आदित्य बिवलकर – response.lokprabha@expressindia.com
सध्या लग्नसराईचा मौसम आहे. लग्नामध्ये छायाचित्रकारांकडे वेगवेगळय़ा प्रकारचे कॅमेरे दिसतात. पारंपरिक डीएसएलआरबरोबरच आता लहान कॅमेरेसुद्धा दिसू लागले आहेत. वजनाने हलके आणि दिसायला जरासे वेगळे असणारे हे कॅमेरे नेमके कोणते, त्यांत नेमके कोणते तंत्र वापरण्यात आले आहे, याबद्दल अनेकांना कोडे आहे. हे आहेत मिररलेस कॅमेरे. यामध्ये पारंपरिक डीएसएलआरपेक्षा जरासे वेगळे तंत्र पाहायला मिळते. या कॅमेऱ्यांविषयी जाणून घेऊ या..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अलीकडच्या काळात हौशी तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. या स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कंपन्यासुद्धा नवनवे प्रयोग करत असतात. याच प्रयोगांतून काही वर्षांपूर्वी मिररलेस कॅमेराचा जन्म झाला. साधारण १० वर्षांपूर्वी पॅनसॉनिक कंपनीने ही संकल्पना प्रथमच जगासमोर आणली. मात्र त्या वेळी पारंपरिक डीएसएलआर कॅमेऱ्यांना पसंती मिळत होती, त्यामुळे हा प्रयोग सुरुवातीला तितकासा यशस्वी ठरला नाही. कॅमेऱ्यांच्या उत्पादनासाठी करावा लागणारा खर्च जास्त होता. खर्च आणि किमतीचे आर्थिक गणित न जुळणारे होते. शिवाय त्याचे तंत्र छयाचित्रकारांना नीटसे अवगत नव्हते, त्यामुळे त्या वेळी या कॅमेऱ्यांना विशेष प्रतिसाद मिळाला नाही.
कालांतराने या तंत्रज्ञानात प्रयोग झाले. या नव्या तंत्राचे फायदेसुद्धा सर्वाना उलगडू लागले, त्यामुळे आता लोक हळूहळू मिररलेस कॅमेऱ्याकडे वळू लागले आहेत. खासकरून मॉडेल फोटोशूट्स, वन्यप्राण्यांचे छायाचित्रण आणि लग्न-समारंभांच्या छायाचित्रणासाठी मिररलेस कॅमेऱ्यांचा वापर केला जाऊ लागला आहे. फोटोग्राफीसाठी हे कॅमेरे क्रांतिकारक ठरले आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
मिररलेस कॅमेरा म्हणजे काय?
एसएलआर कॅमेरामधून मिरर काढला तर तो मिरररलेस कॅमेरा होईल. वास्तविक, मिररलेस कॅमेऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडर असतो. कॅमेरा ऑन केला की सेन्सरवर पडणाऱ्या इलेक्ट्रॉनिक सिग्नलवर आधारित चित्र इलेक्ट्रॉनिक व्ह्य़ू फाइंडरमध्ये दिसते.
तंत्रज्ञान
डीएसएलआर कॅमेऱ्यामध्ये ओव्हीएफ अर्थात ‘ऑप्टिकल व्ह्यू फाइंडर’ वापरला जातो, म्हणजेच व्ह्यू फाइंडरमध्ये जे चित्र दिसते ते लेन्समधून आधी मिररवर आणि त्यानंतर पेंटा प्रिझममधून व्ह्यू फाइंडरमध्ये दिसते, याउलट मिररलेस कॅमऱ्यामध्ये पेंटा प्रिझम मिरर या सर्वच गोष्टी वगळून इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडर दिला आहे, जो कॅमेऱ्याच्या सेन्सरच्या सिस्टीममधून फीड घेतो आणि व्ह्यू फाइंडरमध्ये चित्र दर्शवतो. त्यामुळे छायाचित्र नेमके कसे येणार आहे हे आधीच समजते. परिणामी छायाचित्रकाराचे काम सोपे होते, शिवाय फोटो अधिक चांगले येतात.
डोळय़ासमोर जो दिसतो तो प्रकाश आणि ती रंगसंगती नेमकी टिपण्यासाठी हे कॅमेरे अतिशय उपयुक्त ठरतात, असे छायाचित्रकार सांगतात.
सायलेंट शटर
विवाहांचे किंवा वन्यजीवांचे छायाचित्रण करणारे या फिचरमुळे मिररलेस कॅमेऱ्याला पसंती देतात. या छायाचित्रकारांना अनेकदा पूर्णपणे शांततेत काम करावे लागते. अशा वेळी शटरचा आवाजसुद्धा व्यत्यय ठरू शकतो. त्यावर उपाय म्हणून मिररलेस कॅमेरा हा एक उत्तम पर्याय ठरतो. या कॅमेरामध्ये सायलेंट शटरची विशेष सोय आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक शटर काम करते. यात शटरचा आवाज येत नाही. या कॅमेऱ्यामध्ये मिरर नसल्याने फोटो काढल्यावर आवाज येत नाही. त्याचबरोबर शटरमध्ये फस्र्ट कर्टन, सेकंड कर्टन असे दोन भाग असतात. त्यांचा योग्य वापर करून छायाचित्रकारांना योग्य फोटो काढणे शक्य होऊ शकते.
परफेक्ट पिक्चरच्या दृष्टीने उपयोगाचा
कोणत्याही छायाचित्रकाराला डोळय़ांनी दिसते, तसेच्या तसे कॅमेऱ्यात टिपायचे असते. मात्र अनेकदा फोकस, प्रकाश, शटरचे तंत्र आणि अन्य अनेक तांत्रिक बाबींमुळे योग्य छायाचित्र मिळू शकत नाही. आपल्या मनासारखे छायाचित्र टिपणे हा छायाचित्रकाराच्या कौशल्याचा भाग असला, तरी अनेकदा कॅमेऱ्यातील त्रुटीही त्रासदायक ठरतात. त्या दृष्टीने मिररलेस कॅमेरा उपयोगी ठरू शकतो असे छायाचित्रकारांचे म्हणणे आहे. हाय रिझोल्युशन व्ह्यू फाइंडरच्या मदतीने छायाचित्रण अधिक सोपे होते. इलेक्ट्रॉनिक व्ह्यू फाइंडरच्या मदतीने छायाचित्र नेमके कसे येणार हे आधीच माहीत असते. त्यात चुका कमी होतात. व्हिडीओसाठीसुद्धा याचा वापर केला जातो. अलीकडे अनेक वेबसीरिज त्याचबरोबर लघुपटांसाठीसुद्धा मिररलेस कॅमेऱ्याचा वापर केला जातो. यातील स्टॅबलायिझग फिचर्समुळे फिल्ममेकर्स या कॅमेऱ्याचा वापर करतात. कमी प्रकाशात छायाचित्रण करताना डीएसएलआरमध्ये ज्या अडचणी जाणवतात त्या दूर करण्यात या तंत्रज्ञानाला यश आले आहे.
वजनाने हलके कॅमेरे
छायाचित्रणासाठी एकाच वेळी भरपूर साहित्य घेऊन प्रवास करावा लागतो. मिररलेस कॅमेऱ्याला पसंती देण्यामागे हेदेखील कारण आहे. सामान्य डीएसएलआर कॅमेऱ्यांपेक्षा हे कॅमेरे कमी वजनाचे असतात. शिवाय त्यांचा आकारसुद्धा लहान असतो, त्यामुळे प्रवासात ते नेणे, त्यांची काळजी घेणे आणि हाताळणे सोपे जाते. खिशात मावेल अशा पद्धतीने या कॅमेऱ्याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे लेन्सशिवाय हे कॅमेरे सहज कुठेही नेता येऊ शकतात. मिरर आणि पेंटा प्रिझम नसल्याने कॅमेऱ्याचा आकार कमी झाला आहे. यासाठीच्या लेन्सची रचनासुद्धा कॅमेऱ्याप्रमाणेच आहे. या लेन्स इतर लेन्सपेक्षा लहान असतात. आपल्याकडे जुन्या लेन्स असतील तर त्यांचा वापरसुद्धा छायाचित्रकार यात करू शकतात. इतर कॅमेऱ्याच्या लेन्स लावण्यासाठी त्या त्या प्रकारचे कनेक्टर वापरावे लागतात.
कॅमेऱ्याचे आयुष्य जास्त
प्रत्येक कॅमेऱ्याला एक ठरावीक आयुष्य असते. डीएसएलआर कॅमेऱ्यापेक्षा मिररलेसमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आधुनिक असल्याने याचे आयुष्य जास्त असल्याचे छायाचित्रकार सांगतात. किंमत काहीशी जास्त असली तरीही, त्याच्या फिचर्समुळे त्याला अधिक पसंती दिली जात आहे. कॅमेऱ्यामध्ये सुटय़ा भागांचे प्रमाण कमी असल्यामुळे ते अधिक काळ टिकतात. प्रतिकूल हवामानातसुद्धा हे कॅमेरे चांगले काम करतात.
पर्याय अनेक
आपल्या खर्चाच्या तयारीनुसार मिररलेस कॅमेऱ्यामध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्येसुद्धा फुल फ्रेम आणि हाफ फ्रेमचा पर्याय ग्राहकांना आहे. सोनी, निकॉन, कॅनन, फुजी यांसारख्या वेगवेगळय़ा कंपन्यांचे पर्याय आहेत. सोनीच्या मिररलेस कॅमेऱ्याला ग्राहक विशेष पसंती देत आहेत. ४० हजार रुपयांपासून दीड ते दोन लाखांच्या घरात विविध पर्याय आहेत. त्याचप्रमाणे लेन्ससुद्धा वेगवेगळय़ा दरात उपलब्ध आहेत.
(छायाचित्र सौजन्य : विकिपीडिया)