फेसबुकवर ‘बी लाइक बिल’ हा मेमे व्हायरल झाला आणि त्याने एकदम धमाल उडवली. हळूहळू त्याच्या अनेक आवृत्त्याही व्हायरल होत गेल्या. एफबीवरच्या अशा ट्रेण्ड्सबद्दल तरुणाईला नेमकं काय वाटतं?
Tejali :
Yesterday at 1:58am
Like · Comment · Seen by 7
You, Shreerang Kulkarni and 2 others like this.
Comments
Greeshma : Hehehe…. Be smart like Tejali
Like · Reply · Yesterday at 3:00am
Rutuja :
Like · Reply · Yesterday at 4:19am
Tejal : : हाहाहा.. भारी आहे गं हे.. काय आहे बाय द वे ?
छ्र‘ी भ् फीस्र्’८ भ्ी२३ी१िं८ ं३ 4:19ंे
Tejal : Be like Bill memes…
Like · Reply · Yesterday at 4:31am
Tejal : ’ : त्यात तेजालीने स्वत:चं नाव टाकलंय. यात आपल्याला फेसबुकवर खटकत असलेल्या सगळ्या गोष्टी तू या मेसेजद्वारे सांगू शकतेस.. खूप व्हायरल झालंय हे एफबीवर सध्या.. त्याला थोडा सर्काझमचा बाज आहे.. पण जे काही आहे मस्त आहे..
Unlike · Reply · 3 · Yesterday at 4:37am
Rutuja : : ओह!! कळलं..मस्त आहे. परवाच माझ्या एका मित्राने ‘इन रिलेशनशीप विथ..’ असं पोस्ट केलं. मी उत्सुकतेने विचारलं याबाबत तर म्हणे ते फक्त एफबीवर दाखवण्यासाठी आहे..खरं नाहीये..!!! मग मी विचारलं का टाकलंस.. तर म्हणे हे दाखवायला की मलासुद्धा जीएफ आहे..
Like · Reply · Yesterday at 4:49am
Tejal : हेहे.. अशा पोस्ट्सवर भारी कॉमेंट्स करता येऊ शकतात या मेमेजद्वारे..
Like · Reply · Yesterday at 4:52am
Tejal :
Unlike · Reply · 1 · Yesterday at 4:57am
Rutuja :: कन्सेप्ट कुणाची आहे?
Like · Reply · 1 · Yesterday at 9:29am
Greeshma : तेजल मी हे बऱ्याचदा एफबीवर वाचलंय पण त्याला काय म्हणतात ते माहीत नव्हतं
Like · Reply · Yesterday at 9:30am
ॅ१ी२ँें : पण याचं प्रयोजन नेमकं काय ते कळलं नाही अजून
छ्र‘ी भ् फीस्र्’८ भ्ी२३ी१िं८ ं३ 9:30ंे
Sanket : थोडक्यात काय, तर हा ‘व्यंग’चा मॉडर्न फॉर्म आहे. जसे व्यंगचित्र, तशा या व्यंगोळी (व्यंग + ओळी) :- P
Like · Reply · 1 · 4 hrs · Edited
Greeshma :
Like · Reply · Yesterday at 10:08am
Sanket : उत्स्फूर्त व्यंगोळी ..
मी आहे संकेत
माझ्याकडे स्मार्टफोन आहे
त्याला सॉलिड फ्रंट कॅमेरा आहे
मी सेल्फी घेत नाही
मला सेल्फी-स्टँडचीही गरज नाही, कारण मी उंच आहे . :-ढ
मला बदकासारखं तोंड करायला आवडत नाही
मला तिरके डोळे करता येत नाहीत
मी आणि माझा फोन दोघेही स्मार्ट आहोत!
आमच्यासारखे व्हा!
Like · Reply · 2 · Yesterday at 10:16am · Edited
Tejali : वाह संकेत. मस्तच. बी लाइक बिलचा कन्सेप्ट खूप हिट झालाय त्याला कारण त्याची साधी भाषा, मांडण्याची पद्धत आणि तरुणांना रिलेट होणारे मुद्दे!! हा फक्त ट्रोल नाहीये तर समाजात घडणाऱ्या गोष्टींबद्दल, लोकांच्या सोशल मीडियावरील वर्तनाबद्दल ‘टोलेबाजी’सुद्धा आहे. टीका करण्याचं सौम्य माध्यम म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण फेसबुकवरच्या इतर गोष्टींप्रमाणेच या ‘ट्रेंड’चासुद्धा अतिरेक झालाय.आणि मग या ट्रेंडवरसुद्धा टीका करणारे मेमेज तयार झाले आहेत. सगळाच प्रकार गमतीशीर आहे हे मात्र खरं!
Like · Reply · 1 · Yesterday at 10:32am
Sanket : ट्रोल / व्यंग / मेमे करणारे ‘आम्ही नाही त्यातले’ सिद्ध करायच्या मागे असतात?
चारचौघांसारखे आपण नाही दाखवून ‘कूल’ असल्याचे प्रदर्शन??
Like · Reply · Yesterday at 10:38am
Rutuja : वाह! संकेत..! गमतीशीर ट्रेण्ड आहे खरा. ग्रीष्मा मला वाटतं लोकांना एफबी या माध्यमाचा योग्य उपयोग कळावा या प्रयोजनाने हा ट्रेण्ड आला असावा. म्हणजे नुसतं एफबी तर एकंदरच सोशल नेटवर्किंग साइट्स. तुम्हाला नाही वाटत का याचा अतेरिकी वापर आपल्या पिढीकडून होतोय. मी आपल्या पिढीकडून म्हटलं. कारण माझे बाबा एफबी कसं वापरायचं हे नुकतंच शिकले आहेत; पण तरी त्यांना आपल्या सारखं क्रेझ नाहीये एफबीचं.
Like · Reply · Yesterday at 10:46am
Shreerang : हल्ली एक ट्रेंड आला आहे. खरंतर हल्ली नाही. हा आधीपासून आहे. जॉर्ज बुश यांवर एका पत्रकाराने बूट फेकलेले तेव्हापासून खरं तर सिच्युयेशनल मेम्स ऑर माइक्रो गेम्स आले. आलिया भटचा कॉफी विथ करण असो किंवा केजरीवालचे जोक्स.. लोक ट्रेंडनुसार काही ना काही काढत असतात
Like · Reply · Yesterday at 11:12am
Tejal ’ : संकेत कळतंय की तुला हा ट्रेंड पटलेला नाही. ‘कूल’ असल्याचं प्रदर्शन नाही रे हे. एफबी वर हल्ली इतका वेडेपणा चाललेला असतो. कोणी तरी त्याबद्दल बोललं पाहिजे ना. आता आपलेच मित्र-मैत्रिणी असतात त्यांना डिरेक्ट बोलता येत नाही. मग बी लाइक बिलचा वापर करून एखादा टोमणा मारला तर काय बिघडतं?
Like · Reply · 2 · Yesterday at 12:25pm
Tejal :
Unlike · Reply · 3 · Yesterday at 12:25pm
Tejal : : ऋतुजा तू म्हणते आहेस ते खरं आहे. नुसताच अतिरेकी वापर नाही तर आधीन झालोय आपण याच्या. प्रत्येक गोष्ट सोशल करायची, येता जाता प्रत्येक गोष्टीवर मत मांडायची सवय लावली आहे आपल्याला या सोशल मीडियम्सने. आणि आता हे आपल्या नकळत होतंय. यावर कुठेतरी भाष्य करण्याची गरज वाटते तेव्हा बी लाइक बिल सारख्या ट्रेंडचा जन्म होतो असं मला वाटतं. आणि समस्या ज्या भाषेत असेल त्याच भाषेत त्याचे उत्तर दिले तर त्याचा योग्य तो परिणाम होतो म्हणून असा एखादा ट्रेंड लोकप्रिय होतो.
Unlike · Reply · 2 · 21 hrs
Rutuja : हो गं. ते बरोबर आहे.
Like · Reply · 18 hrs
Rutuja : पण हे असले ट्रेण्ड्स फार चालतात ना हल्ली एफबी वर?
Like · Reply · 1 · 9 hrs
Tejal : : हो गं. मला तर भारी आवडतात असे मेमेज पोस्ट करायला. आणि श्रीरंग म्हणाला तसं प्रत्येक गोष्टीवर मेमेज निघतात हल्ली. हे फक्त एफबी वर नाही तर सगळ्या सोशल मीडियम्सवर चालतं. ट्रोल फेस, सिनेमामधली चित्रं घेऊन सर्वात जास्त मेमेज बनवले जातात. शिवाय बऱ्याच मेमेजमध्ये सेम पिक्स असतात पण मेसेजेस वेगळे असतात. आणि ते सगळेच मेसेजेस त्या पिकला करेक्ट सूट करतात!
Unlike · Reply · 2 · 8 hrs
Rutuja : हं..! पण म्हणजे फक्त एफबी वरच नॉन्सेन्स पोस्ट्स येत नाहीत.. तर एकंदर सगळयाच सोशल नेटवर्किंग साइट्सवर सुरू होतात लोक..
‘हंड्रेड डेज ऑफ हॅपीनेस’ हा ट्रेण्ड माहितीये का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला याबद्दल?
Like · Reply · 8 hrs · Edited
Shreerang ‘हॅपीनेस’चा ट्रेण्ड तर एव्हरग्रीन आहे. त्या आर्टिस्टने बेडशीट्स पिलो कव्हर्सपासून मोबाइल आयपॉड लॅपटॉप कव्हर्सचा बिझनेस केला. हे सगळं सरप्रायझिंग आहे
Like · Reply · 2 · 8 hrs
Rutuja : हो ना.. म्हणजे एकतर आपण एवढं सोशल व्हायचं का? की हा फक्त शो ऑफ बिझनेस?
शो ऑफ बिझनेसवरून आठवलं.. किती छोटय़ा-छोटय़ा गोष्टी पोस्ट होतात एफबी वर.. म्हणजे एक्झ्ॉम संपली, ग्रॅज्युएट झालो, सोशल वर्क केलं आणि बरंच काही.. श्रीरंग तू स्टेट्स ठेवला होतास मध्यंतरी.. याच संदर्भात..
Like · Reply · 7 hrs · Edited
Tejal : मगाशी म्हटले तसे या ‘सोशल लाइफ’ची आपल्याला इतकी सवय झाली आहे की हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. यात कोणालाच काही गैर वाटत नाही. अतिशयोक्ती होते आहे हे खरं आहे, पण यात इतकं गंभीर होण्यासारखं काही आहे असं मला तरी वाटत नाही. नाहीतरी आपल्या इतक्या लाइफमध्ये ही साधनंच आपल्याला मित्र-मैत्रिणीशी कनेक्टेड ठेवतात. शिवाय कोणी किती सोशल व्हायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि आपणही किती लक्ष द्यायचे हे आपल्यावर डिपेंड करते. यू कॅन ऐदर चूज टू गेट इन्व्हॉल्व्हवड् ऑर चूज टू बी स्मार्ट लाइक बिल अॅण्ड इग्नोअर स्टुपिडिटी.
Like · Reply · 2 · 6 hrs
Sanket : : काहीही हं तेजल..
मला ट्रेंड आणि टोमणे दोहोंविषयी ‘काहीही’ न पटण्यासारखे नाही.
का.ही..ही..ही…ही
Like · Reply · 4 hrs
Sanket : : व्यंग आणि मार्मिक टीका यांवरून मला आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ आठवतो. बिलच्या आविष्कारपूर्वीचे व्यंग प्रतीक.
फक्त काळानुसार चित्राचे व्यंगोळीत रूपांतर आणि माध्यमात बदल, आधी प्रिंट आणि आता सोशल मीडिया.
हेतू बऱ्यापैकी सारखा..
Like · Reply · 4 hrs
Rutuja : This is Rutuja..
She says stop your chatting and get back to your work. She is smart. Be like Rutuja.
टीम युथफुल