पाश्चिमात्य शिल्पकारांनीच भारतातील स्मारकशिल्पे करायची अशी परंपरा इंग्रजांच्या काळात होती. मात्र १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात गणपतराव म्हात्रे यांनी तिला यशस्वी छेद दिला. प्रस्तुतचे त्यांनी घडवलेले ‘मंदिरपथगामिनी’ हे शिल्प भारतीय कलेतिहासातील महत्त्वाचे शिल्प आहे. याच शिल्पकृतीने भारतीय शिल्पकार किती उच्च दर्जाची कलाकृती घडवू शकतात, त्याची प्रचीती इंग्रजांना आणि पर्यायाने विदेशी शिल्पकारांना आणून दिली. जेजेमध्ये शिकत असताना म्हात्रे यांनी १८९६ साली हे शिल्प घडवले होते. त्यानंतर युरोपिअन शिल्पकारांची सद्दी संपून भारतीय शिल्पकारांना स्मारकशिल्पाचे काम मिळू लागले. या शिल्पकृतीतील तरुणीची मोहक हालचाल, अंगकाठीनुसार नऊवारी पातळाच्या पडणाऱ्या घडय़ा, त्यावरील निऱ्या, तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भाव, नखशिखान्त नाजूकपणा, डाव्या पायावर तोल सावरत उचललेला उजवा पाय, उजव्या हाताच्या बोटांची नाजूक रचना.. ही सारी नजाकत प्रत्यक्ष अनुभवावी अशीच आहे. आजही जेजेमध्ये अधिष्ठात्यांच्या केबिनमध्ये ही अजरामर कलाकृती पाहायला मिळते!
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा