विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
सायंकाळच्या वेळेस सारे चिडीचूप होत असताना ९ मार्च रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास अचानक एक क्षेपणास्त्र भारतातून अपघाताने डागले गेले. सिरसाहून निघालेले हे क्षेपणास्त्र सशस्त्र दलाच्या महाजन फायरिंग रेंजच्या दिशेने ४० हजार फूट उंचीवरून जात असतानाच ८० किलोमीटर्सचे अंतर पार केल्यानंतर अचानक क्षेपणास्त्राने दिशा बदलली. त्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीत सुमारे १०० किलोमीटर्स आतमध्ये हे क्षेपणास्त्र आदळले. सुदैवाने यात मनुष्यहानी झाली नाही. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने पत्रकार परिषद घेत ही घटना जगजाहीर केली. तर त्यानंतर भारताने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत अपघातानेच हे घडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना पाचारण करून दोन्ही देशांतर्फे संयुक्त चौकशीची मागणी केली. हा घटनाक्रम लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण गेल्या सुमारे सहा महिन्यांमध्ये भारत- पाक संबंधांमध्ये झालेल्या बदलांचा प्रभाव या घटनेवर स्पष्ट पाहायला मिळतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा