सुमारे दीड वर्षांंपूर्वी संपूर्ण जगालाच करोना नावाच्या विषाणूने ग्रासले. त्या वेळेस अनेकांनी ‘वार्ता विघ्नाची’ या शब्दांमध्ये जगात भयकंप निर्माण करणाऱ्या महासाथीचे वर्णन केले. समर्थ रामदासस्वामींनी सुप्रसिद्ध आरतीमध्ये गणपतीच्या स्तुतीपर वर्णनात, त्याला ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ म्हणताना ‘वार्ता विघ्नाची’ असा उल्लेख केला आहे. इसवीसन पूर्व शतकांपासून विघ्न घेऊन येणारा विनायक म्हणून ओळखल्या गेलेल्या आणि नंतर गणपती म्हणून लोकमानसात रूढ झालेल्या गणेशाच्या रूपाकाराचा; त्याच्या त्या रूपाकाराच्या अन्वयार्थाचा आणि एकूणच शक्तिगणेश म्हणून समाजमनात दृढरूपाने मूळ धरण्याच्या त्याच्या स्थित्यंतराचा प्रवास अनोखा आहे. ‘लोकप्रभा’च्या या गणेश विशेषांकातील प्रणव गोखले व शमिका वृषाली यांचे अभ्यासपूर्ण लेख याच प्रवासाचे संशोधनात्मक वर्णन करणारे आहेत. गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता; त्यामुळेच ती बुद्धीने समजून घेणे क्रमप्राप्त ठरते.
मथितार्थ : संकटी रक्षावे!
करोनोत्तर गणेशोत्सवाचा आढावा प्रवीण वडनेरे यांनी घेतला आहे तर शिवाजी गावडे यांनी बदललेल्या गणेशोत्सवावर एक दृष्टिक्षेप टाकला आहे.
Written by लोकप्रभा टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-09-2021 at 01:41 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokprabha matitarth ganesh chaturthi 2021 ganesh festival 2021 ganeshotsav 2021 zws70