मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्य हे कायमच स्वप्नांवर जगणारं असतं. कधी कधी त्याची स्वप्नं पुरी होतात, कधी नाही. पण तो स्वप्न पाहत राहतो. गरज असते ती, त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याची. केवळ मध्यमवर्गीय चौकटीत अडकून न राहता, उडी मारू की नको असा विचार करणाºयांचा विचार सोडून द्याा, पण जे उडी मारतात त्यांना संकटं तर अनेक असतातच, पण स्वप्नाची पूर्तता हा त्यांचा जगण्याचा भाग बनतो. मग एक स्वप्न झालं की पुढचं स्वप्न तयारच असतं. कदाचित थोरामोठ्यांच्या स्वप्नापेक्षा ही स्वप्न छोेटी असतील पण ती आपली असतात. मग ही केवळ पडद्याावरची गोष्ट न उरता, तुम्हा-आम्हा सर्वांचीच होऊन जाते. केवळ मध्यमवर्गापुरती न राहता अशी स्वप्नं पाहणाºया सर्वांची होतात. या तुम्हा-आम्हा सर्वांच्या गोष्टीवरच डबल सीट बेतला आहे. संगीत, संवाद, अभिनय, दिग्दर्शन अशा अनेक आघाड्यांवर ही गोष्ट तुम्हाला आपलीशी करणारी आहे. फक्त गोष्ट थोडीशी लांबलेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा