विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
तिसरे महायुद्ध झालेच तर ते आण्विक असेल, असा इशारा अगदी दोनच दिवसांपूर्वी रशियाने दिला आणि त्यानंतर युक्रेनवर बेतलेल्या या प्रसंगामागच्या इतिहासाची चर्चा जगभरात सुरू झाली. जगातील आजवरचा सर्वात मोठा आण्विक अपघात झाला ते चेर्नोबिलही युक्रेनमध्येच होते. हा अपघात १९८६ साली झाला. त्याच्या भीषणतेनंतर जग अण्वस्त्रमुक्त करण्याच्या मोहिमेस एनपीटीस जोरदार बळ मिळाले. एका बाजूला हे सारे होत असताना पलीकडे सोव्हिएत रशियाची वाटचाल ही विघटनाच्या दिशेने सुरू झाली होती. १९८९ साली बर्लिनची िभत पाडून पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले. १९९० च्या सुमारास युक्रेनच्या स्वतंत्रतेचे वारे अधिक बलशाली ठरले आणि पुढच्याच वर्षी युक्रेन स्वतंत्र झाला. युक्रेनला युरोपातील त्यांच्या समावेशाची आस लागून राहिली होती आणि त्यांच्यासमोर पेच होता तो एनपीटी या अण्वस्त्रमुक्ततेच्या कराराचा. या करारावर स्वाक्षरी केली नाही तर युरोपातील समावेशाची अडचण होती, अण्वस्त्रांमुळे र्निबध आले असते. युक्रेनमध्ये त्या वेळेस अण्वस्त्रमुक्त होण्याचीही एक चळवळ सुरूच होती. अखेरीस युक्रेनने सारी शस्त्रास्त्रे रशियाच्या ताब्यात दिली आणि देश अण्वस्त्रमुक्त झाला. जे युक्रेनच्या बाबतीत तेच कमीअधिक फरकाने कझागस्तान आणि बेलारूसच्याही बाबतीत झाले. त्यांना अण्वस्त्रमुक्त जाहीर करण्याच्या करारावर रशियाप्रमाणेच अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि चीननेही सह्या केल्या. हा तोच कालखंड होता, ज्या वेळेस नि:शस्त्रीकरणाच्या त्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारतासारख्या देशावर प्रचंड दबाव जागतिक पातळीवर आणला जात होता. आणि त्यासाठी युक्रेनसारखा देश नि:शस्त्रीकरणासाठी कसा आदर्श घालून देणारा ठरला आहे, याची उदाहरणे दिली जात होती. मात्र भारत या दबावाला बळी पडला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा