गणपती या आबालवृद्धांना आवडणाऱ्या देवतेवर प्रेम नसलेला माणूस तसा विरळाच. अगदी स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्या अनेकांनाही गणपतीच्या या रूपाकाराचा मोह आवरता येत नाही. अर्थात ते त्याकडे कलाकृती म्हणूनच पाहतात. आपल्याकडे सर्वाधिक संशोधन या गणपतीवरच व्हायला हवे होते, पण दुर्दैवाने वस्तुस्थिती मात्र तशी नाही. गणपतीवरचे सर्वात महत्त्वाचे संशोधन केले आहे ते पॉल मार्टिन दुबोस या जन्माने फ्रेंच असलेल्या संशोधकाने. त्यांच्या संशोधनावर प्रकाशझोत टाकणारा अंक गेल्या वर्षी ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केला. त्याच वेळेस हेही लक्षात आले की, दुबोस यांनी घेतलेल्या गणेश मूर्ती- चित्र- शिल्प यांच्याही पलीकडे खूप गोष्टी अद्याप संशोधनाच्या कक्षेत येणे बाकी आहेत. त्यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की, संशोधन तर दूरच, आपण अद्याप गणपतीशी संबंधित गोष्टींचे धड दस्तावेजीकरणही केलेले नाही. बहुधा आपण या गणपतीला गृहीतच धरलेले दिसते. एखादी गोष्ट गृहीत धरली की, तिचे महत्त्वही अनेकदा नजरेआड होते. तसेच झाले असावे गणपतीच्याही बाबतीत. उत्सवाच्या धांगडधिंग्यात मश्गूल असलेल्यांना तर याचे सोयरसुतकही नाही. म्हणूनच या गणेश विशेषांक – भाग दुसऱ्याच्या निमित्ताने शक्य असेल तेवढे दस्तावेजीकरण करावे, ही ‘लोकप्रभा’ची यामागची भूमिका आहे. गेल्या वर्षी आम्ही देशाबाहेर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचे दस्तावेजीकरण केले होते. यंदा आम्ही आपल्याच राज्यातील शंभर वर्षे पार केलेल्या गणेश मंदिरांचे दस्तावेजीकरण केले आहे. अर्थात अद्याप खूप काम बाकी आहे. ‘लोकप्रभा’चा हा विशेषांक या व अशा अनेक उपक्रमांसाठी निमित्त ठरावा.
दस्तावेजीकरणाचा गणपती!
इंग्रजांनी मात्र येथील मठ-मंदिरांचे व्यवस्थित दस्तावेजीकरण केले.
Written by विनायक परब
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-09-2016 at 01:18 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on paul martin dubose research on ganpati