची कारणे खालीलप्रमाणे.
’ डोळ्यांना दिसणाऱ्या आकृतींमध्ये सातत्य असले तर वाचनाचा वेग वाढतो.
’ अंश एकत्र करून जो परिणाम होतो त्यापेक्षा साकल्याचा परिणाम वेगळा आणि अधिक असतो. (ॅी२३ं’३ीऋऋीू३) हे सर्व मानसशास्त्रज्ञ जाणतात. त्या परिणामापासून आपण सतत बदल केल्यामुळे वंचित राहतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की नागरी लिपीच्या बाबतीत या गोष्टीकडे दुर्लक्ष झाले याचे मुख्य कारण परदेशी मुद्रण यंत्रांच्या मर्यादा आपण ओलांडल्या नाहीत व त्या अज्ञानाने स्वीकारल्या. त्यामुळे आपली लेखनाची परंपरा खंडित झाली व त्या जुन्या पद्धतीने लिहिलेले व छापलेले साहित्य वाचण्याचीही कुवत आपल्यात राहिली नाही.
’ छापलेला प्रत्येक शब्द छॠ३८स्र्ी प्रमाणे असल्यास पुष्कळ फायदे होतात. ज्यांची ती मातृभाषा आहे त्यांना वाचन करताना त्याचा उच्चार करण्याची गरज राहत नाही आणि ज्यांची मातृभाषा नाही त्यांच्या मनात हा दुसराच कोणता शब्द नाही ना अशी शंका येत नाही. हे सारे लाभ सातत्याचे आहेत.
नलिनीताईंच्या पत्रात मतभेदाचे आणखीही मुद्दे आहेत. त्याविषयीचे स्पष्टीकरण पुन्हा कधी तरी.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Mallikarjun Kharge and JP Nadda
EC Writes to BJP and Congress : आचारसंहितेचं उल्लंघन! भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
politics of religion and caste still resonate in Maharashtra
लेख : जात खरंच जात नाही का?
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

मराठीतील ‘श्र’ आणि ‘शृ’

महादेव मा. बासुतकर,
सिकंदराबाद, तेलंगणा.
११ जुलै २०१४ च्या लोकप्रभातील नलिनी दर्शने यांचे पत्र ‘‘मराठीतील ‘श्र’ आणि ‘शृ’ची चूक’’ वाचले.
ा क्ष, त्र, ज्ञ, श्र ही चारही संयुक्त किंवा जोडाक्षरे आहेत. विशिष्ट आकारामुळे यांना वर्णमालेत स्थान दिले गेले आहे.
क् + ष = क्ष (क् + श नव्हे.)
त् + र = त्र
ज + ञ = ज्ञ (मराठीत उच्चारण द्न्य=ज्ञ)
o+ र = श्र
ा मानक देवनागरीत ‘श’चे ‘o’ असेही दुसरे रूप प्रचलित आहे. मानकीकरण करण्यापूर्वी याचे रूप ‘श’ असे होते. तालव्य ‘श’ आणि मूर्धन्य ‘ष’ यांची योग्य ओळख व्हावी म्हणून शेंडीवाला ‘श’ व पोटफोडय़ा ‘ष’ अशी विशेषणे जोडली जात. मानकीकरणात शेंडीवाला ‘श’ला अमानक ठरवण्यात आले व ‘श’ला मानक मानले गेले. याच ‘श’चे ‘o’ असे रूप संयुक्त किंवा जोडाक्षरासाठी मान्य करण्यात आले.
ा खरे तर व्यंजन + र असे जोडाक्षर तयार करताना नियम असा की जर वर्णामध्ये (लिपीचिन्हात) जर कान्यासारखी उभी रेखा (रेघ) असेल तर ‘र’ चे ‘ा्र’ हे रूप त्या उभ्या रेषेला जोडतात. जसे- क्रम, घ्राण, प्रेम, व्रण इत्यादी. शिवाय द, ह मध्येही हेच रूप येते- द्रव, ह्रास. (याचे ‘ऱ्ह’ रूपही प्रयुक्त होते – ऱ्हस्व, कुऱ्हाड इत्यादी.
तर आता ‘श’ मध्ये ‘र’ जोडावयाचा आहे. तेव्हा त्याचे रूप होईल ‘श्र’ किंवा ‘श्र’. हे थोडे विचित्र वाटते म्हणून पूर्वसुरींनी, विद्वानांनी ‘श’मधली शेपटीच काढून ‘श’चे एक नवे रूप ‘o’ निष्टिद्धr(२२४)चत केले व ते संयुक्त किंवा जोडाक्षरात वापरले.
जसे- निश्चय, पश्चिम, प्रश्न, विष्टद्धr(२२४)व, विघ्नेश्वर, ज्ञानेश्वर, श्वास, ईश्वर या व अशा शब्दांना निश्चय, पश्चिम, प्रश्न, विश्व, विघ्नेश्वर, ज्ञानेश्वर, श्वास, ईश्वर असेही लिहितात.
ा पण ‘र’ जोडताना फक्त ‘o’ रूपच वापरावे. जसे श्र, श्री, श्रेय, श्रेयस, श्रेष्ठ, श्रेष्ठा, श्रद्धा, श्राद्ध अशा शब्दांना श्र, श्री, श्रेय, श्रेयस, श्रेष्ठ, श्रेष्ठा, श्रद्धा, श्राद्ध असे लिहू नये.
ा ‘श्र’ हे अक्षर फक्त श्री किंवा श्रीगणेशासाठीच नाही. ते कितीतरी शब्दांमध्ये येते. जसे- श्रम, परिश्रम, श्रेष्ठ, विश्राम, श्रांत, आश्रम, आश्रय, सश्रम, मिश्रण इत्यादी.
ा ईश्वर किंवा ईश्वर दोन्ही शुद्ध व बरोबर आहेत. दोहोंच्या उच्चारात कोणताही फरक नाही आणि फरक करूही नये.
ा श्रंगार किंवा शृंगार दोन्ही बरोबर व शुद्धच आहेत. यात श् + ऋ आहे.र् नव्हे. ‘ऋ’ स्वर आहे तर ‘र’ हे व्यंजन आहे. त्यामुळे o्+ऋ किंवा श्+ऋ पासून श्र किंवा शृ असे अक्षर बनते. हे जोडाक्षर ( दोन व्यंजनांचा संयोग) नव्हे.
ा श्रंगार किंवा शृंगार शब्द ‘श्रुंगार’ उच्चारानुसारी वाटले तरी ते चुकीचे होईल. कारण ‘ऋ’चा उच्चार मराठी भाषक ‘रु’सारखा करतात तर हिंदी भाषक ‘ऋ’चा उच्चार ‘रि’ सारखा करतात. पण म्हणून कोणी ‘कृष्ण’ला क्रुष्ण किंवा क्रिष्ण लिहीत नाहीत.
ा o आणि श्रची गल्लत करू नये. ‘o’ हे ‘श’चेच दुसरे रूप, दुसरे लिपीचिन्ह आहे, तर ‘श्र’ हे जोडाक्षर आहे.
ा श्रंगार, श्रंखला वगैरे शब्द याच रूपात लिहिले पाहिजेत. यांना श्रृंगार, श्रृंखला लिहिणे पूर्णत: चुकीचे आहे. ‘र’ आणि ‘ऋ’ दोन्ही एकत्र जोडणे योग्य नाही. येथे फक्त ‘ऋ’ स्वर जोडणे पुरेसे आह. ‘र’ व्यंजनसुद्धा जोडून संयुक्ताक्षर बनवणे चुकीचे आहे.
ा त्रुटी शब्दच बरोबर आहे. तो तृटी किंवा त्रृटी असू शकत नाही. तो एक तर मुद्रण-दोष असावा किंवा लिहिणाऱ्याची गफलत, चूक झाली असावी.