फ्रान्स, रशिया या देशांमधील राज्यक्रांती आपल्याला सुपरिचित आहे. २०११ साली मध्य पूर्वेतही उठाव झाला. कधी तरी एकदा भारतातही अशीच एक दिवस अचानक क्रांती होईलच, असे अनेक जण ठासून सांगतात; त्या त्या वेळेस काही समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ नेहमी हा युक्तिवाद खोडून काढताना सांगतात की, भारतात असे कधीही होणार नाही. कारण या देशाचा डीएनए सम्मीलनाचा- एकरूपतेचा आहे. आजवर जगभरात विविध ठिकाणी धार्मिक आक्रमणे झाली, स्थानिकांचे शिरकाणही झाले. भीतीने धर्मातरण झाले आणि आधीच्या धर्माचा मागमूसही राहिला नाही. धार्मिक क्रांती असे नावही त्याला देण्यात आले. धर्मातरण भारतातही झाले पण परिणाम वेगळा आहे. कारण तो इथल्या मातीचा परिणाम आहे. इथली मातीही सम्मीलनाची- एकरूपतेचा गुण ल्यालेली आहे. त्यामुळे इथे माणसाची ‘सांस्कृतिक स्मृती’ पिढय़ान्पिढय़ा कायम राहते. ‘सांस्कृतिक स्मृती’ ही मानववंशशास्त्रीय संकल्पना आहे.
एकरूपतेचा डीएनए!
वसईत माघी गणेशोत्सव मंडळ नाताळगोठय़ाचा देखावाही सादर करताना दिसते.
Written by विनायक परब
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2016 at 01:29 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Christmas and new year special christpuran father thomas stephens