आपल्या पुराणकथांमधून आढळणारी देवीची विविध रूपे आपल्याला परिचित आहेत. तशीच विविध रूपे पाश्चात्त्य पुराणकथांमधूनही आढळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नमो देव्य महादेव्य शिवाय सततं नम:।
नम: प्रकृत्य भद्राय नियता: प्रणता: स्म ताम्।

‘‘जी शिवाशी एकरूप झालेली आहे, त्या महादेवीला आमचे सदैव वंदन असो. जी या संपूर्ण विश्वाचा मूलस्रोत आहे, जी मांगल्याची कारक आहे, त्या जगन्नियंत्या शक्तीपुढे आम्ही नतमस्तक आहोत.’’
अशी जिची स्तुती गायली जाते, त्या महादेवीची गुणरूपे अनेक आहेत, परंतु तिचे मूलस्वरूप हे मातेचेच आहे, अशी भारतीय मनाची धारणा आहे. देवीचे गुणरूप कोणतेही असो, त्या गुणरूपाचे नाव काहीही असो, आपण तिला सहजपणे ‘आई’ म्हणून संबोधत तिच्याबरोबर सहजसुलभ जवळीक प्रस्थापित करतो. ही आई कर्मफलदायिनी आहे. चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट हा तिचा प्राकृतिक न्याय आहे. ही धारणा जोवर आपल्या मनात दृढ असते, तोवर चांगल्या कर्मावरील आपली निष्ठा अढळ असते. महादेवीने केलेले शासन हेसुद्धा वैश्विक कल्याण साधणारेच असते, कारण अमंगलाचा नाश हे त्या शासनाचे अंतिम फल असते. म्हणूनच तिच्या रौद्र, भयकारी रूपातही ती मांगल्याची कारक ठरते.
आपल्या धारणा आणि निष्ठा पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या पुरातन कथांच्या आधारे घडत असतात. त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम पोथ्यापुराणे सांगणारे पुराणिक आणि लोककलाकार यांच्यामार्फत चोख होत असते. या पुरातन कथांच्या पोटामध्ये विश्वाची उत्पत्ती, आकाशस्थ ग्रहतारे, त्यांची गती, पृथ्वीवरील ऋतुचक्र, मानवी जीवनाला उपयुक्तगोष्टींची देवादिकांकडून मिळालेली देणगी, विविध धार्मिक आचारविधी, अशा अनेक विषयांवरील स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याचे बाज स्थलकालाप्रमाणे ठरत जातात. देवादिकांच्या पुरातन कथांची परंपरा इतर देशांमध्येही आढळते. या कथांमधून त्या कथा रचणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचे दर्शन घडते. देवदेवतांच्या कथा मानवी कल्पनाविश्वातूनच निर्माण झालेल्या असतात, त्यामुळे त्या करणाऱ्या मानवी समाजाची स्वभाववैशिष्टय़े आणि धारणा यांची प्रतििबबे त्या कथांमध्ये आपोआपच उमटतात.
देवीचे मातृरूप समाजमनात ठसत गेले, ते मानवाच्या जिवंत राहण्याच्या धडपडीतून. अन्नदात्री आणि प्रजननाची अधिष्ठात्री हे तिचे मूलस्वरूप. अश्मयुगीन काळापासूनच तिची प्रतिमा ही त्या मूलस्वरूपाची अभिव्यक्ती करणारी होती. तिचे तेच स्वरूप आजतागायत कायम राहिले. मात्र काळानुरूप त्याचे नवनवीन पैलू पुढे येत गेले आणि त्यानुसार तिचे मूíतविज्ञानही अधिकाधिक विकसित होत गेले. तिची गुणरूपे आणि नामे यांची संख्या वाढत गेली. प्रत्येक गुणरूपाचे वैशिष्टय़ सांगणाऱ्या कथा रचल्या गेल्या. अश्मयुगीन मातृदेवतेच्या प्रतिमा तिचे स्तन आणि जननेंद्रिय यांच्या उठावावर भर देणाऱ्या होत्या. कृषितंत्राचा विकास होऊन मानवी समाज संघटित झाले, याचा ठसा मातृदेवतेच्या संदर्भातील संकल्पना, अभिव्यक्ती यांवर उमटणे अपरिहार्य होते. सर्व जीवमात्रांचे जीवन जिच्यावर अवलंबून आहे अशा धरित्रीलाच मातृरूप दिले गेले. कृषिजीवनातील सर्वाधिक महत्त्वाचे प्राणी म्हणजे गाय आणि बैल. पृथ्वी ही माता आणि आकाश हा पिता यांची प्रतीके म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. नंदी हा शिवाचे वाहन म्हणून आपल्याला परिचित आहे. मात्र वृषभ हा शिवाचे आदिरूप रुद्र याचे प्रतीक आहे. रुद्राला त्याचे नाव त्याच्या घुमणाऱ्या तीव्र आवाजामुळे मिळाले. तो आवाज घोंघावणाऱ्या वादळाचा आहे. विनाशाची आठवण करून देणारा म्हणून भयकारी आहे, माजावर आलेल्या बलाच्या आवाजाशी तुलना होणारा आहे. वृषभाच्या रूपातला रुद्र पावसाशी आणि सुफलनाशी संबंधित आहे. साहजिकच अंगावर पाऊस झेलणारी, सुफलित होणारी पृथ्वी आणि रुद्र यांचे नाते अन्योन्य आहे. तेच नाते पुढे पार्वती आणि शिव यांच्यातले आहे. अशी प्रतीकात्मतेची सूत्रे विणली जाऊन भारतीय पुरातन कथांचे अनेकपदरी वस्त्र विणले गेले आहे.
समुद्रमंथनाची कथा सर्वपरिचित आहे. समुद्रमंथनातून निघालेले अमृत देवांमध्ये वाटण्याची कामगिरी विष्णूंनी मोहिनीचे रूप घेऊन पूर्ण केली. त्यानंतर अमृतमंथनातून निघालेल्या अप्सरांबरोबर ते पाताळात निघून गेले आणि तेथेच रमले, त्यांना ‘स्व’रूपाची आठवण उरली नाही, अशी कथापरंपरा आहे. विष्णू पाताळातच रमल्यामुळे विश्वाचे पालन करण्यास कोणी उरले नाही. त्यामुळे ब्रह्मदेव शिवाकडे गेले. शिवांनी वृषभाचे रूप धारण करून पाताळात प्रवेश केला. तिथे त्यांनी विध्वंस मांडला. ‘स्व’रूपाचा विसर पडलेले विष्णू वृषभाचे रूप घेतलेल्या शिवापुढे युद्धासाठी उभे राहिले. त्या युद्धामध्ये विष्णू वृषभाच्या धडकेने खाली पडले. वृषभाने त्यांना िशगांनी घोसळायला सुरुवात केली आणि त्यांना ‘स्व’रूपाची आठवण झाली. ते पाताळातून स्वस्थानी परतले, असा कथाभाग आहे.
प्रतीकात्मक सूत्रांनी विणल्या गेलेल्या पुरातन कथांच्या समृद्ध परंपरा भारतीय संस्कृतीप्रमाणेच इतर संस्कृतींमध्येही आहेत. ‘उतू’ हे मेसोपोटेमियाच्या प्राचीन सुमेरियन संस्कृतीमधील सूर्यदेवतेचे नाव होते. ‘मार्डुक’, उतूचा पुत्र हा सुमेरमधील बॅबिलोन या शहराचा अधिष्ठाता देव आणि चंद्रदेवता होता. चंद्रकोर आणि वृषभाची िशगे यांतील साम्यामुळे वृषभ हे मार्डुकचे प्रतीक मानले गेले. इजिप्तमध्ये ‘एपिस’ या वृषभदेवतेचा संप्रदाय होता. कृषिप्रधान संस्कृतींमध्ये वृषभ हे पुरुषतत्त्वाचे आणि सामर्थ्यांचे सहजसिद्ध प्रतीक म्हणून विकसित झाले. त्याचप्रमाणे गाय हे स्त्रक्तत्वाचे आणि नवनिर्मितीचे सहजसिद्ध प्रतीक बनले. भारतीय परंपरेत पृथ्वीचे प्रतीक म्हणून गाय पवित्र मानली गेली. सुरभी, ही स्वर्गीय गाय समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या रत्नांपकी एक होती. प्राचीन इजिप्तमधील ‘हॅथोर’ ही मातृदेवता गायीच्या रूपात कल्पिलेली होती. ग्रीक परंपरेत तिचे नाव होते, ‘अॅफ्रोडिटी’ आणि रोमन परंपरेत, ‘व्हिनस’. हॅथोर ही सौम्य स्वरूपाची देवी होती. मात्र एका प्रसंगात ती रक्तपिपासू बनल्याची कथा आहे. हॅथोर ही सूर्यदेव ‘रा’ याची पत्नी. पृथ्वीवरील काही लोक आपल्या पतीला ठार मारण्याचा कट रचत आहेत, असे समजल्यानंतर त्या लोकांना शासन करण्यासाठी तिने रौद्र रूप धारण केले. या रौद्र रूपात ती सिंहमुखी आहे आणि तिचे नाव आहे ‘सेखमेत’. सेखमेतच्या रूपात तिने पृथ्वीवर मांडलेला विनाश आवरणे कठीण झाले.

देवीच्या आल्हाददायक मातृरूपाप्रमाणेच तिचे भयकारी शक्तिरूप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही दोन्ही रूपे देशोदेशींच्या पुरातन कथांच्या परंपरांमध्ये अभिव्यक्त होताना दिसतात. अनेकदा त्यासाठी उपयोगात आणलेल्या मूळ प्रतिमांमध्ये कमालीचे साम्य दिसते, हे आतापर्यंत वर्णन केलेल्या अगदी मोजक्या उदाहरणांमधूनही स्पष्ट होते. परंतु स्थलकालानुसार त्यांमध्ये काही टोकाचे फरकही आढळतात. ज्या समाजमनाच्या मुशीत देवदेवतांचे स्वरूप आकाराला येते, त्या समाजाचा स्वभाव देवदेवतांच्या वर्तनातूनही प्रतििबबित होतो. जगभरातील पुरातन कथांच्या परंपरांमध्ये या घटिताची असंख्य उदाहरणे पाहावयास मिळतील. 
शतपथ ब्राह्मणात ‘श्री’ या देवीचे गुणरूप वर्णन केलेले आहे. त्यानुसार, प्रजापती प्राणिमात्रांची निर्मिती करत असताना निर्माण झालेल्या त्याच्या तेजातून ‘श्री’ जन्माला आली. ‘श्री’चा अर्थ आहे, भाग्य आणि सौंदर्य. तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या देवांना ती हवीशी वाटली. तेव्हा ते प्रजापतीला म्हणाले, ‘‘आपण हिला मारून हिच्याजवळ जे आहे ते सर्व घेऊ या’’ यावर प्रजापतीने ती स्त्रक असल्याने तिची हत्या न करता, तिच्याजवळचे तुम्हाला जे हवे, ते सर्व घ्या, असे सांगितले. प्रजापतीची संमती मिळाल्यानंतर अग्नीने तिच्याजवळून अन्न घेतले, सोमाने राजसत्ता घेतली, वरुणाने विश्वाचे सार्वभौमत्व घेतले, सूर्याने दिव्यपद घेतले, इंद्राने राजपद घेतले, बृहस्पतीने तिचे तेज घेतले, सवित्याने तिचे राज्य घेतले, पूषनने तिची संपत्ती घेतली, सरस्वतीने तिची समृद्धी घेतली आणि त्वष्टय़ाने तिचा सौंदर्यपूर्ण आकार घेतला. प्रजापतीने तिला या सर्व देवांना यज्ञातून आहुती दे आणि तुझे त्यांनी घेतलेले सर्व परत मिळव, असे सांगितले. त्याप्रमाणे तिने केले आणि तिने तिच्या गेलेल्या सर्व गोष्टी देवांकडून पुन्हा प्राप्त करून घेतल्या.
या कथेत एक गोष्ट प्रकर्षांने पुढे येते, ती ही की स्वत:जवळचे सर्व काही काढून घेतले जात असताना, ती प्रतिकार करत नाही, क्रोधित होत नाही. मात्र जे जे तिच्यापासून दुरावले, ते ते सर्व ती पुन्हा यज्ञात आहुती देऊन, दहाही देवतांना प्रसन्न करून घेऊन परत मिळवते. इथे तिने सर्वमांगल्याकडे घेऊन जाणाऱ्या विधियुक्त मार्गाचा अवलंब केलेला दिसतो. सूक्तामध्ये तिच्या अनेक उपाधींपकी एक उपाधी आहे ‘चिक्लित’. पावसानंतर ओल साचून तयार झालेली जमीन म्हणजे ‘चिक्लित. ‘कर्दम’ म्हणजे चिखल. तो तिचा पुत्र आहे. यांमधून स्पष्ट होणारा अर्थ नवीन पिकाच्या पेरणीसाठी तयार असलेल्या जमिनीचा निर्देश करतो. म्हणजेच अन्नदात्री भूमी, हे यातून स्पष्ट होते. भूमीकडे जे जे आहे, ते सर्वच तिच्याकडून नित्यनेमाने काढून घेतले जाते. तरीही ती क्षमाशील राहून, पुन्हा पुन्हा नवनिर्मिती करत राहते. सर्व जीवसृष्टीचे भरणपोषण करत राहते. भारतीय समाजाच्या वर्तनमूल्यांचे बीज अशा पुरातन कथांमध्ये रुजलेले आहे. इथे जावामधील ‘देवी’ या देवीचा उल्लेख करावासा वाटतो. चिक्लित आणि कर्दम या संज्ञा भातशेतीचा निर्देश करणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे जावातील ‘देवी’च्या हातात भाताची लोंबी दाखविलेली असते.
समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या रत्नांमधले एक रत्न म्हणजे ‘लक्ष्मी’. पुराणग्रंथाच्या काळात ‘श्री’ आणि ‘लक्ष्मी’ या दोघींना एकरूप मानले गेले. लक्ष्मी ही सुद्धा सुफलनाची समृद्धीची देवता आहे आणि लक्ष्मी या दोन्ही देवतांच्या संकल्पनांमध्ये कमळ अत्यंत महत्त्वाचे आहे. धरित्री आणि पाणी यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या पूर्ण विकसित अशा जीवसृष्टीचे प्रतिनिधित्व कमळ या प्रतीकाद्वारे होते. चिखलातून उगवणारे आणि तरीही निल्रेप असणारे कमळ पवित्रता आणि आध्यात्मिक सामर्थ्यांचे प्रतीकही आहे. म्हणूनच कमळावर आरूढ झालेली लक्ष्मी केवळ सुफलनाची आणि समृद्धीची देवता न राहता, भौतिक जगापलीकडील म्हणजे आध्यात्मिक क्षेत्राचीही अधिष्ठात्री देवता आहे. ती राजैश्वर्य प्रदान करणारी आहे. राजैश्वर्य क्षणभंगुर असते. त्यामुळेच लक्ष्मीलाही ‘चंचल’ अशी उपाधी मिळाली. पत्नी या नात्याने विष्णूशी असलेली तिची निष्ठा मात्र अढळ समजली जाते. म्हणून आदर्श पत्नीला ‘घरची लक्ष्मी’ हे बिरुद बहाल केले जाते. लक्ष्मीसारखी पत्नी असेल तर त्या घरावर संकटे येणार नाहीत, हे गृहीत धरले जाते. लक्ष्मीचे आणखी एक चिरपरिचित रूप म्हणजे, ‘गजलक्ष्मी’. तिच्या दोन्ही बाजूचे हत्ती हे मेघांचे प्रतीक आणि त्यांच्या सोंडेतून बरसणाऱ्या पाण्याच्या धारा या पावसाचे प्रतीक आहेत. अशा तऱ्हेने आणि देवी या दोन्ही देवतांचे पाण्याशी असलेले सान्निध्य त्यांचे उपजाऊ जमिनीशी असलेले नाते दर्शवितात. म्हणून उपासनेच्या क्षेत्रात त्या दोघी एकरूप पावतात. लक्ष्मी समुद्रातून अवतीर्ण झाली. ग्रीक देवी अॅफ्रोडिटीचा जन्मही समुद्रातूनच झाला. लक्ष्मीचे विलक्षण सौंदर्य पाहून सर्व देव आणि दैत्य मोहित झाले होते, परंतु लक्ष्मीने स्वेच्छेने विष्णूला वरले. अॅफ्रोडिटीही अतीव सुंदर होती. तिच्या सौंदर्यामुळे सर्व देव विचलित झालेले पाहून झूसने संघर्ष टाळण्यासाठी तिचे लग्न हेफिस्टसशी लावून दिले. हेफिस्टस पंगू आणि कुरूप होता. अॅफ्रोडिटी हेफिस्टसशी एकनिष्ठ राहिली नाही. लक्ष्मी आणि अॅफ्रोडिटीची जन्मकथा समुद्राशी जोडलेली असली तरी पत्नी म्हणून दोघींच्या चरित्रातील विरोधाभास स्पष्ट आहे. 

पद्म पुराणातील कथेनुसार सुरुवातीला लक्ष्मीचे अधिष्ठान इंद्राच्या दरबारात होते. पुढे कथा अशी आहे की इंद्राकडून नकळत दुर्वास ऋषींचा उपमर्द होतो. दुर्वास त्याला शाप देतात की त्याचे राजैश्वर्य नष्ट होईल. तक्षणी लक्ष्मी इंद्राच्या राज्यातून निघून जाते. इंद्र हा त्रलोक्याचा राजा. लक्ष्मी त्याला सोडून जाते, म्हणजे त्रलोक्यातूनच निघून जाते. तिच्या जाण्याने सर्वत्र हाहाकार माजतो. तिला परत आणायचे कसे, या चिंतेने सर्व देव काळजीत पडतात. तेव्हा देवांनी दैत्यांबरोबर मिळून समुद्रमंथन करावे, अशी सूचना ब्रह्मदेव करतात. त्यातून लक्ष्मी अवतीर्ण होते. तिच्या परतण्याने पुन्हा सर्वत्र आबादीआबाद होते. ग्रीक पुरातन कथांमधील पर्सफिोनी या देवतेच्या कथेची इथे आठवण होते. 
पर्सफिोनी ही ग्रीक देव झूस आणि सुगीच्या हंगामाची ग्रीक देवी डिमिटर यांची मुलगी. पाताळाचा राजा असलेला ग्रीक देव हेडिज पर्सफिोनीला पळवून नेतो आणि तिच्याशी लग्न करतो. पर्सफिोनीला आता पृथ्वीवर परतणे शक्य नसते. डिमिटर तिला सर्वत्र शोधते. तिच्या मुलीच्या अनुपस्थितीत ती पृथ्वीवर काहीही उगवू देत नाही. लोक भुकेने तडफडू लागतात. सूर्याला (ग्रीक नाव हेलिऑस) ते पाहवत नाही आणि तो पर्सफिोनीला हेडिजने कसे पळवून नेले, त्याची गोष्ट डिमिटरला सांगतो. डिमिटर पर्सफिोनीला शोधून काढते. पृथ्वीवरील लोकांचे हाल न पाहवल्याने झूस आणि इतर देव पर्सफिोनीला पृथ्वीवर पाठवण्याची सक्ती करतात. हेडिज पर्सफिोनीला पृथ्वीवर परत पाठवण्यास संमती देतो, परंतु एक चलाखी करतो. तो पर्सफिोनीला डािळबाचे दाणे खायला देतो. ते डािळबाचे दाणे खाल्ल्यामुळे तिच्यावर काही काळ तरी पाताळात राहण्याचे बंधन येते. तेव्हापासून ती तीन महिने पाताळात राहू लागते. वसंत ऋतूत जेव्हा ती पृथ्वीवर परत येते, तेव्हा पृथ्वीवरची सृष्टी पुनरुज्जीवित होते. लक्ष्मी आणि पर्सफिोनी यांच्या अनुपस्थितीत पृथ्वीवर निर्माण झालेली दुष्काळी परिस्थितीत दोन्ही देवतांचे पृथ्वीवरील वनस्पतीसृष्टीशी असलेले नाते दर्शवते. दोन्ही देवतांचे पृथ्वीवर परतणे म्हणजे पृथ्वीवरील नवजीवनाची, नवनिर्माणाची सुरुवात दर्शवते. नवरात्राचा उत्सवही नवजीवनाची, नवनिर्माणाची नांदी दर्शवतो. 
पृथ्वीलाच देवीस्वरूप मानण्याची परंपरा ग्रीक संस्कृतीतही होती. ‘गेया’ हे ग्रीक परंपरेतील देवीस्वरूप पृथ्वीचे नाव आहे. तिच्याकडे विश्वमाता म्हणून पाहिले गेले. आकाशाची निर्मितीही तिने केली. या आकाशरूपी देवाचे नाव होते, ‘युरेनस’. युरेनस आणि गेया यांना राक्षसासारखी दिसणारी, सायक्लोपस् या नावाने ओळखली जाणारी मुले झाली. या मुलांना युरेनसने गेयाच्या शरीरात लपवायला सुरुवात केली, ज्यायोगे गेयाला असह्य़ वेदना होऊ लागल्या. त्या वेदनांमधून सुटका करून घेण्यासाठी गेयाने एक धारदार दगडी सुरी तयार केली. सायक्लोपस्खेरीज गेयाला जी इतर मुले झाली, त्यांच्यापैकी क्रोनॉस या मुलाला युरेनसबद्दल अत्यंत राग होता. त्याने गेयाने तयार केलेल्या सुरीचा उपयोग करून युरेनसचे वृषण कापून समुद्रात फेकून दिले. त्यामुळे समुद्रात निर्माण झालेल्या फेसातून अॅफ्रोडिटी जन्माला आली. ग्रीक परंपरेत अशा अनेक कथा आहेत, ज्यामध्ये क्रौर्याची आणि शोकांतिकेची जाणीव होते. 
झूसची पत्नी हेरा हिच्या मत्सरी स्वभावाच्या अनेक कहाण्या आहेत. उदाहरणादाखल झूसचा मुलगा हेरॅक्लिस म्हणजेच हक्र्युलिस याची गोष्ट सांगता येईल. झूसचे अनेक दैवी स्त्रियांशी संबंध होते. परंतु हेरॅक्लिसची आई मात्र साधारण स्त्रक होती. ती बाळंत होऊ नये, अशी व्यवस्था हेराने केली होती. परंतु हेराचा तो प्रयत्न फसला. हेरॅक्लिसचा जन्म झाला आहे, अशी खोटीच बातमी तिला कळली आणि आश्चर्याचा धक्का बसल्यामुळे ती बेसावध झाली. त्याच वेळेस हेरॅक्लिसचा जन्म झाला. हेरॅक्लिसच्या आईने हेराच्या भीतीपोटी नवजात हेरॅक्लिसला टाकून दिले. हेराची बहीण अथेना हिने हेरॅक्लिसला हेराच्या स्वाधीन केले. बाळाची खरी ओळख माहीत नसल्यामुळे हेराने त्याला स्तनपान दिले. हेरॅक्लिसच्या अंगात शक्तीच इतकी होती की तो स्तनपान करीत असताना हेराला असहय़ वेदना झाल्या आणि तिने त्याला दूर ढकलले. मात्र हेराचा पान्हा थांबला नाही. तिचे सांडलेले दूध म्हणजेच आकाशगंगा, असे ही कथा सांगते. या कथेचा गाभा मात्र वैयक्तिक सूडभावनेभोवतीच गुंफलेला दिसतो. 
भारतीय पुरातन कथांच्या परंपरांमध्ये क्रौर्य जाणवत नाही का, याचे उत्तर नाही असे देता येणार नाही. दैत्यांचे निर्दालन करण्यासाठी उग्र रूप धारण करणारे देव आणि देवी यांच्या असंख्य कथा भारतीय परंपरेतही आहेत. शिव हा विनाशकारी देव असला तरी पार्वती मात्र विनाशकारी नाही. उलट ती अन्नपूर्णा आहे, परंतु तीच पार्वती दुग्रेच्या रूपात मात्र रणचंडी बनून दैत्यांच्या विनाशासाठी उभी ठाकते. असे असले तरी तिच्या भयकारी रूपातही वैयक्तिक क्रोध, सूडभावना गुंतलेली दिसत नाही. महिषासुराने त्याला पुरुषयोद्धय़ाच्या हस्ते मरण येणार नाही, असा वर मागून घेतलेला असतो, म्हणून पार्वती निरुपायाने दुग्रेच्या रूपात रणांगणात उतरते. तिच्या विनाशकारी रूपातही अमंगलाचे निवारण आणि मंगलाचे संरक्षण हेच एकमेव कार्य तिने अंगीकारलेले असते. देवीने आरंभलेल्या युद्धातील मृत्यूही मंगलकारक असतो, कारण तिच्या हातून मृत्यू पावलेल्या दैत्याचा उद्धार होतो. ग्रीक परंपरेत मात्र मृत्यू हा बहुतेक वेळा एखाद्या सूडनाटय़ाचा शेवट म्हणून शोकांतिकेच्या स्वरूपात येतो. देवदेवतांच्या कथांमध्येही समाजमनाचे प्रतििबब उमटलेले असते ते असे.