मेवाड लघुचित्रशैलीतील रामायण – लघुचित्रशैली ही खास भारतीय चित्रपरंपरा आहे. या शैलीचा वापर करून भारतीय महाकाव्यांतील प्रसंगांचे चित्रण अनेक कलावंतांनी केले. या लघुचित्रपरंपरेमध्येही त्या त्या भागानुसार स्थानिक शैलीही विकसित होत गेली. मेवाडचे राजे राणा जगत सिंग यांनी १७ व्या शतकात स्थानिक कलावंतांकडून रामायण लघुचित्रशैलीत चितारून घेतले. मेवाड चित्रशैलीतील हे रामायण एकूण ७०१ फोलिओंच्या रूपात आता एकत्रित करण्यात आले असून त्यातील निवडक चित्रे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात २१ मार्चपासून तीन आठवडय़ांसाठी पाहता येणार आहेत. यातील हे प्रस्तुतचे चित्र पाहिल्यानंतर गीतरामायणातील ‘दशरथा घे हे पायसदान’ हे गीत सहज ओठी येते…
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा