लग्न म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर येतो तो थाटमाट, फुलांची सजावट, रांगोळ्या, दागदागिने, साडय़ा, कपडे, एसी हॉल, वेगवेगळ्या पदार्थाची रेलचेल, निरनिराळ्या पदार्थासाठी असलेले स्टॉल्स आदी गोष्टी. पण पूर्वाचं म्हणणं वेगळं होतं. तिला वाटायचं माझी तयारी झाली आहे का लग्नासाठी? मानसिक, शारीरिक? कोणतं वय हे लग्नाचं योग्य वय? मी आत्ता २३ वर्षांची आहे. मला इतक्यात लग्न करावंसं वाटत नाहीये. हेच सगळे प्रश्न घेऊन पूर्वा आली होती. अशा पद्धतीने विचार करणारी मुले-मुली फारच कमी.
आई-वडील म्हणाले म्हणून लग्नासाठी तयार झालोय..
माझ्या सगळ्याच मत्रिणींची लग्नं ठरली आहेत.
लग्नानंतर आíथक भार उचलण्यासाठी म्हणून मला आता लग्न करायला हवं..
आता मी सेटल झालोय..
सगळेच लग्न करतात..
मुंबईच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कॉर्पोरेट ट्रेिनगच्या वेळी ‘तुम्हाला लग्न का करायचंय?’ या प्रश्नाला दिलेली ही उत्तरे आहेत. गेली काही वष्रे सातत्याने अनेक लग्नांच्या मुला-मुलींशी मी बोलत आहे. प्रत्येक वेळी मला जाणवतं की, हे सगळे परफेक्ट पार्टनर शोधण्याची धडपड करतायत. सगळंच्या सगळं त्यांना अगदी जसं हवं आहे तसंच हवंय. त्यात जराही इकडे तिकडे झालेलं त्यांना चालत नाही. शिवाय असं असूनही आत्ताचं वय लग्नासाठी योग्य आहे का?, दोघांच्या वयात किती अंतर असायला हवं?, किती पसे मिळवले तर ते पुरेसे ठरू शकतात? मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा मी लग्नासाठी योग्य आहे का? अशा प्रकारचे गोंधळात टाकणारे प्रश्न त्यांना बेजार करत आहेत. त्यात घरातल्यांचं दडपण आहेच. राही म्हणाली, ‘‘माझ्या आईला प्रत्येक मुलगा चांगला वाटतो. परवाच एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्याची उंची होती फक्त ५ फूट सात इंच. माझीच उंची ५ फूट चार इंच. इतक्या कमी उंचीचा नवरा मला नकोय.’’ तर, आई म्हणते, ‘‘काय वाईट आहे त्याच्यात? बरं, मी जेव्हा गोंधळात पडते नं तेव्हा ती म्हणते, बघ बाई निर्णय तुझा आहे. जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तोवर आम्ही काही पुढे जाणार नाही. शेवटी तुला राहायचं बाई तिथे.’’
ज्या घरात लग्नाची मुलं-मुली आहेत त्या ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती आहे. घराघरात वाद आहेत. मुलं-मुली लग्नाला तयार नाहीयेत आणि त्यांच्या पालकांना वाटतंय की मुला-मुलींची लग्नं वेळेवर व्हायला हवीत. मुला-मुलींना लग्न तर करायचंय, पण अनेकांना लग्न करायची भीती वाटते. सुजाता म्हणाली, ‘‘माझं सध्या माझ्या घरी अगदी छान चाललंय. ते सगळं बदलायचं आणि मग दुसऱ्या घरात जाऊन त्या अनोळखी माणसांशी जुळवून घ्यायचं. त्यापेक्षा आहे हे बरं आहे.’’ हळूहळू मुला-मुलींचा आपलं घर हा कम्फर्ट झोन तयार होतो, त्यातून बाहेर पडणं त्यांना नको वाटतं. आणि मग सुरू होते परफेक्ट पार्टनर शोधण्याची धडपड. मग थोडी जरी कमतरता जाणवली की मग त्या स्थळावर फुली मारली जाते.
लग्न ठरण्यातले अनेक अडथळे आहेत. शिक्षण, पगार, सेटलमेंट, स्वत:चं घर या अपेक्षा तर आहेतच आणि त्यात भरीला भर म्हणून की काय पत्रिकेचं प्रस्थही खूप वाढल्याचं दिसतं. शिवाय लग्नाचं वयही वाढलेलं आहेच. वाढलेल्या वयाचा परिणाम मुलं आणि मुली दोघांवरही होतो. मुली स्थूलतेकडे झुकतात आणि मुलांच्या डोक्यावरचे केस विरळ होऊ लागतात, हा एक सर्वसाधारण दिसणारा प्रश्न आहे. यापेक्षा आणखी खोलात गेलं तर अनेक समस्या असल्याचं दिसून येतं. आजकाल पैशाला खूप महत्त्व असल्याचं दिसून येतं. मिळणाऱ्या भरभक्कम पगारामुळे आणि स्टेटसमुळे सर्वाधिक पसंती आयटी क्षेत्राला असल्याचं दिसून येतं. त्या खालोखाल एमबीए, सीए, सीएस, फायनान्स क्षेत्राला प्राधान्य असल्याचे दिसतं. पण कितीतरी क्षेत्रं लग्नाच्या दृष्टीने उपेक्षित असल्याचं दिसून येतं. पौरोहित्य करणाऱ्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न तर गंभीर आहे. वेगळ्या वाटेवरून चालणारे नवीन कुठल्यातरी करिअरला हात घालणाऱ्यांचीही लग्नं लवकर ठरताना दिसत नाहीत.
प्रेमविवाहाचंही प्लॅनिंग असतं. सगळी चौकट परिपूर्ण असेल तर प्रेमात पडलं जातं. शिवाय जवळपास सगळ्यांचा कल पुण्या-मुंबईतला जोडीदार शोधण्याकडे आहे. नव्याने उभारू पाहणारी कोल्हापूर, नाशिक, सांगली, मिरज, नगर, नागपूर अशी शहरंही नकोशी वाटतात. आपण सगळेच बदलणारे असतो. बदलणं हा माणसाचा स्थायिभाव आहे. असं असताना आयुष्याच्या सुरुवातीलाच मला हवा तसा जोडीदार मिळाला पाहिजे, असं म्हणणं हे कितपत वास्तवाला धरून आहे? समीरला स्लिम मुलगी बायको म्हणून हवी होती, पण स्वत: समीर मात्र आडव्या बांध्याचा होता. शिवाय डोक्यावरचे केसही विरळ होऊ लागले होते. पर्यायाने वय वाढू लागलं होतं पण तो त्याच्या विचारांशी ठाम होता. अपेक्षा ठरवताना स्वत:ला आरशात पाहायला विसरता कामा नये. किंबहुना तीच त्याची पहिली पायरी असते. आरशात फक्त दिसण्यासाठी पाहायचं नाही तर असण्यासाठीही पहायला हवं. नाहीतर राहीसारखी गत होते. राही फक्त बीकॉम झाली होती. शिवाय वेगळी अशी कोणतीच कौशल्यं तिच्याकडे नव्हती. पण तिला मात्र जोडीदार इंजिनीअर हवा होता. तसंच परदेशी जावं असंही तिला वाटत होतं. तिच्या ओळखीतल्या एका मुलाला ती हट्टाने भेटलीही होती. तो अमेरिकेत राहणारा होता. पण त्याने तिला साफ सांगून टाकलं की, त्याला तिथे काम करता येईल असं शिक्षण असणारी मुलगी हवी आहे. राही लाडात वाढलेली होती. हा नकार तिला पचवता आला नाही. पुढचे अनेक दिवस ती त्याच मूडमध्ये होती.
आपल्या मुला-मुलींच्या लग्नाच्या वेळी पालकांनीही सजगतेने काही गोष्टींचा विचार करायला हवा. केतकीला एक मोठी लग्न झालेली बहीण होती. ती कथ्थक विशारद झालेली होती. तिच्या सासरचा मोठा बंगला होता. लग्न होताच डान्सचे क्लासेस घेण्यासाठी वरच्या मजल्यावर त्यांनी एक मोठा हॉल बांधून घेतला. तिथे केतकीच्या बहिणीचे क्लासेस मोठय़ा दिमाखात चालू झाले. आता केतकीचं लग्न करायचं होतं. तिने ब्युटिपार्लरची परदेशातल्या इन्स्टिटय़ूटची मोठी डिग्री घेतली होती. आता तिच्या आईला वाटत होतं की, केतकीलाही तिच्या बहिणीप्रमाणेच श्रीमंत स्थळ मिळालं पाहिजे; जेणेकरून परत वरचा एक मजला बांधून तिला पार्लर सुरू करता येईल. वास्तविक केतकीची तशी अजिबातच इच्छा नव्हती. पण आईच्या हट्टापुढे तिचं काही चालेना. अशा पद्धतीच्या तुलनेमध्ये मुलं-मुलीच नाही तर पालकही अडकलेले दिसतात.
विक्रम तर त्याचे काही भन्नाट अनुभव सांगत होता. विक्रम चांगला शिकलेला एमई झालेला मुलगा, चांगल्या ठिकाणी नोकरी करणारा. तो काही दिवसांपूर्वी एका मुलीला भेटायला गेला होता. त्या मुलीने त्याला नेहमीसारखा एक स्टीरिओ टाइप प्रश्न विचारला, ‘‘तुझे फ्यूचर प्लान्स काय?’’ विक्रम म्हणाला, ‘‘काही नाहीत. गेली काही वष्रे खूप अभ्यास केला आहे. आता मस्त चार-पाच वष्रे मजा करणार आहे.’’ ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुला काही अॅम्बिशनच नाही. मला असा जोडीदार असावा असं वाटत नाही.’’ त्याच्या पुढच्याच आठवडय़ात तो एका दुसऱ्या मुलीला भेटला. तिनेही तोच प्रश्न विचारला. मागचा अनुभव जमेस धरून तो म्हणाला, ‘‘आता माझा पीएच.डी. करायचा विचार आहे.’’ ती म्हणाली, ‘‘अरे मग तुझं कुटुंबाकडे लक्ष कसं राहणार? पीएच.डी.ला कितीतरी अभ्यास करावा लागतो आणि चार-पाच वष्रे त्यातच गेली. असा नवरा मला कसा चालेल?’’ विक्रम खचलाच. मलाही हा अनुभव अंतर्मुख करून गेला. कदाचित आत्ता त्याला नसेल वाटलं पुढे शिकावं असं. पण आत्ताच हे ठरवणं म्हणजे काही काळ्या दगडावरची रेघ नाही. आणि एकमेकांच्या संगतीनं आपण बदलत नाही का?
या सगळ्याचा विचार करताना जाणवतं की, विवाहपूर्व समुपदेशनाची कधी नव्हे ती आज गरज भासू लागली आहे. कुटुंब न्यायालयातली आकडेवारी पाहिली तर घटस्फोटांची संख्या विलक्षण वेगाने वाढताना दिसून येते. सरला आली त्यावेळी विलक्षण निराश झाली होती. लग्नाला तीन महिने झाले होते. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं, सूरजचं पटतच नव्हतं. लहानसहान गोष्टींवरून त्यांचे वाद सुरू असायचे. घरातल्या पसाऱ्यावरून तर कुरबुरी चालूच असायच्या. तिचं म्हणणं असे त्याने थोडं आवरलं तर काय हरकत आहे? त्याला आवडतं नं नीटनेटकं घर, तर मग ती जबाबदारी त्याचीच आहे. अशा छोटय़ा छोटय़ा वाटणाऱ्या, पण प्रसंगी मोठं रूप धारण करणाऱ्या गोष्टीही बेबनावाकडे नेऊ शकतात.
लग्नानंतर समुपदेशनासाठी येणाऱ्या जोडप्यांकडे पाहून वाटतं की हे लग्नाआधी का नाही आले? लग्नाआधीच्या समुपदेशनामुळे अनेक गोष्टींची स्पष्टता यायला मदत होते. स्वत: कसे आहोत याचं डोळसपणे निरीक्षण करणं शिकता येतं. मला नेमकं कुठे जुळवून घेता येईल हे समजू शकतं. लवचिकता ठेवली तर गोष्टी सोप्या होतात याचं भान येतं. स्वत:चे कोअर इशू कोणते आहेत आणि ते होणाऱ्या जोडीदारासमोर कसे मांडायचे हेही समजतं. लग्नापूर्वी दोघांच्या तीन ते चार भेटी व्हाव्यात असं वाटतं आणि या प्रत्येक भेटीत कसंकसं पुढे जावं, काय बोलावं, याबद्दलची माहिती समजते. इतकंच नाही तर लग्न ठरल्यानंतर दोघांनी समुपदेशनासाठी यावं असं आम्ही सुचवतो. त्यातूनही एकमेकांशी कसं जुळवून घ्यावं, कसं समजून घ्यावं हे लक्षात येतं.
मधुरा आणि अतुल यांचं लग्न ठरलं होतं. जवळजवळ रोज ते भेटत होते. त्यानंतर अतुल तिला घरापर्यंत पोहोचवायला जात असे. मधुरा त्याला रोज घरी यायचा आग्रह करायची. पहिले दोन-तीन दिवस तो गेलाही. पण नंतर रोज घरी जाणं त्याला आवडायचं नाही. मधुराला वाटलं हा आत्ताच माझं ऐकत नाही, तर पुढे तो काय ऐकणार? ती अस्वस्थ झाली. मला म्हणाली, ‘‘काय हरकत आहे त्याने रोज घरी यायला? आपल्याकडे काही गोष्टी घरामध्ये सातत्याने बोलल्या जातात. त्यापकीच एक म्हणजे जावयाने जास्त वेळा बायकोच्या माहेरी जायचं नाही. त्यामुळे जावयाची किंमत कमी होते. हे वाक्य अतुलने इतक्या वेळा ऐकलं होतं की त्याचा वागण्याचा पॅटर्न नकळत ठरून गेला होता. अशा प्रकारच्या वागण्यामुळे मधुराने अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही हे तिच्याशी बोलल्यावर तिच्या लक्षात आलं. अशा अनेक गोष्टींचं निराकरण समुपदेशनाने होऊ शकतं. अनेकदा कोणाच्याही वागण्याच्या मुळाशी काय कारण असतं हे समजतं. त्यामुळेच विवाहापूर्वीच्या समुपदेशनाला आता पर्याय आहे असं वाटत नाही. मध्यंतरी एका जाहीर परिसंवादात पानपट्टीच्या दुकानाच्या संख्येएवढी समुपदेशनाची केंद्रं उभी राहायला हवीत असं मत एका तज्ज्ञ व्यक्तीने मांडलं होतं, ते खरं आहे. तुम्हाला काय वाटतं? जरूर कळवा.