आषाढी विशेष
दरवर्षी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणारी शिस्तबद्ध वारी हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. म्हणूनच वारीतील मानाच्या अशा तुकोबांच्या वारसा जपणाऱ्या दिंडीचा हा लेखाजोखा-
ज्येष्ठात देहूहून आणि आळंदीहून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी निघतात आणि  एक भक्तीपूर्ण असा सोहळा सुरू होतो. लाखोंच्या संख्येने लहानथोर सारे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर भक्तिभावाने वाटचाल करू लागतात. गेली हजारो वष्रे हा भक्तीचा अनोखा सोहळा त्या वाटेवर अगदी अव्याहतपणे सुरू आहे. सर्वत्र एकच जयजयकार सुरू असतो. टाळ-मृदुंगाच्या गजरात सारे वारकरी ग्यानबा तुकाराम असा गजर करत सारे अंतर भावभक्तीने, विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने पार करतात. पण याच वारकऱ्यांपकी काही जण मात्र ग्यानबा तुकारामचा गजर नाही तर रामकृष्ण हरीचे सूर आळवत असतात. लाखोंच्या त्या कल्लोळात खरे तर हे फारसे कोणालाच कधी लक्षात येत नाही. पण रामकृष्ण हरीचा जयघोष करणाऱ्या या दिंडीचा सूर आणि नूर काही वेगळाच असतो. कारण ही मानाची पहिली तसेच सातवी दिंडी थेट तुकोबारायाचा वारसा सांगणारी असते. वासकरांच्या या फडाची नाळ थेट तुकोबारायांशी जोडलेली असते.
नेमका हा तुकोबांचा वारसा काय आहे याबाबत मात्र अनेक प्रवाद आहेत. याबाबत या दिंडीचे फडाचे प्रमुख विठ्ठलराव वासकर यांच्याकडून माहिती मिळते त्यानुसार या कथेची सुरुवात होते ती १७०७ मध्ये मल्लाप्पा वासकरांच्या जन्मापासून. मात्र तुकोबांचा वारसा कसा हस्तांतरित होत गेला यासाठी थोडेसे आणखी मागे जावे लागेल. तुकोबांनी निळोबांना अनुग्रह दिला तेथे या कथेची खरी सुरुवात होते. निळोबांची तुकोबांवर प्रचंड श्रद्धा. तुकोबांचे दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही म्हणून त्यांनी तेरा दिवस तुकोबांचा धावा केला. तेरा दिवसांनी तुकोबांनी त्यांना दर्शन दिले. अनुग्रह केला. आपला वारसा एका समर्थ हाती सोपवला. निळोबांच्यानंतर हा वारसा गेला तो शंकर शिऊरकर यांच्याकडे. आता प्रत्येक वेळी तुकोबांचा वारसा कोणाकडे द्यायचा हा प्रश्न येणार, तेव्हा तुकोबांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मल्लाप्पा वासकरांच्या घरात माझा वारसा नेऊन दे. मी तेथे आहे. मल्लाप्पा वासकरांना अशा रीतीने वयाच्या २५ व्या वर्षी तुकोबांचा वारसा मिळाला आणि गेल्या आठ पिढय़ा वासकर घराणे तो प्राणपणाने सांभाळत आहे.
वारीचा ज्ञात इतिहास हा पार ज्ञानेश्वरांच्याही आधीच्या काळात जाणारा आहे. पण तेव्हा त्याला आजच्यासारखे सोहळ्याचे स्वरूप नव्हते. आजच्यासारखी फड व्यवस्था नव्हती. आज वारीत दिसणाऱ्या अनेक िदडय़ा, या फड म्हणून ओळखल्या जातात. हैबतराव आरफळकर यांनी ही फडपरंपरा सुरू केली, असे मानले जाते. तर काही जणांच्या मते मल्लाप्पा वासकर यांनी फड पद्धतीने वारी सुरू केली असेदेखील मानले जाते. तुकोबांच्या अनुग्रहानंतर मल्लाप्पा वासकर हे गळ्यात ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका घालून पंढरपुरी जात असत. मलाप्पा वासकर यांचे १७९९ साली निधन झाले. त्यानंतर सुमारे अठरा वर्षांनी म्हणजेच १८१७ पासून त्यांचे नातू तुकोबादादा यांनी फड पद्धतीला चालना देऊन वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. प्रचलित माहितीनुसार हैबतराव आरफळकर यांनी १८३१ पासून आज दिसणारी वारी सुरू केली असे म्हटले जाते. हैबतराव हे िशदे सरकारांचे सरदार. सातपुडय़ातून प्रवास करताना त्यांना भिल्लांनी कैद केले, तेव्हा त्यांनी दिवस-रात्र हरिपाठ केला, विठ्ठलाचा धावा केला. ते पाहून भिल्लांनी त्यांना सोडून दिले. पुढे विरक्ती येऊन हैबतराव हे आळंदीस स्थायिक झाले. १८३१ मध्ये त्यांनी िशदे सरकारांचे आणखी एक सरदार अंकलीकर शितोळे यांच्या राजाश्रयाखाली वारीचे स्वरूप विस्तारले. त्याच वेळी वासकरदेखील त्यांच्याबरोबर होते.

तुकोबांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मलाप्पा वासकरांच्या घरात माझा वारसा नेऊन दे. मी तेथे आहे. मलाप्पा वासकरांना अशा रीतीने वयाच्या २५ व्या वर्षी तुकोबांचा वारसा मिळाला

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Eknath Shinde bag checking
CM Eknath Shinde : “बॅगेत फक्त कपडे, युरिन पॉट…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सामानांची तपासणी!
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Mysterious Sanskrit text discovered in Germany
आश्चर्यच !…गूढ हिंदू मजकुराचा कागद जर्मनीच्या फ्ली मार्केटमध्ये!
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
loksatta analysis blue zone concept fact or myth
या भागांतली माणसे असतात दीर्घायुषी… काय आहेत ‘ब्लू झोन’? ही संकल्पना वास्तव, की मिथक?

विठ्ठलराव वासकर या संदर्भातला आणखी एक पलू उलगडून दाखवितात तो म्हणजे महादजी िशदे आणि मल्लाप्पाचा संबंध. महादजींनी एक ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. त्यावर सर्व जण किती छान आहे, अशी प्रतिक्रिया देत होते. महादजी पंढरपुरी आले असता त्यांनी मल्लाप्पांना आपला ग्रंथ दाखविला. तेव्हा मल्लाप्पांनी ‘दासी ती दासी आणि आई ती आईच’ अशी संभावना केली आणि सदर ग्रंथ ज्ञानेश्वरीवरून कसा घेतला आहे हे दाखवून दिले. तेव्हा महादजी त्यांच्या चरणी लीन झाले. हा सारा प्रसंग १८०० च्या आधीचा. तेव्हा महादजी आणि मल्लाप्पा वासकर यांचे संबंध जुनेच होते. या शिंदे सरकारकडे हैबतराव आरफळकर हे सरदार होते. चित्रावशास्त्री कोशात याचा उल्लेख असल्याचे विठ्ठलराव वासकर नमूद करतात.
हैबतराव आरफळकर जेव्हा आळंदी येथे स्थायिक झाले, तेव्हा वासकरदेखील तेथे होते. मल्लाप्पांच्या निधनानंतर १८ वर्षांनी नातू तुकोबादादा यांनी मल्लाप्पांचा वारसा पुढे सुरू ठेवला. थोडक्यात वारीच्या इतिहासात आरफळकर आणि वासकर ही दोन्ही नावे प्रामुख्याने महत्त्वाची आहेत. अर्थात पहिला फड कोणी सुरू केला, सोहळ्याचे स्वरूप कोणी दिले, याबद्दल दुमत असू शकते.
आळंदीहून प्रस्थान ठेवणाऱ्या ज्ञानेश्वर माउलीच्या सोहळ्यात आजही वासकरांच्या िदडीला पहिला मान आहे. ज्ञानोबांची पालखी प्रस्थान ठेवते तेव्हा २७ िदडय़ा माउलीच्या मंदिरात एकत्र येतात. या सत्तावीस िदडय़ा वारीत पालखी रथाच्या पुढे असतात. पांढरेशुभ्र धोतर, पांढरी टोपी अशा पोशाखात भगवे ध्वज नाचवत टाळ-मृदुंगाच्या तालावर सारे वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करीत मंदिरात येतात. पण वासकरांची िदडी येते ती मात्र रामकृष्ण हरीचा गजर करत आणि पांढरा ध्वज नाचवत. वासकरांचा फड हा तुकोबांचा गुरुपदेश पाळतात. म्हणून ते रामकृष्ण हरीचा गजर करतात.
वासकरांना वारीमध्ये आरतीच्या वेळेसदेखील मानाचे स्थान असते. आरफळकर, चोपदार आणि वासकरांचे प्रतिनिधी मिळून रोज सायंकाळची आरती केली जाते. वारीच्या सोहळ्यात वीणा आरफळकरांची तर भजन वासकरांचे व माउलीसाठी तंबू व घोडे शितोळे सरकारांचे अशी रचना कार्यरत आहे. आळंदीच्या वारीत सध्या पालखी रथाच्या पुढे २७ आणि मागे तीन-चारशे फड असतात. यात वासकरांचा फड सर्वात मोठा असतो. त्यामध्ये सुमारे दोन-तीन हजार वारकरी सामील झालेले असतात. या साऱ्या फडाचे नियंत्रण फडप्रमुखाकडे असते. विठ्ठल वासकर हे सध्या वासकरांच्या फडाचे प्रमुख आहेत. विठ्ठलराव वासकर हे जिल्हा न्यायाधीश होते पण त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली असून पूर्ण वेळ फडाचे काम पाहत आहेत.
वारीच्या सद्यस्थितीवरील ते स्पष्ट बोलतात. गेल्या आठ-दहा वर्षांपासून वारीतील गर्दी खूप वाढली आहे. याचा अर्थ लोकांचा भक्तीकडे कल वाढला आहे असा काढायचा का, या प्रश्नावर ते म्हणतात, ‘‘संख्यात्मक फरक खूप पडला आहे, पण त्यामानाने गुणात्मक फरक दिसत नाही. पूर्वीच्या काळात वारकऱ्यांनी अनेक हाल सोसले आहेत. बलगाडीतून सामान नेत, तळावर जे काही उपलब्ध असेल त्याप्रमाणे आपली व्यवस्था लावत, तळावर चिखल असेल तर त्यातच घोंगडे अंथरून त्यावर विश्रांती घेत. आज वारीत साधा पाऊस जरी आला तरी अनेक जण आपली जागा सोडून धावाधाव करतात.’’ याच अनुषंगाने ते पुढे सांगतात की वारी ही करमणूक नाही तर ते निष्ठेने पाळण्याचे व्रत आहे.

पूर्वीच्या काळात वारकऱ्यांनी अनेक हाल सोसले आहेत. तळावर चिखल असेल तर त्यातच घोंगडे अंथरून त्यावर विश्रांती घेत. आज वारीत साधा पाऊस जरी आला तरी अनेक जण आपली जागा सोडून धावाधाव करतात.

संतांचे विचार वारीने आजवर जपले आहेत. संतांनी समाजाच्या दांभिकतेवर अनिष्ट रूढी-परंपरांवर घाव घातला. वारीचा प्रसार इतका झाला असेल तर एकूणच समाज विचार का बदलत नाही. वारी माणसाच्या मनात चांगले बदल घडवून आणू शकत नाही का? याबाबत विठोबा वासकर सांगतात की  ‘‘वारी तुम्हाला अनुभवावी लागते. त्यासाठीचे श्रम सहन करावे लागतात. तुम्ही वारीत आल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाहीत. एकदा अनुभव घेतला की मग तुम्हाला चटक लागेल.’’
वारकरी संप्रदाय व भागवत धर्मावर बरेच लिहिले-बोलले जाते पण सध्याचा भागवत धर्म कसा आहे, तो बदललेला आहे का, यावर वासकर सांगतात, ‘‘पूर्वीच्या निष्ठा वेगळ्या होत्या. श्रद्धा वेगळ्या होत्या. संतांच्या शब्दावर विश्वास होता. संतांनी अनेक अनुभवांतून मांडलेले-जोपासलेले तत्त्व प्रमाण मानले जात असे. पण आता पिढय़ा आणि विचार यात बदल झालेला आहे. भागवत धर्मात बाहेरून हे बदल झाले आहेत.’’