प्रतिवर्षी ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन येण्याच्या दोन दिवस आधीपासून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे संदेश सोशल मीडियावरून फिरू लागतात. पर्यावरण संवर्धनाचे संदेश असलेली टी शर्टस् घातलेली मंडळी त्या दिवशी हातात लहानसे रोपटे घेऊन दिसतात. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये सेलिब्रिटीज आणि मंत्री-संत्री यांचे वृक्षारोपण करतानाचे फोटो प्रसिद्ध होतात. अनेकदा खड्डा तोच असतो, दरवर्षी त्यात लावले जाणारे रोप बदलते, असे प्रकार याहीपूर्वी उघडकीस आले आहेत. म्हणजेच आपण जी झाडे लावल्याचे मिरवतो, त्याची पुरेशी काळजी घेणे मात्र टाळतो. पुतळा बसविणाऱ्यानेच त्याची काळजी घेण्याची तयारी दर्शविल्याशिवाय परवानगी मिळणार नाही, अशी नवीन तरतूद करण्याचे निश्चित झाले; तसेच आता झाडांच्या बाबतीतही करावे लागणार की काय अशी दुरवस्थाच आहे. अन्यथा एवढय़ा सर्व वर्षांमध्ये कोटय़वधींच्या संख्येने झालेल्या वृक्षारोपणानंतर अनेक सुस्थितीतील जंगलेच या देशात अस्तित्वात यायला हवी होती. पण तसे झालेले दिसत नाही. पर्यावरणाला आपण गृहीतच धरले आहे. पाऊस पडला नाही, अवकाळी पाऊस-गारपीट झाली, दुष्काळ पडला की, मग आपण पर्यावरणाच्या नावे गळे काढतो, या परिस्थितीला आपणच खरे जबाबदार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा