दरवर्षी आळंदीहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांची पालखी घेऊन जाणारी शिस्तबद्ध वारी हा अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असतो. म्हणूनच वारीतील मानाच्या अशा तुकोबांच्या वारसा जपणाऱ्या दिंडीचा हा लेखाजोखा-
ज्येष्ठात देहूहून आणि आळंदीहून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी निघतात आणि एक भक्तीपूर्ण असा सोहळा सुरू होतो. लाखोंच्या संख्येने लहानथोर सारे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर भक्तिभावाने वाटचाल करू लागतात. गेली हजारो वष्रे हा भक्तीचा अनोखा सोहळा त्या वाटेवर अगदी अव्याहतपणे सुरू आहे. सर्वत्र एकच जयजयकार सुरू असतो. टाळ-मृदुंगाच्या गजरात सारे वारकरी ग्यानबा तुकाराम असा गजर करत सारे अंतर भावभक्तीने, विठोबाच्या दर्शनाच्या ओढीने पार करतात. पण याच वारकऱ्यांपकी काही जण मात्र ग्यानबा तुकारामचा गजर नाही तर रामकृष्ण हरीचे सूर आळवत असतात. लाखोंच्या त्या कल्लोळात खरे तर हे फारसे कोणालाच कधी लक्षात येत नाही. पण रामकृष्ण हरीचा
नेमका हा तुकोबांचा वारसा काय आहे याबाबत मात्र अनेक प्रवाद आहेत. याबाबत या दिंडीचे फडाचे प्रमुख विठ्ठलराव वासकर यांच्याकडून माहिती मिळते त्यानुसार या कथेची सुरुवात होते ती १७०७ मध्ये मल्लाप्पा वासकरांच्या जन्मापासून. मात्र तुकोबांचा वारसा कसा हस्तांतरित होत गेला यासाठी थोडेसे आणखी मागे जावे लागेल. तुकोबांनी निळोबांना अनुग्रह दिला तेथे या कथेची खरी सुरुवात होते. निळोबांची तुकोबांवर प्रचंड श्रद्धा. तुकोबांचे दर्शन झाल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही म्हणून त्यांनी तेरा दिवस तुकोबांचा धावा केला. तेरा दिवसांनी तुकोबांनी त्यांना दर्शन दिले. अनुग्रह केला. आपला वारसा एका समर्थ हाती सोपवला. निळोबांच्यानंतर हा वारसा गेला तो शंकर शिऊरकर यांच्याकडे. आता प्रत्येक वेळी तुकोबांचा वारसा कोणाकडे द्यायचा हा प्रश्न येणार, तेव्हा तुकोबांनी त्यांना दृष्टांत दिला आणि सांगितले की मल्लाप्पा वासकरांच्या घरात माझा वारसा
वारीचा ज्ञात इतिहास हा पार ज्ञानेश्वरांच्याही आधीच्या काळात जाणारा आहे. पण तेव्हा त्याला आजच्यासारखे सोहळ्याचे स्वरूप नव्हते. आजच्यासारखी फड व्यवस्था नव्हती. आज वारीत दिसणाऱ्या अनेक िदडय़ा, या फड म्हणून ओळखल्या जातात. हैबतराव आरफळकर यांनी ही फडपरंपरा सुरू केली, असे मानले जाते. तर काही जणांच्या मते मल्लाप्पा वासकर यांनी फड पद्धतीने वारी सुरू केली असेदेखील मानले जाते. तुकोबांच्या अनुग्रहानंतर मल्लाप्पा वासकर हे गळ्यात ज्ञानेश्वर माउलीच्या पादुका घालून पंढरपुरी जात असत. मलाप्पा वासकर यांचे १७९९ साली निधन झाले. त्यानंतर सुमारे अठरा वर्षांनी म्हणजेच १८१७ पासून त्यांचे नातू तुकोबादादा यांनी फड पद्धतीला चालना देऊन वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. प्रचलित माहितीनुसार हैबतराव आरफळकर यांनी १८३१ पासून आज दिसणारी वारी सुरू केली असे म्हटले जाते. हैबतराव हे िशदे सरकारांचे सरदार. सातपुडय़ातून प्रवास करताना त्यांना भिल्लांनी कैद केले, तेव्हा त्यांनी दिवस-रात्र हरिपाठ केला, विठ्ठलाचा धावा केला. ते पाहून भिल्लांनी त्यांना सोडून दिले. पुढे विरक्ती येऊन हैबतराव हे आळंदीस स्थायिक झाले. १८३१ मध्ये त्यांनी िशदे सरकारांचे आणखी एक सरदार अंकलीकर शितोळे यांच्या राजाश्रयाखाली वारीचे स्वरूप विस्तारले. त्याच वेळी वासकरदेखील त्यांच्याबरोबर होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा