हे वाचून काहीतरी भलतंसलतं लिहिलंय असं वाटलं ना ? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी की ही गोष्ट अगदी खरी आहे. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. आणि म्हणूनच इथे तुम्हाला याबद्दल काही सांगावं म्हणून लिहिलं आहे. महाराष्ट्रामध्ये भटकंती करीत असताना खरोखरच काही चमत्कारिक ठिकाणे, त्यांचे संदर्भ आपल्याला आश्चर्यचकित करतात. त्यांचे उगम शोधू गेलो तर एक तर मिळत नाहीत, आणि जे मिळतात ते थक्क करणारे असतात. गडिहग्लज हे गाव आणि तिथल्या िहगुळजा देवीबद्दल असेच काहीसे म्हणावे लागेल. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शीर जिथे पडले ते स्थान आता पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात िहगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानी बीबी किंवा िहगुळजादेवी हे िहदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. हे जरी िहदूंचे तीर्थस्थान असले तरीदेखील इथली मुसलमान जनता नानी बीबी या नावाने या देवीची पूजा करतात असे सांगितले जाते. तीच िहगुळादेवी गडिहग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली. एका छोटय़ाशा टेकडीवर वसलेले हे मंदिर आहे. िहगुळादेवीचा गड म्हणून गडिहग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजिया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार िहगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडिहग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठय़ा व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली. िहगुळादेवीचे अजून एक मंदिर राजस्थानमध्ये िहगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यतदेखील ही िहगुळादेवी असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते. गडिहग्लज गावाला लागूनच असलेल्या छोटय़ा टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. मंदिर परिसर अत्यंत शांत असून तिथून सगळ्या गावाचा परिसर न्याहाळता येतो. या डोंगराला गुड्डाईचा डोंगर या नावानेच ओळखले जाते. या डोंगरावरून खाली आले की भडगावमध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल, कमल अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात. नाईक घराण्यामध्ये परंपरागत देवीची पूजा चालू आहे. गडिहग्लज गाव आणि सारा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. सुप्रसिद्ध गिरिस्थान आंबोलीच्या जवळच असलेला हा प्रदेश पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी येऊन मुद्दाम या आगळ्यावेगळ्या िहगुळादेवीचे दर्शन आवर्जून घ्यावे.
हिंगुळजा देवी – पाकिस्तानातून गडिहग्लजला
हे वाचून काहीतरी भलतंसलतं लिहिलंय असं वाटलं ना ? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात येणं अगदी स्वाभाविक आहे.
आणखी वाचा
First published on: 26-09-2014 at 01:21 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri special