कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना दिसणारे छत्रपती महाराणी ताराबाई किंवा पन्हाळ्यावरील सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचे शिल्प या दोन्ही कलाकृती पाहिल्या की, त्यांचे जनक असलेले कोल्हापूरचे सुपुत्र रवींद्र बाबुराव मेस्त्री यांची आठवण येते. रवींद्र मेस्त्री यांनी शिल्पकलेला सुरुवात तुलनेने उशिरा केली. त्याआधी ते चित्रकार म्हणूनच सुपरिचित होते. व्यक्तिचित्रण हा त्यांच्या आवडीचा विषय होता. त्यातही त्यांनी स्वत:ची एक वेगळी शैली जोपासण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला.
आणखी वाचा