मराठीत प्रथमच एका आशयघन मल्याळम चित्रपटाचा रिमेक असलेला ‘शटर’ हा चित्रपट २६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्याविषयी…

मराठी चित्रपटांमध्ये आशय-विषयाच्या दृष्टीने नवीन प्रयोग सतत होत असतात यात आता बातमी राहिलेली नाही. ‘लय भारी’द्वारे हिंदीतील स्टार कलावंत रितेश देशमुख मराठीत नायकाच्या भूमिकेत आला, ‘रमा माधव’मध्ये एक गाणे हिंदीतील अदिती हैदरी या अभिनेत्रीवर चित्रित करण्यात आले. हिंदीतील चरित्र व्यक्तिरेखा साकारणारे कलावंत आता मराठी चित्रपटांतून झळकू लागले आहेत. नो एण्ट्री या हिंदी सिनेमाचा रिमेक मराठीत करण्यात आला असला तरी हिंदीप्रमाणे मराठीत रिमेकची लाट आली नाही. प्रेक्षकांनी गौरविलेल्या आणि मुख्यत्वे गल्लापेटीवर यशस्वी ठरलेल्याच दाक्षिणात्य चित्रपटांचे हिंदीत रिमेक बनविण्यात आले तेही गाजले. परंतु, मराठीत प्रथमच एका मल्याळम चित्रपटाचा रिमेक येणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याबरोबरच स्टारडम, गल्लापेटी याला छेद देण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आशयघन आणि स्टार कलावंत यांचे एकत्रीकरण करून चांगला चित्रपट बनविला जातो. त्या अर्थाने प्रेक्षकांनी व समीक्षकांनी गौरविलेल्या ‘शटर’ या मूळ मल्याळम चित्रपटाचा त्याच नावाचा रिमेक मराठीत तयार करण्यात आला आहे हा नजीकच्या काळातील एक नवा ट्रेण्ड ठरू शकतो.
मूळ मल्याळम चित्रपट सुप्रसिद्ध मल्याळम नाटककार, अभिनेते जॉय मॅथ्यू यांनी दिग्दर्शित केला असून २०१२मध्ये केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो दाखविण्यात आला होता. फेब्रुवारी २०१३ मध्ये तो केरळमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
रहस्यमय थरारपट असा रूढार्थाने या चित्रपटाचा प्रकार आहे. परंतु, त्या पलीकडे जाऊन कौटुंबिक, पारंपरिक विचारसरणी, नैतिकता असे अनेक पदर आहेत.
जित्या भाऊ या महाराष्ट्रातील निमशहरी भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यातील दोन दिवसांच्या कालावधीत घडणाऱ्या घटनांवरचा हा चित्रपट आहे. जित्या भाऊच्या घरासमोरच असलेल्या एका कोंदट अशा शटर बंद असलेल्या दुकानात जित्या भाऊ अडकून पडतो. तिथे एका वारांगनेशी त्याची भेट घडते. शटरच्या आतमध्ये बंदिवासात अडकून पडलेल्या जित्या भाऊच्या जीवनातील अतक्र्य आणि आश्चर्यकारक घटना २४ तासांत घडतात. जित्या भाऊ आणि वारांगना या दोन अनोळखी व्यक्तींची वैयक्तिक समीकरणे बदलून जातात. या दोघांच्या व्यतिरिक्त एक साधासरळ रिक्षावाला आणि एक चित्रपट दिग्दर्शक यांची समांतर कथानके गुंफण्यात आली आहेत. या सर्व व्यक्तिरेखांचे जीवन एकमेकांशी निगडित आहे हे त्या त्या व्यक्तिरेखांना माहीत नाही.
राष्ट्रीय पुरस्कारविजेते दिग्दर्शक व्ही. के. प्रकाश यांनी ‘शटर’चे दिग्दर्शन केले असून पटकथा-संवाद लेखन मनीषा कोर्डे यांनी केले आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबाच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटाचे कथानक घडते. पटकथेमध्ये पारंपरिक मूल्यांवर आधारित कुटुंबसंस्था, नैतिकतेच्या संकल्पना, लैंगिक नैराश्य, मैत्रीचे मूल्य, शिक्षणाचे महत्त्व, जनरेशन गॅप इत्यादी मुद्दय़ांना स्पर्श करण्यात आला आहे, असे दिग्दर्शक व्ही. के. प्रकाश यांनी म्हटले आहे.
समर्थ अभिनेता सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी प्रथमच मराठीच्या रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकणार असून जयवंत वाडकर, अमेय वाघ, राधिका हर्षे, कौमुदी वाळोकर, विद्या पटवर्धन, कमलेश सावंत, अनिरुद्ध हरिफ, साहील कोपर्डे, ललित सावंत यांच्या भूमिका आहेत. पंकज पडघन यांनी स्वरसाज चढविला असून अश्विनी शेंडे आणि मंगेश कांगणे यांनी गाणी लिहिली आहेत. संजीव एम्पी आणि प्रकाश बरो निर्माते असून ‘शटर’चे छायालेखन के. के. मनोज यांनी केले आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Story img Loader