स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
तंत्रज्ञान ही एक अजबच गोष्ट आहे. तंत्रज्ञानाचा सातत्याने विकास व्हावा, त्यातून आपलं आयुष्य अधिक सुकर, अधिक समृद्ध व्हावं असं सर्वानाच वाटतं. तरीही विकासातले महत्त्वाचे टप्पे आपल्या मनात कुतूहल, आश्चर्याबरोबरच, भीती आणि संशयही निर्माण करतात. आज आपण अशाच एका टप्प्यावर उभे आहोत. एकीकडे मेटाव्हर्सच्या आश्चर्यकारक, आभासी विश्वाची नांदी झाली आहे, तर दुसरीकडे फाइव्ह-जीच्या भन्नाट वेगाचे, क्षमतांचे वेध लागले आहेत. नव्या वर्षांची सुरुवात करताना या नव्या तंत्रांच्या भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काही महिन्यांपूर्वीच फेसबुक या समाजमाध्यमातील बडय़ा कंपनीने यापुढे मेटा ही मूळ कंपनी असेल आणि यापुढे फेसबुकचा कारभार या कंपनीअंतर्गत चालेल, अशी घोषणा केली. या घोषणेपासून ‘मेटाव्हर्स’ हा शब्द तांत्रिक क्षेत्राच्या वर्तुळाबाहेर आला. हे काहीतरी वेगळे तंत्रज्ञान आहे किंवा फेसबुकनेच ते आणले आहे, असा समज झाल्याचे समाजमाध्यमांवर रंगलेल्या चर्चातून दिसते. मात्र मेटाव्हर्स एवढे मर्यादित नाही.

मेटाव्हर्स हे एखाद्या विशिष्ट कंपनी किंवा तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून, हा अनेक कंपन्या आणि विविध आधुनिक तंत्रज्ञानांचा मिलाफ आहे. ग्राहकाला अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याच्या स्पर्धेतून विकसित झालेली ही संकल्पना आहे. येत्या काही वर्षांत तिचा आवाका विस्तारत जाणार आहे. त्या अनुषंगाने मेटाव्हर्स म्हणजे काय, ही संकल्पना नेमकी आली कुठून आणि कधीपासून, त्यातील तंत्रज्ञान, त्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील फायदे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. मेटाव्हर्समुळे सध्याच्या मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक असणाऱ्या इंटरनेटची समीकरणं बदलून जाणार असल्याची चर्चा आहे.

मेटाव्हर्स म्हणजे काय?

मेटाव्हर्स हे एक विशिष्ट तंत्रज्ञान नसून ती एक संकल्पना आहे. एका आभासी विश्वात संवाद साधण्याचे किंवा माहितीची देवाणघेवाण करण्याचे माध्यम म्हणून मेटाव्हर्सकडे पाहिले जाते. आजपर्यंत आपण केवळ स्क्रीनच्या माध्यमातून द्विमितीय स्वरूपात गोष्टी अनुभवत होतो. मात्र आता मेटाव्हर्सच्या माध्यमातून आपण स्क्रीनच्या पलीकडे जाणार आहोत. डोळय़ांवर लावलेले व्हीआर गॉगल्स, मेटाव्हर्ससाठी खास तयार करण्यात आलेला आशय, त्यासाठी तंत्रज्ञानात केले जाणारे बदल यातून हे साध्य करता येणार आहे. आपण आपल्या घरात बसून आभासी जगात जाऊन एखाद्या ठिकाणाचा किंवा प्रसंगाचा वास्तवदर्शी अनुभव घेऊ शकणार आहोत. थोडक्यात आपण इंटरनेटच्या द्विमितीय जगातून त्रिमितीय किंवा बहुआयामी जगात प्रवेश करू शकणार आहोत. या प्रक्रियेत गेिमग, मनोरंजन, इंटरनेटवरील सेवा याबरोबरच इतर अनेक क्षेत्रांत आणि सेवांत आमूलाग्र बदल होणार आहेत.

या प्रक्रियेला बराच वेळ लागणार असला, तरी या प्रक्रियेने आता वेग घेतल्याचे पाहायला मिळते. कोविड-१९ च्या काळात अनेक क्षेत्रांतील कार्यपध्दती बदलली. ‘फिजिकल’ नाही तर ‘डिजिटल’वर अधिक भर दिला गेला. दूरदृश्य प्रणालीचा मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला. जी कामं आधी प्रत्यक्षात कार्यस्थळी जाऊन केली जायची तीच घरबसल्या होऊ लागली. त्यासाठी वापरली जाणारी ऑनलाइन यंत्रणादेखील अधिक परस्परसंवादी स्वरूपात विकसित होत गेली आणि यातूनच मेटाव्हर्स या संकल्पनेच्या विस्तारात भर पडत गेली. गेल्या दोन-तीन वर्षांत हे चित्र पाहायला मिळाले. फेसबुकने आपल्या मेटा या मुख्य कंपनीचे बोधचिन्ह ‘इन्फिनिटी सिम्बॉल’ सदृश ठेवले आहे. ते मेटाव्हर्सची अमर्यादता दर्शवणारे आहे. यात फेसबुकने आघाडी घेतली असली, तरी अनेक बलाढय़ कंपन्यांबरोबरच स्टार्टअप्स आणि लघुउद्योजकदेखील मेटाव्हर्सच्या विस्तारात योगदान देत आहेत. त्यामुळे या उद्योगांचा आणि ग्राहकांचा देखील फायदा होत आहे. काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय आणि काल्पनिक वाटणारी उपकरणं हळूहळू वास्तवात उतरताना दिसत आहेत.

मेटाव्हर्सचा इतिहास

मेटाव्हर्स हा शब्द सर्वप्रथम १९९२ साली निल स्टीफन्सन यांनी एका ‘सायन्स फिक्शन’ कादंबरीत वापरला. यातील ‘मेटा’चा अर्थ होतो ‘बियॉण्ड’ म्हणजेच पलीकडे आणि ‘व्हर्स’ म्हणजे ‘युनिव्हर्स’ अर्थात विश्व. थोडक्यात मेटाव्हर्स म्हणजे वास्तवाच्या पलीकडचे विश्व! या संकल्पनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध तंत्रांच्या वापराचे किंवा विकासाचे फार पूर्वीपासूनचे पुरावे उपलब्ध आहेत. १८३८ साली चार्ल्स व्हाइटस्टोन यांनी द्वीमितीय दृष्टी याविषयावर एक प्रबंध सादर केला होता. हा प्रबंध दोन डोळय़ांपैकी प्रत्येक डोळय़ासमोर एक-एक द्वीमितीय चित्र ठेवल्यास आपल्याला त्रिमितीय आकृती दिसते, या निरीक्षणावर आधारित होता. याचा विस्तार होऊन पुढे स्टिरिओस्कोप तंत्रज्ञान विकसित झाले, जे सध्याच्या आभासी वास्तव म्हणजेच ‘व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी’ या तंत्रज्ञानाचा आणि त्यावर आधारित उपकरणांचा पाया आहे. पुढे १९३५ मध्ये अमेरिकन लेखक स्टॅन्ली वेनबाम यांच्या एका सायफाय पुस्तकातील मुख्य पात्र आभासी जगात एका विशेष चष्मा घालून वावरताना दाखवले आहे. या पात्राला चव, गंध, आवाज हे सारे काही या चष्म्याद्वारे जाणवते, अशी कल्पना आहे. मोर्टन हेलिग यांनी १९५६ साली व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीसाठीचे पहिले उपकरण तयार केले. त्याद्वारे मोटारसायकल चालवल्याचा अनुभव आभासी स्वरूपात घेता येत असे. आजच्या आधुनिक व्हीआर उपकरणांसारखाच त्रीमितीय दृश्ये, ध्वनी आणि कंपनांचा अनुभव हे यंत्र देत असे. हेलिग यांनी १९६० साली पहिल्या ‘हेड माउंटेड डिस्प्ले’ उपकरणाचे पेटन्ट नोंदवले. या उपकरणात त्रीमितीय व्हिडीओ आणि स्टिरिओ एकत्रितपणे वापरले होते. १९७० मध्ये एमआयटीने कोलोरॅडोमधील एस्पेन शहराचा एक नकाशा तयार केला होता. या नकाशाच्या साहाय्याने संगणकाच्या माध्यमातून शहराची आभासी सहल घडवली जात असे. हा दळणवळण क्षेत्रात झालेला व्हीआर तंत्रज्ञानाचा पहिला वापर होता. ११९० साली ‘सेगा’ या गेिमग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने ‘सेगा व्हीआर-१’ या गतिविषयक आभास निर्माण करणाऱ्या उपकरणाची म्हणजेच ‘मोशन सिम्युलेटर’ची निर्मिती केली. कथा- कादंबऱ्यांतील आभासी जगाची वर्णने आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सुरुवातीच्या काळात झालेल्या प्रयत्नांचे वास्तव रंजक आहे. पूर्वीच्या तुलनेत आज आभासी जगाचे क्षितिज विस्तारले असले, तरीही यात येत्या काळात त्याला वेगाने नवे आयाम प्राप्त होणार आहेत.

मेटाव्हर्स आणि वेब ३.०

मेटाव्हर्सला वेब ३.० म्हटले जाते, त्याचे कारण म्हणजे इंटरनेट आणि वापरकर्ते यांच्या भूमिकांमध्ये होत गेलेले बदल. वेब १.० हे सुरुवातीचे डेस्कटॉप संगणकाचे युग होते, ज्यात वेबसाईट किंवा इंटरनेटवर उपलब्ध गोष्टी या युजर्सना केवळ वाचता किंवा पाहता येत. त्यावर प्रतिक्रिया देणे, बदल सुचवणे किंवा स्वत: बदल करणे, असे पर्याय उपलब्ध नव्हते. या व्हर्जनच्या त्रुटी भरून काढण्यासाठी वेब २.० अस्तित्वात आले ज्यामध्ये वापरकर्त्यांनादेखील इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करणे शक्य होऊ लागले. वेब २.० मध्ये ब्लॉिगग, ऑर्कुटसारखी समाजमाध्यमे  संकेतस्थळे, अगदी आतापर्यंतचे आधुनिक स्मार्टफोन तसेच फोर-जी तंत्रज्ञानापर्यंतच्या कालावधीचा समावेश होतो. वेब ३.० हे नव्याने आलेले इंटरनेटचे युग आहे, ज्यात इंटरनेट आणि वापरकर्ते यांच्यातील समीकरण पूर्णत: बदलून गेले आहे. मेटाव्हर्स आणि वेब ३.० ची एकत्रित सांगड घातली जाण्याचे कारण म्हणजे, यामधील तांत्रिक सेवा सुविधा. वेब ३.० मध्ये फाइव्ह जी, ब्लॉकचेन, ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी, व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. हे तंत्रज्ञानदेखील थेट मेटाव्हर्सशी निगडितच आहे. वेब ३.० मध्ये वापरकर्ते कोणत्याही मध्यस्थ कंपनी किंवा व्यक्तीशिवाय विविध सोयी-सुविधांचा थेट लाभ घेऊ शकतील. सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेल या संकल्पनेतून त्याला सुरुवातदेखील झाली आहे. वेब ३.० अधिक सुरक्षित, जलद, विकेंद्रित आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असणार आहे.

मेटाव्हर्सचे परिणाम

मेटाव्हर्समुळे ऑनलाइन संभाषणाचे स्वरूप बदलेल. या विश्वात आपली एक आभासी प्रतिकृती असेल जी आभासी जगात चालणे, बोलणे तसेच हात मिळवणे किंवा इतर प्रतिक्रिया देऊ शकेल आणि व्यक्त होऊ शकेल. दोन व्यक्ती या आपापल्या जागी बसलेल्या असल्या, तरी त्या एकमेकांना प्रत्यक्षात भेटल्या आहेत, असा भास निर्माण करता येईल. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बंगळूरु येथील एक जोडपं नुकतंच विवाहबद्ध झालं. मोठय़ा आकाराचे व्हीआर डोळय़ाला लावून स्क्रीनसमोर बसलो, की आपण लग्नाच्या हॉलमध्ये असल्यासारखा भास होतो. सारं काही डिजीटल असलं, तरी आपल्याला ते खरं वाटतं. 

या तंत्रज्ञानामुळे व्हच्र्युअल क्लासरूमसारख्या सुविधांचा विकास होईल. त्यामुळे घरबसल्या देशोविदेशातील अभ्यासक्रम करता येतील. व्हिडीओ कॉन्फरिन्सग प्रणालीमध्येदेखील बदल होऊन आपण प्रत्यक्ष कार्यालयात असल्याचा आभास निर्माण करता येईल. सध्या झूम, मायक्रॉफ्ट टीम्सद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्स करताना आपण जिथे बसलो आहोत, ती पाश्र्वभूमी बदलता येते. आपल्या घरातील किंवा कार्यालयातील दृश्याऐवजी आपल्याला हवे ते चित्र आपण लावू शकतो. ही या आभासी विश्वाच्या विकासाची सुरुवात म्हणावी लागेल.

मेटाव्हर्समधील प्रगतीचा गेिमगवर सर्वाधिक आणि सर्वात जलद प्रभाव पडणार आहे. गेम खेळणाऱ्यांना आता समोरच्या स्क्रीनवरचे एखादे पात्र ठरण्याऐवजी प्रत्यक्ष त्या दृश्याचा भाग असल्याचा थरारक अनुभव घेता येणार आहे. घरबसल्या मनोरंजनाचा हा नवा ट्रेण्ड तरुणाईला नक्कीच आकर्षित करेल. गेिमग म्हणजे केवळ ‘टाइमपास’ हा समज मेटाव्हर्सच्या विस्ताराबरोबर दूर होत जाईल. गेल्या काही वर्षांपासून गेिमगकडे करियर म्हणून पाहिलं जाऊ लगालं आहे. आता याच गेिमगच्या माध्यमातून घरबसल्या स्पर्धा जिंकून, बक्षिसांच्या माध्यमातून घसघशीत कमाई करता येणार आहे.

घर खरेदी विक्रीमध्येही मेटाव्हर्स तंत्र उपयुक्त ठरू लागले आहे. आजवर केवळ छायाचित्र आणि माहितीच्या आधारे घर पाहता येत होते. पण मेटाव्हर्स तंत्रज्ञानामुळे घरबसल्या एका शहरात बसून दुसऱ्या शहरातील घरात प्रत्यक्ष वावरण्याचा अनुभव मिळू लागला आहे. अर्थात ही सुविधा भारतात उपलब्ध होण्यास काही काळ जावा लागेल, पण हे सारं आपल्या आयुष्याचा भाग होणार हे मात्र निश्चित. भारतात सध्या अंतर्गत सजावटकार एखाद्या घराच्या वास्तुरचनेत कोणते बदल करणार आहेत, हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दाखवतात आणि ग्राहकांच्या गरजा आणि आवडींनुसार स्वरूप निश्चित करून नंतरच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात.

मेटाव्हर्समुळे आपण आभासी पर्यटन करू शकतो. घरबसल्या जगभरातील विविध ठिकाणे पाहून येऊ शकतो. व्हीआर हेडसेट आणि इतर सेन्सर्सद्वारे प्रत्यक्षात आवाज, गती तसेच एखाद्या विशिष्ट ठिकाणचे वैशिष्टय़ अनुभवू शकतो. मेटाव्हर्समुळे आर्थिक व्यवहारांतदेखील बदल होणार आहेत. नॉन फंजिबल टोकन्स (एनएफटी) हे या मेटाव्हर्समधील चलन असेल, असे सांगितले जाते. प्रत्यक्ष चलनाऐवजी या आभासी चलनाची देवाणघेवाण वाढेल.

वाहने, दागदागिने, चष्मे, कपडे इत्यादींची खरेदी करताना ते डिजिटली परिधान करून पाहता येतील. त्यामुळे खरेदीविषयी अंतिम निर्णय घेणे सोपे होईल.

अशाप्रकारे हे नवे तंत्रज्ञान आयुष्याच्या सर्व क्षेत्रांना व्यापून उरणार आहे.

मेटाव्हर्समधील तंत्रज्ञान

व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी

यामध्ये आभासी पद्धतीने वास्तवदर्शी अनुभव घेता येतात. व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये हेडसेट आणि स्क्रीन्सद्वारे त्रिमितीय चित्र पाहता येतात आणि आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा अनुभव घरबसल्या घेता येतो. आजकाल या उपकरणासह सेन्सर वापरले जातात ज्याद्वारे हावभावांचा, प्रतिक्रियांचाही अनुभव घेता येतो. आता निवडक सिनेमागृहांत अ‍ॅनिमेशन चित्रपट फोर-डीच्या माध्यमातून दाखवले जाऊ लागले आहेत, ते याच तंत्रज्ञानावर आधारित आहेत. 

ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटी

यामध्ये वास्तव घटक आणि आभासी घटकांचा मिलाफ करून संभाव्य परिणामांचा अंदाज घेता येतो. याचा वापर सध्या ऑनलाइन खरेदी, इंटेरिअर डिझाइन या क्षेत्रात पाहायला मिळत आहे.

ब्लॉकचेन

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर हा क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर केला जातो. ब्लॉकचेनद्वारे एक सुरक्षित जोडणी तयार होते ज्याद्वारे आर्थिक व्यवहार सुरक्षित होऊ शकतात. कोविड-१९ च्या काळात युनिव्हर्सल आयडी देतानादेखील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे.

मेटाव्हर्स क्षेत्रातील कंपन्या

‘मेटा’कडून या क्षेत्रात भरघोस योगदान दिले जात आहे. या कंपनीने एक व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केला आहे, ज्याद्वारे आभासी पद्धतीने आपण समाजमाध्यमांवर वावरू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो तसेच प्रवास देखील करू शकतो, असे सांगितले जाते. या घडामोडींमुळे इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडेल तसेच आर्थिक गणिते देखील बदलतील, असे मार्क झकरबर्गने म्हटले आहे.

गूगलकडूनदेखील एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन केले जात आहे. गूगल लेन्स, गूगल ट्रान्सलेटसारखी उत्पादने बाजारात आणून भविष्यात कोणते बदल होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. गूगल ट्रान्सलेटसारख्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने इतकी वर्षे संगणकाला समजणाऱ्या संगणकीय भाषेबरोबरच (प्रोग्रािमग लँग्वेज) बोलीभाषेतील शब्दांचेदेखील भाषांतर क्षणार्धात केले जाते आहे. तांत्रिक भाषेत याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हटले जाते. 

मायक्रोसॉफ्टने दूरस्थ प्रणालीमध्ये त्रिमितीय चित्रांचा समावेश करण्याचा आणि सहभागी व्यक्तींच्या त्रिमितीय आकृती डिजिटल स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न नुकताच केला. आता त्यात अधिक सुधारणा करण्यात येत आहेत. याचबरोबर अमेरिकन सैन्य दल हे मायक्रोसॉफ्टच्या मदतीने एका व्हीआर आणि एआर उपकरणाची निर्मिती करत आहे. या उपकरणाच्या साहाय्याने सैनिकांना युद्धाचे प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.

अ‍ॅपल ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटीच्या क्षेत्रात बरेच काम करत आहे. सध्या ते या तंत्रावर आधारित स्मार्ट ग्लासेसची निर्मिती करण्याच्या प्रयत्नांत आहेत. येत्या दोन वर्षांत हे उपकरण बाजारात पाहायला मिळू शकेल.

अ‍ॅमेझॉनचे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आभासी अर्थव्यवस्था निर्माण होईल, असे अ‍ॅमेझॉनचे म्हणणे आहे. याद्वारे ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ होईलच, शिवाय खरेदी करण्याच्या पद्धतीतदेखील बदल झालेला दिसेल. याचबरोबर अ‍ॅमेझॉनकडून मेटाव्हर्स क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक कारण्याबाबतदेखील सध्या चर्चा सुरू आहेत.

एन्व्हिडिया ही ग्राफिक्स क्षेत्रातील बलाढय़ कंपनी आपल्या नवीन उपकरणांमध्ये गेिमगचा अनुभव अधिक वास्तववादी करण्याच्या दृष्टीने व्हच्र्युअल आणि ऑगमेन्टेड रिअ‍ॅलिटीच्या मदतीने अनेक सुधारणा घडवून आणत आहे. काही वर्षांपूर्वी ‘रा-वन’ या चित्रपटात दाखवलेली लढाई ही नजीकच्या काळात आपल्याला आभासी स्वरूपात पाहायला मिळेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये, एवढय़ा झपाटय़ाने गेिमग क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामध्ये एन्व्हिडियासारख्या बलाढय़ कंपन्या हातभार लावत आहेत.

अशा प्रकारे कोणे एके काळी एका छोटय़ाशा अशक्यप्राय वाटणाऱ्या कल्पनेपासून सुरू झालेली वाटचाल आज मेटाव्हर्सच्या रूपात प्रत्यक्षात अवतरली आहे. आभासी जगातले हे बदल वास्तवात आयुष्याच्या प्रत्येक्ष क्षेत्रात अनेक बदल घडवून आणणार आहेत.