जगाचा आकर्षणिबदू आणि पर्यायाने मध्यिबदूही युरोप-अमेरिकेकडून आशिया खंडाच्या दिशेने सरकला त्याला आता दहा वष्रे तरी होत आली. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय चर्चा-परिसंवादांमधून उमटत आहेत. कोणत्या नव्या संकल्पनांचा आणि शब्दांचा वापर बहुतांश ठिकाणी होत असतो, त्याचप्रमाणे वाढतोही यावरून त्याचा अंदाज बांधता येतो. भविष्यातील महासत्तेचे दावेदार असलेले चीन आणि भारत असोत किंवा मग आजची महासत्ता असलेली अमेरिका किंवा पूर्वीच्या युरोपातील प्रबळ राहिलेले फ्रान्स, ब्रिटन, जर्मनीसारखे देश असोत किंवा मग भविष्याकडे आस लावून असलेले आफ्रिकन देश; सर्वाच्या तोंडी ‘इंडो-पॅसिफिक’ हा शब्दप्रयोग खूप मोठय़ा प्रमाणावर ऐकू येतो आहे. कारण भविष्यातील जगाचे बहुतांश व्यवहार हे याच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातून होणार आहेत. जगाचा ८६ टक्के व्यापार याच क्षेत्रातून होतो. यामध्ये भारताच्या भौगोलिक स्थानाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हाच परिसर हा साहजिकच मोठे व्यापारी सागरी क्षेत्र असल्याने जगभरातील सागरी चाच्यांचेही लक्ष्य असलेले क्षेत्र आहे. या संपूर्ण टापूमध्ये सर्वात वेगवान कार्यरत असलेले नौदल हा भारतीय नौदलाचा नवा परिचय आहे. १९९९ पासून या परिसरातील भारतीय नौदलाचे महत्त्व सातत्याने वाढते आहे. अलोण्ड्रा रेनबो या सागरी चाच्यांविरोधातील जगातील पहिल्या थेट समुद्रातील धाडसी कारवाईमागेही भारतीय नौदल आणि तटरक्षक दल होते. त्याचप्रमाणे मलाक्काच्या सामुद्रधुनीमध्ये सागरी चाच्यांच्या कारवाईला आळा घालणारेही भारतीय नौदलच होते. त्यामुळे अमेरिकन नौदल आणि व्यापारी नौकांनी या टापूमधून जाताना अधिकृतपणे भारतीय नौदलाची मदत घेतली आहे. आता हाच टापू जागतिक व्यापारउदिमाचा महत्त्वाचा टापू ठरला आहे. त्यामुळेच चीनलादेखील या टापूवर त्यांचेच वर्चस्व हवे आहे. एकुणात काय तर हा आता जगभरातील सर्वात महत्त्वाचा टापू असून त्याचा नवा परिचय ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र हा असल्याचे जगाने मान्य केला आहे.
बदलती परिमाणे!
सर्वाच्या तोंडी ‘इंडो-पॅसिफिक’ हा शब्दप्रयोग खूप मोठय़ा प्रमाणावर ऐकू येतो.
Written by विनायक परब
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-11-2017 at 01:05 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International politics asia india and china