१५-१६ कि.मी. वर आहे कुणकावळे गाव. मालवणहून कसालच्या दिशेने जायला लागले की कुंभारमाठ नावाचे गाव लागते. इथून पुढे चौके फाटा आहे. या फाटय़ापासून एक रस्ता कुणकावळे गावाला जातो. कुणकावळे गावात आहे श्रीदुर्गादेवीचे मंदिर. गावाच्या उत्तर दिशेला सुमारे एक कि.मी. चा गावकऱ्यांनी केलेला रस्ता आपल्याला थेट दुर्गादेवी मंदिरापाशी आणून सोडतो. प्रत्यक्ष धर्मराजांनी या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. १९६१ साली झालेल्या वादळाचा तडाखा बसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे झाले. खास कोंकणी पद्धतीची सुंदर अशी दीपमाळ एका ओट्यावर उभी आहे. मंदिराला भव्य असा सभामंडप बांधलेला आहे. आणि या मंदिरात आहे अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती. चतुर्भुज देवीच्या हातात तलवार, चक्र, त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत. मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने, ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत तर केशसंभार अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ फारच देखणी आहे. मूर्तीसमोर दगडी प्रसाद पात्र आहे. अत्यंत मनोहारी अशी ही मूर्ती, आडवाटेला असली तरी खास वेळ ठेऊन पाहायला हवी. अनेक ठिकाणी देवीची मूर्ती म्हणजे एक तांदळा असतो. त्याला वस्त्रप्रावरणे नेसवून तो अत्यंत मनोहारी केलेला असतो. इथे मात्र सुटी स्वतंत्र देवीची मूर्तीच आहे. काळ्या दगडामध्ये कोरलेल्या या मूर्तीवर बारीकसारीक कलाकुसर केलेली दिसते. प्रसन्नवदना असलेली ही श्रीदुर्गादेवीची मूर्ती दगडामध्ये कोरून काढलेल्या इतक्या अलंकारांनी मढवलेली आहे की ते पाहून अचंबित व्हायला होते. मालवणच्या इतक्या जवळ असलेल्या या देवीचे दर्शन मुद्दाम वाट वाकडी करून अवश्य घेण्याची गरज आहे.
श्री दुर्गादेवी-कुणकावळे
शिवछत्रपतींनी स्वराज्याचे सुसज्ज आरमार घडविले आणि समुद्रावर आपली सत्ता निर्माण केली. त्या आरमाराच्या संरक्षणासाठी बेलाग असे जलदुर्ग राजांनी बांधले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2014 at 01:29 IST
मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri special