lp00लग्नाच्या दिवशी विधी, नवरा-नवरी, नातेवाईक यांच्या फोटोंची रेलचेल सुरू असतेच. पण, त्याचबरोबर कार्यालयाच्या एखाद्या कोपऱ्यात एखादी छोटी मुलगी नाचत असते, दुसरीकडे एखादे आजोबा विधी बघण्यात गुंग झालेले असतात तर नवऱ्यामुलाची बहीण तिची खरेदी मैत्रिणींना दाखवत असते. मंडपात अशा वेगवेगळ्या घडामोडी सुरू असतात. खरं तर लग्नातच नव्हे तर लग्न ठरल्यापासूनच हे छोटेछोटे पण खूप काही देऊन देणारे क्षण कॅमेरात बंद करता येतात. या अशा संस्मरणीय क्षणांबद्दल..

लग्न जमले आणि आनंद सोहळा सुरू झाला. कुटुंबीयांनी आनंदाने फेर धरला आणि पावले थिरकली अधीर मनाने.. दागदागिने, कपडेपट, पत्रिका, विवाहस्थळ.. लग्नसोहळा सर्वागसुंदर करण्यासाठी निवड सुरू होते. मेकअप, डिझायनर साडय़ा, विविध समारंभ जसे हळद-मेहंदी, संगीत यावर बेतलेले विविध प्रकार व त्याच्या सादरीकरणाच्या कल्पना, त्यासाठी गुगलच्या साम्राज्यात जाहिरातींचा भडिमार, तऱ्हेतऱ्हेची वेडिंग व्यवस्थापन पुरवठा करणारी प्रदर्शनं आणि बरंच काही. बदल हा जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे. विवाह सोहळ्यांमध्येही काळानुरूप बदल होत गेले. लाल रंगाच्या सरबतापासून ते श्ॉम्पेनपर्यंत, पु.लं.च्या नारायणापासून ते इव्हेंट मॅनेजमेंटपर्यंत, केळीच्या पानाच्या पंगतीपासून ते बुफेपर्यंत, सोनार दादांच्या पेढीपासून नक्षत्र डायमंडपर्यंत आणि स्नोपासून ब्युटिपार्लर्स, स्पापर्यंत आमूलाग्र बदल झालेत. अशातच भर पडली निरनिराळय़ा पद्धतीने काढण्यात येणाऱ्या छायाचित्रांची व चलचित्रांच्या नाना प्रकारांची. या सर्व व्यापातून हाती उरतो तो फोटो अल्बम आणि लग्नाचा व्हिडीओ.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Shocking Dance Video
असा जीवघेणा डान्स तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल, तरुण टॉवरच्या रेलिंगवर उभे राहिले अन्…; पाहा धडकी भरवणारा VIDEO

जगातल्या कोणत्याही धर्मातले लग्न असो, मुलीची पाठवणी करताना मनात एक हुंदका येतो. विवाह समारंभात मित्र-मैत्रिणी कितीही हुंदडले तरी निरोप देताना सगळे सारखेच भावूक होतात. भाव-भावनांच्या या नयनरम्य सोहळय़ात काय करावे, कसे करावे यात संपूर्ण कुटुंब रमलेले असते. जे ज्ञात आहे, भावते पण दिसू शकत नाही ते चित्र साकारणे जमले पाहिजे. केवळ डॉक्युमेंट म्हणून काम न करता एक चालताबोलता आठवणींचा पट चित्रित करण्यात आणि नंतर त्याचा आनंद चिरकाल घेण्यात एक वेगळीच जादू असते. आपण खर्च करत असलेल्या पैशाला योग्य दिशा मिळाली तरच त्या दिवसांचा आनंद वर्षांनुवर्षे अनुभवता येतो.

या संकल्पनेची सुरुवात होते कुटुंबासमवेत घेण्यात येणाऱ्या गप्पाचर्चापासून. घरातील विवाहसमारंभाकरता आखलेले सर्व आयोजन समजून घेऊन समविचाराने प्रथम समारंभाची आखणी करावी. वेळेचे नियोजन विवाहस्थळांचे मूल्यमापन, वधू-वरांचे कपडेपट व त्यांची रंगसंगती, स्टाइल. प्रत्यक्ष लग्नसोहळय़ाबरोबर होणारे सर्व कार्यक्रम कसे असावेत याची सुस्पष्ट आखणी करावी.

आधुनिक तंत्रज्ञानाने हा आठवणींचा खजिना जतन करून ठेवण्यासाठी डिजिटल फोटोग्राफीचे वरदान आपल्याला मिळाले आहे. छाया प्रकाशाचा हा खेळ विविध अंगांनी टिपून एक अद्भुत दृश्य परिणाम आपण साधू शकतो. कलात्मक प्रकाशचित्रणासाठी विविध प्रकारची पूर्वतयारी करणे अत्यावश्यक असते. आंब्याच्या टाळय़ापासून ते वधू-वरांच्या आहारविहारापर्यंत, त्यांच्या लग्नपूर्व भेटींपासून, मेहंदी, हळद, विवाहसंस्कार, स्वागत समारंभ तसेच इतर आवश्यक साहित्य सामुग्री उदाहरणार्थ- लग्नाचे हार, मुंडावळय़ा, अमृत कलश, होमकुंड, पाट-चौरंग, सुपाऱ्या इ. गोष्टीकडे लक्षपूर्वक प्रत्यक्षपणे एक कलादिग्दर्शकच सुंदर, वेगळा आयाम देऊ शकतो. प्रकाशयोजना, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांची आखणी करणे हे त्या सोहळय़ाच्या आयोजनाचा अविभाज्य भाग आहे. कलादिग्दर्शकाच्या सल्ल्यानुसार तसेच दिलेल्या आखणीतून विविध छायाचित्रकारांनी lp30अनेक प्रकारच्या लेन्सेसच्या साहाय्याने या सोहळय़ाचे स्थिर व चल स्वरूपात विस्मयकारक रूपांतर करण्यासंबंधीचे कसब यात दिसून येते.

विवाह समारंभाच्या फोटोग्राफीत अ‍ॅक्शन रिप्ले नसतो. निमंत्रण पत्रिका, वधू-वर, माता-पित्यांची कपडे खरेदी, दागदागिने-मणी, मंगळसूत्र यांची निवड करताना फोटोग्राफी करण्यात एक वेगळीच मजा असते. प्रेमविवाह असो किंवा जमवलेले लग्न असो. कोणत्या वाटेवरून चालत आपला जोडीदार निवडला याची गोष्ट समजून घेतली तर एका लग्नाची एक साधी गोष्टही विलक्षण अनुभव बनून चित्रित हाते. ‘ही वाट कुणी मंतरली. जग झाले बघ झुलणारे..’ त्या झुलण्यातला मंत्र साकार होऊ लागतो. अशीच काहीशी गंमत केळवणाची. केळवणांची धम्माल मज्जा घेताना खाण्या-पिण्याच्या पदार्थाची निवड वर-वधूच्या प्रकृतीला समजून घेऊन विवाहपूर्व आहार नियोजन डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाते. ज्याचा उपयोग तुमचा चेहरा, केस व एकंदर व्यक्तिमत्त्व खुलण्याकडे होतो. व्यक्तिचित्रण करताना ते व्यक्तिमत्त्व चित्रण करता आले तर तो बाणा त्या फोटोत दिसून येतो. प्रकाशयोजना व पूर्व-पश्चिम दिशांची आखणी यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. जमल्यास कुटुंबीयांचा स्वभाव आणि शरीरतत्त्वाप्रमाणे जसे जल, वायू, आप, तेज यांचे प्रमाण वात, पित्त, प्रकृती समजण्यास मदत करते. विवाह संस्कार हे दोन व्यक्तींचे मीलन नसून दोन समाजांचे मीलन आहे. विविध भाव-भावनांचे आविष्कार त्यातील प्रत्येक क्षण जिवंत करीत असतो. फोटोग्राफीतील सर्व प्रकार एकाच ठिकाणी दिसणे हा त्यातला विशेष भाग आहे. फॅशन, ग्लॅमर, लहान मुले, वयस्कर मंडळी, लॅण्डस्केप, फूड, इंटीरिअर तर कधी कधी ‘वाइल्ड लाइफ’सुद्धा यात बघायला मिळते.

संपूर्ण विवाह समारंभाचे इव्हेंट मॅनेजमेंट न बनवता त्याचा ‘लाइव्ह इव्हेंट’ कसा होईल याकरिता कला दिग्दर्शक व दिग्दर्शक यांच्या सल्ल्यानुसार फोटोग्राफी करण्याची योजना आणि पूर्वतयारी अतिशय आवश्यक आहे. मार्केटमधील मॉल्समधून खूप गोष्टी आपल्याला भुरळ पाडतात. पण त्यातून नेमके निवडणे आवश्यक असते.

कॅन्डिड फोटोग्राफीबाबत नेमके एका वाक्यात सांगायचे झाले तर, ‘आय कॅन डिड, यू कॅन डिड बट् दॅट इज नॉट कॅन्डिड!!’ कॅन्डिडचा मराठीत अर्थ ‘विस्मयकारक क्षण’ असा आहे. जो केवळ नशिबाची साथ असेल तरच मिळतो. एका विवाह समारंभात १० कॅन्डिड मिळाले तर तो खरे तर कामावरील निष्ठेने दिलेला प्रसादाचा भाग असतो. ‘लग्न पहावे करून नि घर पहावे बांधून’ अशी म्हणच आहे आपल्यात. खर्चाची आखणी करताना कुठे व कशी करावी याचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून घेतल्यास अनावश्यक खर्च टाळता येतो. प्रिवेिडग, कॉफीटेबल बुक, लग्नाचा अल्बम, शॉर्टफिल्म, मुलाखतींचा व्हिडीओ असे नानाविध प्रकार पाहून नेमके काय करावे तेच समजत नाही. ‘अ‍ॅपॅक’च्या संकल्पनेतून या सर्व गोष्टींची आखणी केली जाते. त्यानंतर आपल्याजवळ राहाणाऱ्या फोटोग्राफीला आटरेग्राफीमध्ये साकार करण्यास मदत करते. एक वेगळा विचार, एक वेगळी वाट चोखंदळत आपणास याचा अनुभव घेता येईल. वेगळे, हटके काही करण्याची आवड व इच्छा असेल तर या कलेला एक अविस्मरणीय आयाम देता येतो.

(फोटो सौजन्य : अ‍ॅपॅक)

Story img Loader