पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार टीका केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही संसदेत तोंड उघडले आणिभाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. खरे तर अर्थशास्त्राचा विचार करता ज्या पद्धतीने मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला व तो राबविला ते चुकीचेच होते. मात्र, राजकारणात चुकीचा निर्णयदेखील तुम्ही स्वत:ला फायदेशीर ठरेल या पद्धतीने कसा फिरवता याला अधिक महत्त्व असते, हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये खास करून उत्तर प्रदेश या देशाला सर्वाधिक खासदार देणाऱ्या राज्यातील दिग्विजयाने समस्त राजकीय विरोधकांना दाखवून दिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपासून सुरू झालेला भाजपचा अश्वमेध रोखण्यात विरोधकांना वारंवार अपयशच येते आहे. सुरुवातीस मोदी लाट असे लोकसभा विजयाचे वर्णन करण्यात आले. मात्र, लगेचच झालेल्या नवी दिल्लीतील निवडणुकांनी भाजपचा ‘आप’टीबार केला. दिल्लीतच सलग दुसऱ्यांदा झालेल्या निवडणुकांनंतर मिळालेल्या पुनर्वजियामुळे अरिवद केजरीवाल यांना आस्मान ठेंगणे झाले होते. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय, उधळलेली मुक्ताफळे त्यांच्या डोक्यात शिरलेले वारे स्पष्ट करण्यासाठी पुरेशी होती. पंजाबमधील निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाच्या राजकीय पटलावर आपलीच चर्चा राहणार, असे त्यांना वाटू लागले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांची पंजाबमध्ये नांदी होईल, अशी खरे तर त्यांना अपेक्षा होती. मात्र, आस्मान नव्हे तर केजरीवालच ठेंगणे आहेत, हे पंजाबातील पराभवाने त्यांना पुरते लक्षात आले असावे. गोव्यामध्ये तर त्यांच्या उमेदवारांवर अनामत रकमाही जप्त होण्याची वेळ आली. त्यामुळे राजकारणाच्या आखाडय़ात अद्याप बरेच धडे त्यांना शिकायचे आहेत, एवढे लक्षात आले तरी त्यांच्यासाठी ते पुरेसे असावे. संपूर्ण देशभरात मोदी लाट असताना पंजाबमध्ये झालेला पराभव हा भाजपसाठी उत्तरदिग्विजयानंतरही तेवढाच वर्मी बसणारा ठरावा. लाट कोणतीही असली तरी स्थानिक ज्वलंत प्रश्न हे सर्वाधिक महत्त्वाचे असतात, हा पंजाबमधील पराभवाने भाजपला दिलेला धडा आहे. अमली पदार्थाचा सुळसुळाट हा पंजाबच्या निवडणुकीतील सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता. मोदी लाटदेखील त्या मुद्दय़ावर मात करू शकली नाही.
उत्तरेचा अन्वयार्थ
अर्थशास्त्राचा विचार करता ज्या पद्धतीने मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला व तो राबविला ते चुकीचेच होते.
Written by विनायक परब
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-03-2017 at 01:05 IST
मराठीतील सर्व मथितार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh assembly election results 2017 bjp win