कोणाचा परफॉर्मन्स कोणाच्या नंतर, अमुक एका स्किटमधल्यांची एंट्री नेमकी कुठून आहे हे तपासणं, सूत्रसंचालक स्टेजच्या कोणत्या बाजूला उभे राहतील हे ठरवणं, पहिल्या परफॉर्मन्सचे कलाकार तयार झालेत का हे बघणं, सन्मानचिन्हांची तपासणी करणं. अशा एक ना दोन तपासण्या, काळजी, विचार ‘तिथे’ जाणवत होते. कलाकार तयार होत होते. तयार झालेले एकदा त्यांचा परफॉर्मन्स आठवत होते. काही जण कार्यक्रमाची रूपरेषा इतरांना समजावून सांगत होते तर काही शांत बसले होते. काही परफॉर्मन्समध्ये लागणाऱ्या वस्तूंची यादी तपासत होते तर काही पाणी पिऊन स्वत:ला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करत होते. असं हे सगळं चित्र ‘तिथे’ दिसत होतं. हे ‘तिथे’ म्हणजे बॅक स्टेजला. आता म्हणाल, बॅक स्टेजला हे असं चित्र? तर, सर्वसाधारणपणे बॅक स्टेजला सगळीकडे असंच चित्र बघायला मिळत असलं तरी या बॅक स्टेजमध्ये काही खास होतं. कारण हे बॅक स्टेज होतं मिक्ता पुरस्कार सोहळ्याचं. मराठी इंडस्ट्रीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा. या सोहळ्याच्या बॅक स्टेजला म्हणजे पडद्यामागे इतक्या विचारांचं, काळजीचं चित्र याचसाठी होतं की जेणेकरून प्रेक्षक आणि इंडस्ट्रीतल्या लोकांचं मनोरंजन करण्यात काहीही कमी पडता कामा नये. आणि म्हणूनच सगळी कलाकार मंडळी तसंच पडद्यामागचेही कलाकार मेहनत घेताना दिसत होते. दुबईच्या अल नसर लिझर लँड येथे ‘कलर्स मिक्ता २०१५’ हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. मिक्ताचं यंदाचं पाचवं वर्ष. पहिला मिक्ता पुरस्कार सोहळा दुबईतच साजरा करण्यात आला होता. मराठी इंडस्ट्रीला परदेशात नेऊन मराठी सिनेमा, नाटकांचा गौरव करण्याची संकल्पना ही पहिलीच. त्यामुळेच हा सोहळा कलाकारांसाठी महत्त्वाचा ठरतो. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुरस्कार सोहळ्याची वेळ जवळ येत होती तसतशी कलाकारांमधली धाकधूक आणि प्रेक्षकांमधली उत्सुकता वाढत होती. कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. गष्मीर महाजनी, भार्गवी चिरमुले, प्रिया बापट या कलाकारांनी गणेशवंदना करून कार्यक्रमाची दणक्यात सुरुवात केली. पहिल्याच परफॉर्मन्सने दुबईतले मराठमोळे प्रेक्षक भारावून गेले. मराठीचा सध्याचा लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरीच्या परफॉर्मन्सला त्याच्या दुबईतल्या चाहत्यांकडून पसंती मिळाली. मृण्मयी देशपांडे, ऊर्मिला कानिटकर, पूजा सामंत आणि मयूरेश पेम यांनी ‘मेरा जुता है जपानी’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘हसता हुआ नुरानी चेहरा’ या गाण्यांवर फ्युजन स्टाइलने ताल धरले. भालचंद्र कदम अर्थात सगळ्यांचे लाडके भाऊ कदम, भारत गणेशपुरे, समीर चौगुले, सागर कारंडे असे तगडे विनोदी कलाकार असल्यावर स्किट न होणं केवळ अशक्य. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची स्किट्स गाजवली. कार्यक्रमाच्या मध्येच संजय नार्वेकरने तुफान एंट्री घेत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. या कार्यक्रमात लक्षवेधी ठरला तो ऑर्केस्ट्राचा भाग. अमित सयानी स्टाइलने निवेदन करत अभिनेता पुष्कर श्रोत्रीने या ऑर्केस्ट्राची धुरा सांभाळली. या ऑर्केस्ट्राचं वैशिष्टय़ असं की, एरवी टीव्ही, सिनेमात बघत असणाऱ्या कलाकारांची गाणी ऐकण्याची मेजवानी यामध्ये मिळाली. वैभव मांगले, सुनील बर्वे, प्रसाद ओक, केतकी माटेगांवकर, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर या कलाकारांनी त्यांचं गायनकौशल्यही प्रेक्षकांना दाखवलं. प्रेक्षकांनीही त्यांना मनमुराद दाद दिली. याच ऑर्केस्ट्राचा यूएसपी ठरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा परफॉर्मन्स. ‘चांदण्यात फिरताना’, ‘पिया तू’, ‘मस्त कलंदर’ अशी तीन गाणी सादर करत त्यांनी प्रेक्षकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. लोकप्रिय गायक-संगीतकार हरिहरन यांनी ‘जीव रंगला’, ‘चंदा रे’ ही गाणी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. नायिकांनी दमदार परफॉर्मन्स दिले. अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, श्रुती मराठे, संस्कृती बालगुडे, दीपाली सय्यद, मानसी नाईक या तारकांनी अनेक मराठी-हिंदी गाण्यांवर आपली नृत्याची अदा पेश केली.
मराठी नाटय़-सिनेसृष्टीतील प्रतिभावंतांच्या कर्तृत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेणारा हा सोहळा १८ ते २२ फेब्रुवारीदरम्यान दुबईत रंगला. दुबईतील तमाम मराठी रसिक प्रेक्षकांच्या हाऊसफुल गर्दीत रंगलेल्या पाचव्या ‘कलर्स मिक्ता’ पुरस्कार सोहळ्यात ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस’ या नाटकाने तर ‘रेगे’ या चित्रपटाने बाजी मारली; तर चित्रपट विभागात ‘रेगे’ या सिनेमासाठी सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार अभिजित पानसे या नवोदित दिग्दर्शकाला देण्यात आला. दिग्दर्शनासह संवाद, छायांकन, पटकथा आणि कलादिग्दर्शन या पुरस्कारांवर ‘रेगे’ या सिनेमाने छाप पाडली. ‘रेगे’सह ‘फँड्री’ आणि ‘लय भारी’ या सिनेमांनीही पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा सन्मान किशोर कदम यांना मिळाला, तर सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांना सवरेत्कृष्ट बालकलाकार म्हणून सन्मानित करण्यात आलं. याच सिनेमासाठी अलकनंदा दासगुप्ता यांना पाश्र्वसंगीतासाठी गौरविण्यात आलं. ‘अस्तु’ हा चित्रपटही काही पुरस्कारांचा मानकरी ठरला. मोहन आगाशे यांना सवरेत्कृष्ट अभिनेता, इरावती हर्षे यांना सवरेत्कृष्ट अभिनेत्री, अमृता सुभाष यांना सवरेत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘लय भारी’च्या संगीतासाठी अजय-अतुल, खलनायकाच्या भूमिकेसाठी शरद केळकर, संकलनासाठी आरिफ शेख यांना गौरविण्यात आलं. ‘लय भारी’ या सिनेमाला प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार देण्यात आला. तसंच रितेश देशमुखला प्रेक्षकांच्या पसंतीचा मान मिळाला. ‘यलो’ साठी सवरेत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार गुरू ठाकूर यांना देण्यात आला, तर ‘टाइमपास’साठी स्वप्निल बांदोडकर हे सवरेत्कृष्ट गायक आणि ‘पोस्टकार्ड’साठी कविता कृष्णमूर्ती या सवरेत्कृष्ट गायिका ठरल्या. सवरेत्कृष्ट संगीत संयोजकाचा बहुमान ‘सलाम’ चित्रपटाकरिता अनमोल भावेंना देण्यात आला. ‘पोश्टर बॉईज’च्या यशस्वी निर्मिती पदार्पणासाठी श्रेयस तळपदे, तर सवरेत्कृष्ट उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शन पदार्पणाकरिता समीर पाटील यांना गौरवले गेले. नाटक विभागामध्ये विशेष ज्युरी अवॉर्ड ‘झोपाळा’ या नाटकाला देण्यात आला, तर ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकास प्रेक्षकांची पसंती लाभली. पुनरुज्जीवित नाटकांमध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटकाने बाजी मारली. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रियदर्शन जाधव यांना ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस’ या नाटकाकरिता दिला गेला, तर चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांना त्याच नाटकासाठी सवरेत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. शिवाय या नाटकातील प्रकाशयोजनेकरिता भूषण देसाई तसंच वेशभूषेसाठी अपर्णा गुरम आणि मीरा वेलणकर यांना गौरविले गेले. ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ नाटकासाठी साहाय्यक अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, तर ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकासाठी शशांक केतकर यांना साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘आम्ही सौ. कुमुद.’ या नाटकानेही अनेक पुरस्कार पटकावले. या नाटकाचे लेखक वीरेन प्रधान, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये आणि संगीतकर मिथिलेश पाटणकर हे सवरेत्कृष्ट ठरले.
यंदाचा मिक्ता पुरस्कार सोहळ्याच्या महत्त्वाच्या अर्थात ‘गर्व महाराष्ट्राचा’ या पुरस्काराचे मानकरी ठरलेत पटकथाकार-लेखक सलीम खान. त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी अभिनेते नाना पाटेकर हेही उपस्थित होते. सलीम यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. हा पुरस्कार आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं सांगत सलीम खान यांनी उपस्थित मराठी रसिकजनांची मने जिंकून घेतली. ‘महाराष्ट्र आणि मराठी लोकांशी माझे जवळचे नाते आहे. माझी पत्नी सुशीला ही मराठी असून आमच्या सहजीवनाला आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्यासाठी हा पुरस्कार विशेष असून तो माझ्या घरचा पुरस्कार आहे’, असं ते त्या वेळी म्हणाले. सातासमुद्रापार आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दिग्गजांना या वर्षीपासून ‘झेंडा रोविला’ हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी घोषणा सोहळ्यात करण्यात आली. यंदा हा पुरस्कार विख्यात वास्तुरचनाकार अशोक कोरगांवकर यांना देण्यात आला. राज ठाकरे, सलीम खान, हेलन, नाना पाटेकर, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, हरिहरन, अरबाज खान, सोहेल खान या मंडळींमुळे सोहळा शानदार ठरला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रसंचालन केले स्वप्निल जोशी आणि जितेंद्र जोशी यांनी. त्यांच्या विनोदी शैलीत त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ते शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान या लोकप्रिय जोडीने केले. सुनील बर्वे, सुलेखा तळवलकर आणि सचिन खेडेकर यांनीही काही पुरस्कार विभागांचे सूत्रसंचालन केले. स्वप्निल-जितेंद्रचे सूत्रसंचालन इतरांच्या तुलनेत उजवे ठरले. या सोहळ्याचं प्रक्षेपण ई टीव्ही मराठीवर लवकरच बघता येईल.
चैताली जोशी