गरमीगरम, कुरकुरीत, खमंग भजी बघितली किंवा त्यांचा वास आला की कुणाच्याही तोंडाला पाणी सुटतं. दिवस पावसाळ्याचे असतील तर अशी भजी दिसली नाहीत, किंवा आसपास त्यांचा खमंग वास आला नाही तरी चहाबरोबर भजी हवीतच असं वाटत असतं. या भज्यांबाबत एक भन्नाट निरीक्षण आहे. घरी तुम्ही कितीही जीव ओतून, हात सल सोडून भजी करा, बाहेरच्या भज्यांची चव काही घरच्या भज्यांना येत नाही. बरं बाहेरची भजी म्हणजे तुम्ही एखाद्या टापटीप हॉटेलात जाऊन भजी खाल्लीत तर नुसती भजी खाल, पण ‘ती’ चव काही तिथे मिळणार नाही. ती चव म्हणजे रस्त्यावरच्या गाडीवरच्या भजीची चव. तुम्ही घरी पुन:पुन्हा तळलं जाणारं म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने घातक असं तेल वापरणार नाही, सगळ्या गोष्टी स्वच्छ, नीटनेटक्या असतील. टापटीप हॉटेलात पण समोर सगळं तुम्हाला हवं तसं स्वच्छ, नीटनेटकं असेल. तिथल्या तेलाबद्दल, भजीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाच्या दर्जाबद्दल तुम्हाला अगदी मनापासून खात्री असेल. भजीबरोबर तिथले वेटर तुम्हाला अगदी सॉस पण देतील. तुम्हाला हवं तसं सॉफिस्टिकेटेड वातावरणही तिथे असेल. पण खमंग भजी खाल्ल्याचा आनंद तुम्हाला रस्त्यावरचा गाडीवालाच किंवा टपरीवालाच देणार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा