बार्सिलोना हे स्पेनमधील माद्रिदखालोखालचे मोठे शहर. डोंगररांगा, माँजुईक हिल, बंदरामुळे भरपूर मासे, तसेच मुबलक द्राक्षांच्या वेगवेगळ्या वाइन्स, आधुनिक फॅशनचे माहेरघरच असल्याने बार्सिलोना हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोलंबसच्या यशस्वी अमेरिका सफरीमुळे आयबेरिअन पेनिन्सुलातील स्पेन या देशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. इथल्या आरगन राज्यात सेव्हिआप्रमाणे बार्सिलोना हे बंदर असल्याने हा महत्त्वाचा भाग झाला. पुढे बार्सिलोनेट या विभागाची राजधानी बनले. बार्सिलोना हे स्पेनमधील माद्रिदखालोखालचे मोठे शहर. माद्रिद राजधानी तर बार्सिलोना व्यापारी पेठ बनली. त्यामुळे आसपासच्या देशांची वर्दळ वाढली. त्यामुळे राजवाडे, चर्चेस, वगैरेंसारख्या भव्य वास्तूंचे रूपांतर पुढे शाळा, म्यूझियम्स, लायब्ररी, सरकारी कचेऱ्या असे झाले आहे. एका दिशेने माँसराट या अर्धवर्तुळाकार डोंगररांगा, माँजुईक हिल, बंदरामुळे भरपूर मासे, तसेच मुबलक द्राक्षांच्या वेगवेगळ्या वाइन्स, आधुनिक फॅशनचे माहेरघरच असल्याने बार्सिलोना हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
अंतोनी गौडी या आर्किटेक्टच्या अलौकिक कलाकृतींचा आविष्कार ही येथील खासियत. त्याने उभारलेल्या अनेक इमारती, पार्क हे नावीन्यपूर्ण आकार घेऊन साकार झाल्या. नैसर्गिकरीत्या उंचसखल भाग असलेल्या या भागात समुद्रसपाटीपासून ४५० फूट उंचीवर टेकडीच्या आसपास उच्चभ्रू लोकांसाठी १९व्या शतकात इंग्लिश पद्धतीने अद्ययावत बांधणीच्या इमारती बांधल्या व त्या भागाला पार्क गुईली असे नाव दिले. पार्कच्या प्रवेशद्वारावर दोन बाजूंना कामगारांसाठी निवासस्थान असलेल्या दोन इमारती आहेत, पैकी एक आता लायब्ररी, शॉपिंग स्टोअर आहे व दुसरे म्यूझियम आहे. पार्कमध्ये जाण्यासाठी पायऱ्यांत लँडस्केपिंगमध्ये सापाच्या फण्यातून झुळूझुळू वाहणारा प्रवाह आहे. जवळच्याच फुलझाडांना पाण्याची सोय म्हणून वरच्या भागात जमिनीवर पडलेले पाणी मकर राशीच्या चिन्हाप्रमाणे असलेल्या पागोळ्यातून येण्याची सोय आहे. आसपासचा आसमंत न्याहाळण्यासाठी काचेच्या तुकडय़ांनी सजलेल्या प्रशस्त गच्चीवर बसण्यासाठी कमरेला सपोर्ट म्हणून समुद्राच्या लाटांप्रमाणे सीट्स ठेवलेल्या आहेत.
खाली उतरताना वरच्या रस्त्याला टेकू म्हणून तिथल्याच दगडांचे स्तंभ केले आहेत. त्यातील एका स्तंभावर एक बाई डोक्यावर कपडय़ांचे गाठोडे व हातात बादली घेऊन निघाली अशी आकृती केली आहे. खालच्या बाजूने १०० खांबांनी गच्चीला आधार दिला आहे. व त्या मोकळ्या जागेत पूर्वी बाजार भरत असे. गच्चीवर पडणारे पाणी फुकट जाऊ नये म्हणून खालील खांब पोकळ ठेवले होते. तेथून पाणी टाकीत जाण्याची सोय होती. मार्केटच्या छतावर फळे, फुले, मासे, स्पॅनिश ढाल अशी चित्रे मोझेकमध्ये आहेत. रोममधील व्हेटिकन येथील सेंट पीटर्स बेसिलिकासारखे भव्य चर्च झाले पाहिजे ह्य भावनेने प्रेरित होऊन जगप्रसिद्ध सेग्राडिआ फॅमिलिया चर्चचा विचार पक्का झाला. लवकरच त्याचे ड्रॉइंग गौडीकडे आले. रीतसर पाया घालून बांधकामाला सुरुवात झाली. समोरील प्रवेशावर येशूच्या जन्माची चित्रे आहेत तर मागील बाजूस त्याचा अखेरचा प्रवास चित्रित केला आहे. या चर्चचे तेरा टॉवर्स आहेत. अजूनही चर्चचे काम पूर्ण झाले नाही. गौडीचे विद्यार्थीच हे काम करत असून २०२६ पर्यंत होईल असा अंदाज आहे. गुईली पार्क व या चर्चच्या आसपासचा परिसर सदैव जत्रेप्रमाणे माणसांनी भरलेला असतो. आतमध्ये प्रवेश ठरावीक वेळीच देतात. काही वेळा तासन् तास तिकिटासाठी रांगेत उभे राहून आपली वेळ आल्यावर खिडकी बंद होते, व आपला दिवस फुकट जातो. त्याकरिता ऑनलाइन रिझव्र्हेशनची सोय आहे.
इथे आवर्जून भेट देण्याचे ठिकाण म्हणजे ल् राम्ब्ला स्ट्रीट. हा डायागोनल ह्य मुख्य रस्त्यापासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत तीन किलोमीटर लांबीचा रस्ता. अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत जत्रेसारखा माणसांनी फुललेला असतो. त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँड्सची दुकाने, खाण्यासाठी मधल्या रांगेत स्पॅनिश फूडचे ठेले, हातचलाखीचा खेळ करणारे जादूवाले, तसेच तिथले सिटी मार्केट. मार्केटमध्ये भाजी, फळे, फुले, मासळी, चिकन मटणचे स्टॉल्स. जिनसांची मांडणीच इतकी अप्रतिम की पाहतच राहावे. खरेदी तर सोडाच, पण ही मांडणी पाहण्याकरिता नक्कीच फेरी मारलीच पाहिजे. मी तर म्हणेन हा ल् राम्ब्ला आपल्या दादरच्या रानडे रोडचा बाप किंवा आजाच. पण इथे फिरताना आपल्या पर्स, पाकीट याकडे डोळ्यात तेल घालून पाहावे लागते. या अफाट गर्दीत आपला ऐवज केव्हा लंपास होईल सांगता येत नाही.
स्पेन हे ऑलिव्ह व वाइनच्या द्राक्षांच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे, हे जगजाहीर आहे. अगदी चण्यामण्या बोरांपासून ते मोठय़ा जांभळाएव्हढय़ा आकाराची ही फळं असतात. तीन ते चार प्रकारची ऑलिव्ह आइल्स तयार केली जातात. हिरवट रंगाचे ऑलिव्ह ऑइल हे सर्वोत्तम असते. असे म्हणतात, स्पेनमध्ये लहान बाळांना सर्वात प्रथम चाखवले जाते ते ऑलिव्ह ऑइल. नुसत्या पावाचा तुकडा त्यात बुडवून खाण्याची येथे प्रथा आहे. पण खरंच फार चविष्ट लागते. स्पॅनिश लोकांच्या म्हणण्याप्रमाणे फ्रेंच आमच्याकडून ऑइल आयात करून आपले म्हणून जगभर विकतात. कोण जाणे? पण खरंच, बसमधून फिरताना कित्येक मैलांपर्यंत पसरलेली ऑलिव्हची शेती दिसते. ऑलिव्ह्जप्रमाणे द्राक्षांची लागवडही भरपूर. बार्सिलोना येथून झारागोसा येथे जाताना वाटेत बोडेगा येथील खास व्हिनेयार्डमध्ये वाइन टेस्टिंगसाठी गेलो होतो. तिथे मैलोन् मैल पसरलेल्या बागांतील लागवड, वाइन बनवण्याची प्रक्रिया, अगदी ऑरगॅनिक वाइन कशी बनवली जाते व साठवतात ते गाइड इतक्या छानपणे सांगत होती की एक डॉक्युमेंटरीच पाहत आहोत असे वाटले.
बिलबाव हे बिस्क प्रांतात, सॅन सॅबेस्टिअनची राजधानी. बिलबाव हे कांता ब्रिअन व पिरेनीस माउंटन यांच्या दरीत वसले आहे. मार्विन व इबेझ्बल या दोन नद्यांचा संगम बिस्क बेमध्ये होत असल्याने त्यांच्या पातळीत भरती-ओहोटीच्या वेळेस चढउतार होत असतो. या ठिकाणी चांगला १७ कि. मी. लांबीचा कालवा झाला आहे. त्यामुळे जहाजांच्या कामासाठी याचा १९६२पर्यंत गोदीसारखा उपयोग होत असे. कालव्याला दोन तीर असल्याने जागेला बिलबाव हे नाव पडले. इथला गुगन हाईम हे अनोख म्यूझियम आहे. जगभरातील वेगवेगळ्या कलाकारांच्या आविष्काराने नटलेला याचा दर्शनी भाग टायटेनियम पत्र्याच्या क्युब्ससारखा दिसतो. आतमध्ये २५ टन वजनाच्या लोखंडी पत्र्यांनी चक्रव्यूहासारखी वेगळीच अवाढव्य कलाकृती केलेली आहे. त्यातून फिरताना उंचसखल, गोलाकार, वरखाली फिरल्यासारखे वाटते व बाहेर आल्यावर जरा गरगरल्यासारखे होते. वरच्या मजल्यावर व्हिस्की, बिअर बाटल्यांवरील पेपर, रिंग्ज, बुचं वगैरे वापरून कुणी आफ्रिकन कलाकाराने २५ फूट बाय २० फूट असा एक शोपीस करून लावलेला आहे. एका खोलीत हिटलरने मारलेल्या १२०० ज्यू लोकांपैकी बरेच फोटो लावलेले आहेत. पूर्वी त्या खोलीत काळोख असे व ज्या फोटोपुढे आपण उभे राहू तेथे दिवा पेटत असे.
गुगन हाईम येथे जगातील कोणत्याही देशातील कलाकाराला आपली कलाकृती सादर करायला वाव दिला गेला आहे. त्यात आपण भारतीयही मागे नाहीत. लंडनस्थित उद्योगपती मित्तल यांनी प्रदर्शनातील एक भाग सांभाळण्याची धुरा वाहिली आहे, तसेच तरुण उद्योजग अनिष कपूर यांनी धातूचे ७५ रंगीत गोळे रचून आकृती केली आहे. दर्शनी भागात स्त्रियांचे बेढब शरीरमान दाखवून वेगळीच पेशकश केली आहे. कुणा जगप्रसिद्ध अमेरिकास्थित फ्रेंच मॉडेलच्या जीवनातील चढउतार या विषयावर लहानसा चित्रपट दाखवला जातो. तिच्या कलाकृतींनी एक विभागच व्यापला आहे. म्यूझियमबाहेर मोठय़ा कुत्र्याचा लोखंडी सांगाडा आहे. पण तो रंगीत फुलांनी सजवला आहे. मोसमाप्रमाणे वर्षांत दोन-तीन वेळा फुले बदलली जातात.
गावात मूरिश, ख्रिश्चन व ज्यू लोक राहत असल्याने अल्कझार म्हणजे मूरिश राजांचा राजवाडा, ख्रिश्चन समाजाचे भव्य कॅथ्रिडल आणि ज्यू लोकांचे सेनेगॉगही आहे. अल्कझारमध्ये जाताना आवारातील चर्चमध्ये वेगवेगळ्या स्पोटर्ससाठी लागणारे वेश केलेले पुतळे, सुंदर विणकामाच्या टेपेस्ट्रीज्, सर्व राजांची चित्रे असलेली अशी निरनिराळी दालने आहेत. अलीकडेच लागलेल्या आगीत तेथे बरेच नुकसान झाले. काही भिंतींवर आगीच्या खुणा स्पष्ट दिसतात. सर्व हॉल्सची छते दुसऱ्या राजवाडय़ातून आणली आहेत. सेगोव्हिआची अजून एक खासियत म्हणजे रेस्टॉरंटमध्ये मिळणारी सक्लिंग पिग ही डिश. डुकराचे तीन-चार आठवडय़ांचे पिल्लू ओव्हनमध्ये भाजून टेबलावर आणतात. शिजलेले मांस इतके कोवळे असते की त्याचा तुकडा सुरीने न करता बशीने करतात व बशी तोडून टाकतात. खाताना मांसही तोंडात विरघळतेच. हा सर्व प्रकार क्रूर वाटतो, पण विशेष असल्याने चाखून पाहिला.
ग्रॅनाडा येथील अल् हंब्रा हा अलक झार, मूरिश राजाचा राजवाडा म्हणजे अरब नजाकतींचा उत्कृष्ट नमुना. हा भाग सिआरा नेवाडा डोंगराच्या पायथ्याशी असल्याने गावाच्या रक्षणार्थ निस्रीद राजाने उंचावर राजवाडा बांधला. अरेबिक भाषेत अल् हंब्रा म्हणजे लाल रंगाच्या दगडाचा किल्ला. पुढल्या पिढीत राजा मोहंमदने येथे आपला राजवाडा बनवून ग्रॅनाडा अरब इस्लामचे मुख्य केंद्र बनवले. आतील बांधकाम चौकोनात आहे. हॉल ऑफ अब्सेराहास ही दरबाराची जागा. दिवाणखान्यातील उंच छत सोनेरी, लाल पिवळ्या रंगांचे आहे. इथली विशेष गोष्ट म्हणजे शेवटच्या सुलतानने देशद्रोही लोकांना बोलावून अनपेक्षितपणे मारले होते. जरा पुढे लअ्रंब्रेकल राजा व वजीर बसण्याची जागा. लांबच्या लांब हॉलचे सोनेरी उंच छत सांभाळण्यासाठी शंभराच्या वर कमानी. त्याखाली लाकडावर असे काही काम केले आहे की पाहणाऱ्याला वाटते की मधमाश्यांचे पोळेच. कोनाडय़ात असलेल्या ऐतिहासिक सुरयांवर हरणे, बगिच्यातली फुले अशी कॅलिग्राफी केलेली आहे.
पॅलेसिओ जनराली ही जागा फक्त राजा, बेगम व त्यांचा जनाना यासाठीच. मध्यभागी कोर्ट ऑफ लायन्स बारा संगमरवरी सिंह असलेला कारंजा आहे आणि अजूनही चालू आहे हे विशेष. आवारात फिरताना खास पट्टराणीकरता व दुसऱ्या राणीसाठी वेगवेगळी दालने. तेथील भिंतींवर चुरगळलेल्या कागदाप्रमाणे दिसणाऱ्या प्लास्टरचा गिलावा दिला आहे. तर दरवाजे, कमानींवर जरतारीची वेलबुट्टी व कुराणातील कलमे कोरलेली. त्याकरता खास अरबी कलाकार आणले होते. जिनान् अल् आरिफ ही राजाची विश्राम व राजवाडय़ावर लक्ष ठेवण्याची जागा. या ठिकाणी विशेष सुशोभीकरण नाही, पण आग्रा येथील हवामहलप्रमाणे असलेल्या येथे उभे राहिल्यावर समोरच डोंगर रांगा व आताचे ग्रॅनाडा असा सुंदर देखावा दिसतो. हे सर्व पाहताना आपण टेरेस गार्डन व पक्ष्यांच्या अभयारण्यामधून बाहेर पडतो ते कळतच नाही. बरोबरीने सुलतानांच्या सौंदर्यदृष्टीला नक्कीच दाद द्यावी लागते.
झारागोसा हे एब्रो नदीकाठचे शहर. या शहरात मुस्लिम, ज्यू व ख्रिश्चन धर्माचे लोक होते. त्यामुळे येथील इमारतीत ह्य संस्कृतींचा मिलाफ आहे. इथल्या अवर लेडी ऑफ पिलर बेसिलिकाबाबत आख्यायिका आहे. सेंट जेम्स द ग्रेट याला एके दिवशी एब्रो नदीकाठी प्रार्थना करत असताना मेरी त्याला दिसली. मेरीने त्याला सांगितले की, काही काळजी करू नकोस. मी उभ्या असलेल्या खांबाप्रमाणे लोकांचा धर्माबाबत विश्वास दृढ होऊन तुझे काम होईल. मेरीने जेम्सला इवल्याशा लाकडी खांबावर उभी असलेली आपली मूर्ती देऊन तेथे चर्च उभारायला सांगितले. ज्या दिवशी चर्च उभारले तो १२ ऑक्टोबरचा दिवस हा फिएस्ता डेल् पिलार म्हणून साजरा केला जातो. नऊ दिवस चाललेल्या सोहळ्यात मदर मेरीची इवलीशी मूर्ती चर्चच्या आवारात खांबावर उभी असते. रोज नव्या फुलांची सजावट असते. आवारात लाल फुलांचा सडा असतो. त्यामुळे भक्तगणांना रेड कार्पेट वेलकमचा आनंद अनुभवता येतो. इथल्या स्थानिक लढाईत विरोधकांनी टाकलेले दोन तोफगोळे स्फोट न होता तसेच राहिले, ते चर्चमध्ये खांबावर आहेत.
माद्रिद येथून टोलेडो येथे येताना तागुस नदीवरील रोमन काळातील पाच कमानींच्या पुलावरून ल्मांच्या व कॅस्टील या पठारी भागांच्या मध्ये एका डोंगरावर टोलेडो हे शहर वसले आहे. उंचावर असल्याने पुलावरील कमानींच्या बाजुलाच चार मिनारे असलेला अल् का झार हा आकाशाला भिडल्यागत वाटतो. सिव्हिल वॉरमध्ये बराच उद्ध्वस्त झालेला अल् का झार शहरापासून दूर असल्याने क्षय रोग्यांचे निवासस्थान झाला होता. पण आता तेथे मोठी लायब्ररी व मिलिटरी संग्रहालय आहे. ओल्ड सिटीमध्ये जाण्याकरता दोन मोठे एस्कलेटर्स आहेत. आतमध्ये अरुंद दगडी रस्ते व लहान इमारती आहेत. भव्य कॅथ्रिडलचा पाच मजली बेल टॉवर ३०० फूट उंच आहे. कमानींचा आधार असलेला वरचा अष्टकोनी मजला सूर्य माथ्यावर असल्याने पाहताना डोळ्यासमोर काजवे चमकू लागतात.
स्पेनच्या सांग्रिआची वाइन काँकॉश्न चव घ्यायची असेल तर ती बार्सिलोना येथेच, असे आमच्या गाइडने सांगितले. कारण वाइनरीज् इथूनच जवळ असल्याने रेड वाइन किंवा स्पार्कलिंग वाइनची व्हाइट सांग्रिआ इथेच. स्पेनमधले तापाज् म्हणजे लहान लहान स्टार्टर्स, सी फूड पायेया समुद्रकिनारी बसून खाण्याची मजा औरच. स्पेन भेटीसाठी मार्च ते नोव्हेंबर हा मोसम चांगला. आपल्याकडून विमानाने कोणत्याही युरोपिअन देशातून बार्सिलोना अथवा माद्रिद येथे जाता येते.
गौरी बोरकर – response.lokprabha@expressindia.com