ऑफिसला जायचं म्हणजे टिपिकल पद्धतीने असं समजायचं काहीच कारण नाही.

चला, आज परत एक नवीन आठवडा आणि पर्यायाने फॅशनच्या एका नवीन कप्प्याला उघडायची वेळ. मागच्या भागांमध्ये आपण कॉलेजला जाताना ट्रेंडी आणि स्टायलिश कसं दिसावं यावर एक नजर टाकलीच. पण ऑफिसला जाणाऱ्यांच काय? त्यांना तर अप टू डेट राहणं महत्त्वाचं असतंच. मीटिंग्स, कॉन्फरन्सेस्, टार्गेट्स या सगळ्यात रोज चांगलं दिसणं हे त्यांच्यासाठी गरजेचं असतंच. त्यात कॉलेज सोडून गेल्यावर कपडय़ांवर बंधनं पण खूप येतात. फॉर्मलच घातलं पाहिजे, ठरावीक कलर्स घातले पाहिजेत, प्रिंट्स, अ‍ॅक्सेसरीज यांना रजा द्यायची. मग या सगळ्यात इतकं गोंधळून जायला होतं की आपल्या कपडय़ांमध्ये कधी तोचतोचपणा आलाय हे कळायला पण मार्ग राहात नाही. इतर बाबतीत नाही पण फॅशनेबल दिसण्यात मात्र तुम्ही दुसऱ्यांवर रोब नक्कीच जमवू शकता. त्यामुळे आज आपण ऑफिसला जाताना फॅशनेबल कसं राहता येईल यासंबंधी थोडं बोलू या.
ऑफिस वेअर किंवा फॉर्मल्स म्हटलं की सगळ्यात पहिले डोळ्यासमोर येतात ते रंग. कित्येक कॉर्पोरेट ऑफिसेस्मध्ये ठरावीक रंग वापरण्याची सक्ती असते. सफेद आणि काळा रंग तेवढा युनिव्हर्सल असतो. त्याशिवाय नेव्ही, ब्राऊन, हिरवा, राखाडी हे रंग फॉर्मल्स म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. पण या सर्वासोबत पेस्टल शेड्स वापरायला काहीच हरकत नाही. क्रीम, बेबी पिंक, आकाशी, लेमन यल्लो, ऑफ- व्हाइट असे कलर्स ऑफिसला जाताना वापरायला हरकत नसते. पण दरवेळी ब्ल्यू पॅन्ट किंवा स्कर्ट आणि पेस्टल शेडचे शर्ट असे कॉम्बिनेशन वापरण्यापेक्षा पेस्टल शेडमधली पॅन्ट आणि शर्ट डार्क शेडमध्ये घालून पाहा. तुमच्या लुकमध्ये लगेच फरक पडतो. सफेद रंग यात तुमची मदत करतो. त्याचबरोबर बिस्कीट कलर, राखाडी रंगासोबत तुम्ही वेगवेगळे शर्ट्स ट्राय करू शकता. हा रूल मुलांसाठी सुद्धा आहे. मुलांसाठी सध्या पिंक शेड इन आहे हे मी आधी सांगितलं आहेच. या पिंक शेडचा कल्पकतेने वापर फॉर्मल्समध्ये करून घेऊ शकता. कलर ब्लॉकिंगचा मंत्रा फॉर्मल्समध्ये खूप उपयोगी ठरतो. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे तीन रंग एकत्र पेअर करू शकता.
प्रिंट्सच्या बाबतीत फॉर्मल्समध्ये खूप बंधनं असतात. पण स्ट्राइप्स किंवा चेक्स तुम्ही नक्कीच वापरू शकता. मल्टीकलर चेक्स वापरण्याऐवजी एकाच रंगाच्या विविध शेड्सच्या चेक्समुळे तुम्हाला फ्रेश लुक मिळतो. स्ट्राइप्समध्ये सुद्धा डबल कलर स्ट्राइप्स छान दिसतात. फक्त रंग तुमच्या स्कीनला सूट होणारे निवडा. छोटय़ा, फ्लोरल प्रिंट्सचे ड्रेस वापरायला हरकत नाही. प्रिंट्स फेमिनीन असतील याची काळजी घ्या. जर तुमच्या ऑफिसमध्ये प्रिंट्सबद्दल किचकट बंधनं नसतील तर मात्र यात प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.
लुकच्या बाबतीत स्ट्रेट फिटेड ड्रेस वापरण्याला प्राधान्य देण्यात येते. पण म्हणून कपडे निवडताना खूप अडचणी येतात आणि पर्याय कमी वाटायला लागतात. नेहमीच्या ट्राउझर्स वापरण्यापेक्षा अँकल लेन्थ ट्राऊझर वापरून पाहा. या बॉडी हगिंग असतात, त्यामुळे तुमच्या शरीराला स्ट्रक्चर्ड लुक येतो. पण यासोबत शर्टसुद्धा तितकंच फिटिंगच हवं. पेन्सिल स्कर्टला पर्याय म्हणून फ्लेअर स्कर्ट वापरून पाहा. फक्त ते बोल्ड शेडमध्ये असले पाहिजेत, त्यासोबत शर्ट किंवा टय़ुनिक मात्र फॉर्मल असला पाहिजे.
पफ स्लीव्हस्, शिअर फॅब्रिक्स, वेस्ट किंवा अँकल बॅण्ड, हेम लाइन, कॉलर यांमुळे तुमच्या लुकमध्ये थोडा ड्रामा निर्माण करण्यास मदत होते. त्यामुळे यामध्ये थोडा बदल आणण्यास घाबरू नका. नेहमीची शर्ट कॉलर घालण्याऐवजी, चायनीज किंवा सॅण्ड कॉलरचे शर्ट वापरून पाहा. कॉलरलेस बॉडीस किंवा टय़ुनिकसुद्धा फॉर्मल्समध्ये घालू शकता. सध्या शिअर फॅब्रिक्समध्ये शर्ट्स, टय़ुनिक्स आणि ड्रेसेस्ची छान रेंज बाजारात उपलब्ध आहे, त्याचा नक्कीच वापर करू शकता. मिक्स अ‍ॅण्ड मॅच करण्यासाठी शिअर फॅब्रिक्स हा चांगला पर्याय असतो. कॉण्ट्रास्ट शेडमधल्या अँकल बॅण्डस्चा सध्या ट्रेंड आहे. नेहमीच्या शर्ट्सपेक्षा हे नक्कीच वेगळा लुक देतात.
सध्या बाजारात जॅकेट्स, वेस्टस आणि श्रग्सची मोठी रेंज उपलब्ध आहे. त्यामुळे याचा फायदा नक्कीच घ्यायला हवा. तुम्हाला कधी थोडीशी चोरी करायची असेल तर टी-शर्टवर जॅकेट घालून वेळ मारून नेऊ शकता. जॅकेटचा उपयोग कलर ब्लॉकिंगसाठी मस्त करता येऊ शकतो. हल्ली थ्रीपीस सूट घालण्याऐवजी वेस्टचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. तसंही आपल्याकडे सूट घालण्याइतके थंड वातावरण नसते, त्यामुळे वेस्ट घालणे कधीही उत्तम. एखाद्या फॉर्मल शर्टवर वेस्ट घालून तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या मीटिंगसाठी रेडी होऊ शकता.
सूट्स घालायचेच असतील तर बोल्ड शेड्स वापरा. संपूर्ण काळा सूट घेण्याऐवजी सफेद किंवा पेस्टल शेडचे शर्ट वापरून पाहा. किंवा काळ्याऐवजी नेव्ही शेड ट्राय करायलाही हरकत नाही. सध्या मिनी टायचा ट्रेंड आहे. हे टाय नेहमीच्या टायपेक्षा रुंदीने छोटय़ा असतात. रणबीरचं ‘बत्तमिज दिल’ गाणं आठवतंय? त्यात त्याने घातलेला टाय परत एकदा पाहून घ्या.
टायबरोबर ‘बो’चा ट्रेंडसुद्धा सध्या गाजतो आहे. नेहमीच टाय घालण्यापेक्षा कधीतरी ‘बो’ घालण्यास काहीच हरकत नाही. हे ‘बो’ आणि टाय तुम्ही केवळ सूटसोबतच घातले पाहिजेत असंही काहीच नाही. शर्टसोबतसुद्धा फक्त ‘बो’ किंवा टाय वापरता येऊ शकतात.
फॉर्मल्समध्ये अ‍ॅक्सेसरीज कमीत कमी वापरायला प्राधान्य दिलं जातं. पण म्हणून अ‍ॅक्सेसरीज वापरायच्याच नाही असं बिलकूल नाही. तुम्ही बेल्ट आणि नेकपीस यांना रजा देऊच शकत नाही. रिंग्ससुद्धा फॉर्मल्सवर वापरायला हरकत नाही. फॉर्मल्समध्ये शर्ट इन करावे लागते, त्यामुळे सगळ्यात आधी चांगल्या बेल्टमध्ये गुंतवणूक करा. आणि एकाच नाही तर वेगवेगळ्या स्टाइलच्या आणि लुकच्या बेल्ट्सचे कलेक्शन तुमच्याकडे असलेच पाहिजे. पण हे करताना बेल्ट्स जास्त फंकी होणार नाहीत ना याकडे लक्ष द्या. नेकपीस निवडतानाही सोबर नेकपीस निवडायला प्राधान्य द्या. चष्मा तुमचा लुक खूपच बदलतो. नेहमीच्या छोटय़ा फ्रेम्स वापरण्याऐवजी बोल्ड कलरच्या मोठय़ा फ्रेम्स वापरून पाहा. नक्कीच फरक पडेल.
कधीतरी पार्टी किंवा कॉन्फरन्ससाठी साडी वापरायला सुद्धा काहीच हरकत नाही. पण कॉटन किंवा सिल्कची साडी नेसण्याऐवजी शिफॉन किंवा जोर्जेटची साडी नक्कीच खुलून दिसेल. सोबर नेट साडी वापरायलासुद्धा हरकत नाही.
फॉर्मल शूजमध्ये सध्या खूप पर्याय आले आहेत. थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला थोडासा बदल करण्याची गरज आहे. त्याने तुमच्या फॉर्मलमध्येसुद्धा थोडीशी गंमत नक्कीच आणू शकता.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Story img Loader