गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. याच सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या वर्षी गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.