अलीकडे तरुणाईला सारे काही पोर्टेबल आणि वापरायला चांगले व उत्तम गुणवत्ता असलेलेच लागते. त्यातही नवीन काही बाजारात आले की, त्यावर तरुणाईच्या उडय़ा सर्वप्रथम पडतात, असा अनुभव आहे. साहजिकच आहे की, त्यामुळे बाजारात नवीन उत्पादन आणणाऱ्या कंपन्यादेखील तरुणाईला लक्ष्य करूनच त्यांच्या जाहिराती करतात. यामागील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाजारपेठेतील ट्रेंडदेखील ही तरुणाईच ठरवत असते. अशा या तरुणाईच्या सळसळत्या बाजारपेठेत सध्या तीन उपकरणांची चलती आहे. ही उपकरणे पुढीलप्रमाणे :-

तरुणाईला नेहमीच मिरवता येतील आणि वापरायलाही छान असतील व खिशाला परवडतील असे फोन लोकप्रिय ठरतात. याच बाबी नजरेसमोर ठेवून मायक्रोमॅक्स या कंपनीने भारतात सर्वप्रथम तरुणाईची मोठय़ा स्क्रीनची आशा-अपेक्षा कमी किंमतीत पूर्ण केली. पण ती इच्छा काही एकटय़ा तरुणाईची नव्हती तर एकूणच भारतीय मध्यमवर्गाची ती आशा होती. त्यामुळे मध्यमवर्ग या स्वस्तातील आणि चांगल्या फोनवर तुटून पडला. तरुणाईने तर मायक्रोमॅक्सला आपल्या गळ्यातील ताईतच बनवले.
मध्यंतरी भारतीय बाजारपेठेत दाखल झालेला डुडल थ्री तर आता तरुणाईच्या हाती खेळताना दिसतो. भारतीय मानसिकतेला काय हवे आहे, याची जाण या कंपनीला नेमकी आलेली दिसते. इंग्रजी न जाणणारा असा खूप मोठा ग्राहक वर्ग आहे, हे लक्षात आल्यानंतर आता मायक्रोमॅक्सने थेट २१ भारतीय भाषांमध्ये वापरता येईल असा मायक्रोमॅक्स युनाइट २ हा नवीन फोन बाजारात आणला आहे. यात इंग्रजी, हिंदीबरोबरच मराठी, पंजाबी, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू, आसामी, कन्नड, उडिया, बंगाली, काश्मिरी, नेपाळी, बोडो, डोग्री, कोंकणी, मैथिली, मणिपुरी, संस्कृत, सिंधी या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.
केवळ एवढेच याचे वैशिष्टय़ नाही, तर यासाठी १.३ गिगाहर्टझचा प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तर अगदी लेटेस्ट म्हणावी अशी अँड्रॉइड ४.४.२ ही किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. याचा डिस्प्ले ४.७ इंचाचा असून या आयपीएस डिस्प्लेचे रिझोल्युशन ८०० गुणिले ४०० आहे. तर यासाठी २००० एमएएच बॅटरी वापरण्यात आली आहे. यासाठी १ जीबी रॅम आणि मागच्या बाजूस
५ मेगापिक्सेल तर समोरच्या बाजूला २ मेगापिक्सेल कॅमेरा वापरण्यात आला आहे. याशिवाय एलईडी लाइटची सोयही देण्यात आली आहे.
‘मोटो इ’ला टक्कर देण्यासाठी मायक्रोमॅक्सने हे मॉडेल बाजारपेठेत आणल्याची चर्चा आहे. म्हणूनच त्याची किंमतही त्यांनी ‘मोटो इ’ एवढीच म्हणजेच ६ हजार ९९९ एवढी ठेवली आहे. ‘मोटो इ’ ला अल्पावधीतच अँड्रॉइड बजेट फोन म्हणून लोकांनी स्वीकारले होते. आता त्याला मायक्रोमॅक्सशी टक्कर द्यावीच लागेल, असे दिसते आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत- रू ६,९९९/-

प्लॅन्ट्रॉनिक्स व्हॉएजर – केवळ सुश्राव्य नव्हे, तर स्पष्ट आवाज
सध्याचे दिवस हे व्हेअरिअबल टेक्नॉलॉजीचे आहेत. प्रसंगी मग या व्हेअरिअबल टेक्नॉलॉजीसाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागले तरी तरुणाईची त्यासाठी तयारी असते. ब्लूटूथचा वापर वाढला आहे. कॉलेज कॅम्पस्मध्ये ब्लूटूथ वापरणारी मुले- मुली अधिक संख्येने नजरेस पडतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फ्री टॉक पॅकेजेस किंवा फ्रेंडस् पॅकेजेस. यामध्ये दोन मोबाइलमधील संभाषण फ्री असते. साहजिकच कॉलेजमधील तरुणाई या पॅकेजला अधिक पसंती देते आणि भरपूर बोलते. किमान अर्धा तास संवाद हा तर तसा रोजचाच झाला आहे, असे अलीकडेच एका सर्वेक्षणात लक्षात आले आहे. आणि अर्धा तास बोलायचे तर हात फोन पकडून दुखू लागेल किंवा मग मान तरी. तरुणाईला हेही पसंत नसते. त्यांना बोलता बोलता कामेही करायची असतात. मग अशा वेळेस व्हेअरिअबल टेक्नॉलॉजीला पर्याय नसतो. इअरफोन मदतीला धावून येतात. पण आताशा ते वायर असलेले इअरफोन आऊ ट आणि ब्लूटूथ वायरलेस इअरफोन इन आहेत.
जाब्रासारख्या कंपन्यांचे चांगले ब्लूटूथ सध्या साडेतीन हजारांच्या आसपास उपलब्ध आहे. अगदी सुरुवातीच्या काळात ब्लूटूथ घेताना काहीशी घाई होते आणि केवळ फोनवर बोलणे एवढेच गृहीत धरलेले असते. पण खरेदी झाली की मग लक्षात येते की, रेडिओ एफएमदेखील त्यावर ऐकता यायला हवे. सध्या बाजारात दीड हजारांच्या आसपास उपलब्ध असलेल्या ब्लूटूथमध्ये रेडिओ एफएम ऐकण्याची सोय नाही. मात्र अडीच हजारांच्या पुढे गेल्यानंतर त्या ब्लूटूथमध्ये वायरलेस गाणी किंवा रेडिओ ऐकण्याची सोय मिळू शकते.
पण आता प्लॅन्टऑनिक्ससारख्या कंपन्यांनी याहीपुढे पावले टाकत काही नवीन सुविधा देऊ केल्या आहेत. कंपनीने अलीकडेच त्यांच्या व्हॉएजर मालिकेमध्ये एज नावाचे नवीन ब्लूटूथ बाजारात आणले आहे. आटोपशीर आकाराचे डिझाइन याबरोबरच नॉइज आणि विंड कॅन्सेलेशन ही त्याची खास वैशिष्टय़े आहेत. म्हणजेच आपण बोलत असताना अचानक वारा सुरू झाला तर त्याचा घूँ घूँ असा आवाज समोरच्या बाजूस ऐकणाऱ्याला सतत येत राहतो. पण तुम्ही या ब्लूटूथचा वापर करत असाल तर हा आवाज आणि फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीशिवाय येणारे इतर आजूबाजूचे आवाज वजा जाता बोलणे स्पष्टपणे ऐकू येते. म्हणूनच याचे वर्णन करताना कंपनीने केवळ सुश्राव्य नव्हे तर सुस्पष्ट आवाज असे म्हटले आहे. काळ्या व पांढऱ्या अशा दोन रंगांमध्ये हे ब्लूटूथ उपलब्ध आहे.
केवळ एवढेच नव्हे तर यात फोन आलेल्या व्यक्तीचे नावही आपल्याला ऐकू येते. म्हणजेच कॉल कुणाकडून येतो आहे हे समजण्यासाठी फोन पाहण्याची गरज नाही. तुमचे हात पूर्णपणे मोकळे राहतात. तसेच व्हॉइस कमांडस्च्या माध्यमातून तुम्ही फोन घेऊ शकता. त्यासाठीही फोनला हात लावण्याची गरज नाही. असे हे खऱ्या अर्थाने हॅण्डस्फ्री उपकरण आहे.
भारतीय बाजापेठेतील किंमत- रू ७,४९०/-

पोट्रेनिक्स क्युबिक्स – पोर्टेबल स्पीकर्स
तरुणाई ही नेहमीच म्युझिकवेडी असते. पूर्वी हे वेड केवळ स्वत:पुरते मर्यादित होते. मात्र आताशा परिस्थिती तशी राहिलेली नाही. तर त्यांना तो म्युझिकचा आनंद शेअर करायचा असतो. मध्यंतरी ट्रेंड होता तो एकच इअरफोन एकेका कानाला शेअर करण्याचा. पण त्यात केवळ दोघेच शेअर करू शकतात. आणि कॉलेजमध्ये तर ग्रुप असतात. मग त्यावर आता पर्याय आला आहे तो पोर्टेबल स्पीकरचा. त्यामुळे तरुणांच्या सॅकमध्ये आता पोर्टेबल वायरलेस स्पीकर्स हे नेहमीचेच झाले आहेत. त्यातही आता टॅब्लेट, पीसी, एमपीथ्री प्लेअर, स्मार्टफोन अशा कोणत्याही गोष्टीला पेअर करता येतील, असे स्पीकर्स हा नवा ट्रेंड आहे.
हा ट्रेंड लक्षात घेऊनच आता पोर्ट त्यातही आता टॅब्लेट, पीसी, एमपीथ्री प्लेअर, स्मार्टफोन अशा कोणत्याही गोष्टीला पेअर करता येतील, असे स्पीकर्स हा नवा ट्रेंड आहे.
ह ट्रेंड लक्षात घेऊनच आता पोट्रेनिक्स या कंपनीने क्युबिक्स हे नवीन पोर्टेबल स्पीकर्स बाजारात आणले आहेत. नोटबुक किंवा इतरही कोणत्या ऑडीओ अनेबल उपकरणाबरोबर ते पेअर करता येतात. महत्त्वाचे म्हणजे तरुणाईला रंगांचे आकर्षण असते. हे स्पीकर्स पिवळा, लाल व निळ्या रंगात उपलब्ध आहेत. शिवाय खिशालाही सहज परवडणारे..
भारतीय बाजारपेठेतील किंमत – रू १,२९९/-

Story img Loader