44-lp-dr-minalमागच्या आठवडय़ात उज्जैनला जाण्याचा योग आला. निमित्तही विलक्षण होते- अ-वेदना केंद्राचे (Hospice) उद्घाटन. आम्ही परत आलो आणि विचारचR  सुरू झाले.

सामान्यत: अ-वेदना केंद्र हे शेवटच्या अवस्थेतील कॅन्सरच्या रुग्णांसाठी असते. या रुग्णांना कुठल्याही औषधोपचारांपेक्षा वेदनामुक्त अशा अखेरच्या दिवसाची प्रतीक्षा असते. ती सुकर आणि सुस करण्याचा प्रयत्न करणे ही अ-वेदना केंद्राच्या उभारणीमागची संकल्पना.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”

खरंच, जन्म व मृत्यू या मानवी जीवनातील अटळ घटना आहेत. त्या आपल्या नियंत्रणापलीकडे आहेत. आपला जन्म केव्हा, कधी, कसा होणार हे आपल्याला ठरवता येत नाही. मृत्यूचेही तेच. तो कधी, कुठे, कसा सामोरा येईल, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. आपल्याला जर कोणी आपल्या मृत्यूची वेळ सांगितली तर आपण बेचैन होऊ. तोपर्यंतचे आयुष्य केवळ मृत्यूची चिंता करण्यातच घालवू. त्याबद्दल काही माहीत नसलेलेच बरे, नाही का?

पण आयुष्याची समीकरणे इतकी साधी नसतात. आपल्याला मृत्यूची काळवेळ माहीत नसली तरी त्याला टाळण्याचा, लांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करतो. आजमितीला जे प्रचंड संशोधन वैद्यकक्षेत्रात झाले आहे त्यामुळे फक्त मरण पावलेल्या व्यक्तीला जिवंत करता येत नाही इतकेच. बाकी अवयव प्रत्यारोपण, विविध औषधोपचार, जेनेटिक इंजिनीअिरगसारखे अद्ययावत तंत्रज्ञान यांनी मानवी आयुष्य बरेच सुखकर आणि आपल्या तंत्राबरहुकूम झाल्यासारखे दिसत आहे. कृत्रिम जीवनयंत्रणांच्या आधारे मृत्यूलासुद्धा बराच काळ झुलवणे शक्य झाले आहे.

एक मात्र खरे, दीर्घायुष्याची आस जशी प्रत्येकाला असते, तशी ‘शेवटचा दिस गोड व्हावा’ ही इच्छाही आपल्या अंतरी असते. मृत्यू जेवढा उशिरा येईल, तेवढे उत्तम, पण जेव्हा येईल तेव्हा चांगल्या प्रकारे यावा असेच वाटते. भगवद्गीतेत असे म्हटले आहे, ‘जो अंतकाळी माझेच स्मरण करीत देह सोडतो, तो माझ्या स्वरूपाला येऊन पोहोचतो. यात संशय नाही.’ यापेक्षा ‘गोड दिस’ आणखी कुठला? पण प्रत्येकाच्या भाग्यात असे चांगले मरण असते का?

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केले आहेत. त्यापैकी एक आहे ‘जगण्याचा अधिकार.’ (राइट टू लीव्ह). जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा, सन्मानाने जिवंत राहण्याचा अधिकार असतो. आणि अलीकडेच दिलेल्या एका निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे मान्य केले की  ‘राइट टू लीव्ह’ याच्यामध्ये ‘राइट टू डाय इन अ डिग्निफाइड मॅनर’ हा अधिकारही समाविष्ट असतो. प्रत्येकाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच सन्मानाने मरण्याचा अधिकारही आहे.

या ‘सन्मानाने मरण्याच्या अधिकारा’चा सन्मान राखणे हा अ-वेदना केंद्राच्या (Hospice) उभारणीमागचा मुख्य उद्देश असतो. वैद्यकशास्त्राच्या नेत्रदीपक प्रगतीमुळे रुग्णांना बराच काळ जिवंत ठेवता येते. पण जीवनही इतके गुंतागुंतीचे व वातावरण प्रदूषणमय झाले आहे की गंभीर आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यांना कृत्रिम जीवनयंत्रणा पुरवणाऱ्या सुसज्ज इस्पितळांची संख्या कमी पडू लागली आहे.

पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर अनैसर्गिक उपायांनी जिवंत ठेवलेल्या रुग्णांच्या हालअपेष्टा संपत नाहीत. कितीही चांगले उपचार व उपाययोजना केल्या तरी त्यांचे जिणे नरकयातनांसारखे होते. त्यांना ना सन्मानाने जगण्याचा अधिकार, ना सन्मानाने मरण्याची संधी. या परिस्थितीचा संवेदनशील विचार अ-वेदना केंद्रा (Hospice) च्या उभारणीमागे आहे. हॉस्पिटल (Hospital) आणि अ-वेदना केंद्र (Hospice) यांच्यात मोठा फरक आहे. हॉस्पिटल्स अनेक प्रकारांनी रुग्णाला जिवंत ठेवण्याचा, त्याचा मृत्यू लांबवण्याचा प्रयत्न करतात. पण गंभीररीत्या आजारी असणाऱ्या, कदाचित आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असणाऱ्या रुग्णांचे मरण अटळ आहे, हे सत्य अ-वेदना केंद्रामध्ये (Hospice) स्वीकारले जाते. जर मृत्यू हे सत्य असेल तर त्याला सन्मानाने, शांतपणे व शक्य असेल तर आनंदाने सामोरे जावे, अशी संधी अ-वेदना केंद्र (Hospice) उपलब्ध करून देते. शेवटचा दिवस समाधानाने गाठावा असे ‘पाथेय’ रुग्णांना अ-वेदना केंद्राकडून (Hospice) दिले जाते. लांबच्या प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीला आपण सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देतो, त्याप्रमाणे जाणाऱ्याला प्रेमाने, आनंदाने अलविदा करावे, ही अ-वेदना केंद्राची (Hospice) भूमिका आहे.

हिंदू धर्मातील समाधीमरण, जैन धर्मातील सल्लेखना, संथारा इत्यादी मृत्यूशी निगडित धार्मिक संकल्पना आहेत. या सर्व कल्पना कठोर तपाशी संबंधित आहेत. अ-वेदना केंद्र (Hospice) अशा सर्व धार्मिक चौकटींच्या पलीकडे जाते आणि सन्मानाने मरण्याची संधी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देते.

भारतात अ-वेदना केंद्रांची संख्या मोजकीच आहे. मुंबई, गोवा, बंगलोर आणि हे चौथे उज्जैनमध्ये. आणि आमच्या माहितीनुसार ही सर्व केंद्रे नि:शुल्क आहेत. असे केंद्र चालवणे हे मोठे आव्हान आहे. एक वेळ निष्णात डॉक्टर मिळणे सोपे ठरेल, पण प्रेमाने सेवा करणारी माणसे मिळणे आजच्या काळात कठीणच आहे. हॉस्पिटलमधील सेवा आणि अ-वेदना केंद्रातील सेवा यांत मोठा फरक आहे. हॉस्पिटलमध्ये सेवेनंतर रुग्ण बरा होण्याचा आनंद असतो. अ-वेदना केंद्रात रुग्ण अखेरचे क्षण मोजतो आहे हे माहीत असूनही हसतमुखाने सेवा करणे अपेक्षित असते.

अशा अनोख्या पद्धतीने समाजाची, मानवतेची सेवा करावी, ही कल्पना ज्याला सुचली त्याला ‘खुदा का बंदा’ मानायला हवे. त्याच्या हृदयातील प्रेमाला खरोखरच सीमा नाहीत. अशांचे हात बळकट करणे, त्यासाठी जमेल ते करणे, ही आपल्याही प्रेमाची अभिव्यक्तीच ठरेल.
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com