‘पोश्टर बाईज’नी सध्या महाराष्ट्रभर धमाल उडवली आहे. नसबंदीसारखा विषय घेऊन लोकांना हसवत, टोप्या उडवत आपल्याच व्यवस्थेची रेवडी उडवणारा हा सिनेमा कशासाठी पाहायचा..? वाचा एका तरुण प्रेक्षकाचं मत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोणालाही हसवणं कठीण असतं. समोरचा माणूस खळखळून हसून फुटेल किंवा पार टाळ्या पिटेल किंवा कोटय़ा करेल यासाठी काही तरी सणसणीत हास्यास्पद सादर करायला हवं. ‘पोश्टर बॉईज’मध्ये दिग्दर्शक समीर पाटील यांनी आपल्याला पदोपदी चिमटे काढलेत. ‘बिनटाक्याची नसबंदी शस्त्रक्रिया’ हा सर्वार्थाने तांत्रिक मुद्दा घेऊन विनोदी चित्रपट काढणं हा विचारच अफलातून आहे.
प्रेक्षकांच्या दृष्टीने डोकं बाजूला ठेवून पाहायचा तद्दन एंटरटेन्मेंट मसाला ही सिनेमाची पहिली वर्गवारी, तर अंतर्मुख करायला लावणारे, अभ्यासू असे आर्ट-ऑफ बीट-समांतर सिनेमे हा दुसरा गट. या दोन्हींचा सुवर्णमध्य साधून दोन्ही गटांना ठोस कंटेट देण्याचं काम ‘पोश्टर बॉईज’ने केलंय.
बिनटाक्याच्या नसबंदी शस्त्रक्रियेच्या जाहिरातीसाठी आयत्या वेळी गावातल्या तीन जणांचे फोटो त्यांना न सांगता वापरले जातात. ही गोष्ट आधी जगाला आणि नंतर त्या तिघांना समजते. त्यानंतर उडालेला गोंधळ, गैरसमज, परिणाम, मनस्ताप, लढा, संघर्ष हे सगळे कंगोरे म्हणजे ‘पोश्टर बॉईज’. पहिल्या पंधरा मिनिटांत सिनेमा कसा पुढे जाणार हे समजतं, पण तरीही क्रेडिट्स येईपर्यंत यांचं काय होणार हे समजावून घेण्यासाठी आपण खुर्चीला खिळून असतो हे ‘पोश्टर बॉईज’कर्त्यांचं यश म्हणायला हवं.
टॅबू समजला जाणारा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणं, त्या विषयाची निकड स्पष्ट करणं, या विषयाबद्दल समाजातले गैरसमज दाखवणं, विरोध शस्त्रक्रियेला नसून नसबंदीच्या पोश्टरवर फोटो टाकण्याला आहे हे स्पष्ट करणं या सगळ्या गोष्टी दोन तासांत हाताळणं कठीण काम आहे. सवंगपणाकडे जाण्याची शक्यता असलेल्या विषयावर आशयघन आणि करमणूकप्रधान निर्मिती करणं हे शिवधनुष्य या टीमने पेललं आहे.
संवाद खुसखुशीत आहेत, टोकदारही आहेत, आपल्याला हसवणारेही आहेत, मात्र प्रत्येक फ्रेम आणि संवाद आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे. समीर पाटील सशक्त अभिनेता आहेतच. ‘िपपळपान’ मालिकेतील ‘वावटळ’मधली त्यांची भूमिका, ‘टिकल ते पॉलिटिकल’मधली रूपं, ‘सोनियाचा उंबरा’मधला पिचलेला मुलगा आणि एबीपी माझावर थेट एसटीत राजकीय चर्चासत्र घडवून आणणारा कंडक्टर या सगळ्या भूमिका त्यांनी चोख वठवल्या आहेत. यानिमित्ताने आजूबाजूच्या अनागोंदींचं भान असणारा, त्यावर मार्मिक भाष्य करण्याची तयारी असणारा दिग्दर्शक मराठीला मिळाला आहे.
टीव्हीमुळे साध्या आंदोलनाचं मोठय़ा आंदोलनात होणारं रूपांतर, कामं उरकण्याची सरकारी पद्धती, बातमीदारीची दुकानदारी, महिला सबलीकरण आणि मुलगाच हवा हा अट्टहास, नोकरी-व्यवसाय नाही, शिक्षणात बेतास बेत, मात्र बक्कळ पैसा, गाडय़ा घेऊन शो शाइन करणारे तरुण, सरकारी बाबू झालेला शिक्षक अशा असंख्य सूक्ष्म पैलूंना चित्रपट स्पर्श करतो. आपण हसतो, टाळ्या वाजवतो, मात्र चित्रपटगृहातून निघताना अनेक प्रश्न आपल्या मनात रुंजी घालत राहतात.
सिनेमॅटोग्राफी उत्तम असल्याने गावाचा, सरकारी कचेऱ्यांचा, मंत्रालयाचा, आंदोलन होतं त्या मैदानाचा फील आपण अनुभवतो. कास्टिंग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. तीन पोश्टर बॉईजसह सगळी स्टारकास्ट परफेक्ट आहे. काहींना संवाद आहेत, काहींना नुसती उपस्थिती आहे, पण तीही अचूक निभावली गेली आहे. संवाद हे या चित्रपटाचं बलस्थान आहे. मात्र काही गोष्टी खटकतात. अर्जुन आणि कल्पू डार्लिग मध्येच गावरान बोलतात आणि मध्येच अगदी शहरी वळणाचं अस्खलित मराठी बोलतात. महाराष्ट्राचा इतका तरुण मुख्यमंत्री फक्त चित्रपटातच पाहायला मिळतो. काही विशेष कारण नसताना हिंदी कलाकारांना घुसडण्याचा प्रयत्न नाहक वाटतो. शेवट अपेक्षित होतो. कहानी में आणखी ट्विस्ट असता तर गंमत आणखी वाढली असती.
या सिनेमाच्या यशात कथेचा आधार असलेलं पोश्टर आणि ‘पोस्टरचं पोश्टर’ असं केलेलं व्यंगात्मक रूपांतर खूप मोलाचं आहे. पोश्टरवरच्या बॉडीबिल्डरच्या रूपातल्या तीन आकृती आणि त्यांना डकवलेले दिलीप प्रभावळकर, अनिकेत विश्वासराव आणि हृषीकेश जोशी यांचे चेहरे पाहूनच उत्सुकता चाळवली जाते. ‘पोश्टर बॉईज’ या कॅची फ्रेझच्या ब्रॅण्डिगचा चित्रपटाच्या यशात अविभाज्य वाटा आहे.
कुटुंबासह पाहता येईल, पैसा वसूल हसवेल याची गॅरंटी देणारा, मात्र त्याच वेळी चित्रपटगृहातून बाहेर पडताना विचार डोक्यात सोडणारा अशी ही पोश्टर मैफल.