चित्रपट, टीव्ही, वृत्तपत्रे, जाहिराती, रेडिओ आणि इंटरनेट माध्यमांनी मिळून बनलेले भारतीय मनोरंजन उद्योगक्षेत्र आज अनेक अर्थानी वेगळ्या वळणावर येऊ न पोहचलं आहे. मनोरंजन क्षेत्राचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून या क्षेत्रात उद्योगाच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत. मनोरंजन क्षेत्राचा वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी फिक्की- फ्रेम्स २०१४ या तीन दिवसीय वार्षिक परिषदेचं आयोजन मुंबईत नुकतंच करण्यात आलं होतं. या परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्राची पुढची दिशा आणि वाटचाल कशी असेल याची सांगोपांग चर्चा करण्यात आली.
भारतीय प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन व्यवसायाशी निगडित उद्योग क्षेत्र हे जगातील काही अत्यंत झपाटय़ाने प्रगती करणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. भारतीय अर्थव्यवस्थे-मध्येसुद्धा मनोरंजन क्षेत्राचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. प्रसारमाध्यमे आज सर्वसामान्य जनतेच्या जीवनाचे अविभाज्य घटक बनलेली आहेत. चित्रपट असो, टीव्ही असो, वृत्तपत्रे असोत किंवा रेडिओ असो, या सर्व माध्यमांचा जनतेच्या जीवनाशी पारंपरिकरीत्या अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे आणि त्याचा भारतीय जनमानसावर आतापर्यंत नेहमीच प्रचंड मोठा प्रभाव राहिला आहे. त्यामध्ये भर पडली आहे ती नव्याने तयार झालेल्या सोशल नेटवर्किंग सेवा, अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, ऑनलाइन गेमिंग आणि मोबाइल अॅप्लिकेशन्स सेवांची. या सर्वच माध्यमांचा प्रेक्षकांच्या मनावर हवा तो सामाजिक परिणाम प्रभावीरीत्या साध्य करण्यासाठी खूप चांगला उपयोग आज करून घेता येऊ शकतो. चित्रपटाद्वारे आणि टीव्ही वाहिन्यांवरील मालिका किंवा कार्यक्रमाद्वारे भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन होण्याबरोबरच, बदलत्या काळातील सामाजिक बदल आणि त्यानुसार सर्वसामान्यांच्या बदलणाऱ्या अपेक्षाचे चित्र लोकांसमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम साध्य झालेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फिक्की-केपीएमजी यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मनोरंजन उद्योगाने तब्बल ९१८ अब्ज रु. च्या व्यावसायिक उलाढालीचा टप्पा पार करत, एकंदरीत ११.८% वाढीची नोंद केली आहे.
२०१३ हे वर्ष तसं पाहायला गेलं तर मनोरंजन उद्य्ोगासाठी समिश्र असंच राहिलं आहे. एका बाजूने आर्थिक मंदीचे वातावरण आहे, ज्याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसतो आहे तर दुसऱ्या बाजूला या वर्षी चित्रपट आणि खासकरून टीव्ही क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात आंतरिक बदल पाहायला मिळाले आहेत. या वर्षी अनेक कंपन्यांना थोडं थांबून विचार करायची वेळ आली होती. मात्र सर्वानी अचूकतेवर भर देत आपली कार्यपद्धती जोमाने सुरू ठेवली. त्यामुळे सर्व गोष्टींचा सारासारविचार करता अशा आव्हानात्मक वातावरणामध्येही, इतर अनेक उद्योग क्षेत्राच्या तुलनेत मनोरंजन उद्योगाने केलेली एकंदरीत प्रगती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. गेल्या काही काळातील जागतिक मंदीचा फटका खासकरून जाहिरातीच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या टीव्ही आणि वृत्तपत्र माध्यमांना जास्त बसला आहे. रुपयाचे अवमूल्यन झालेले असल्यामुळे त्याची झळही टीव्ही, वृत्तपत्र आणि डीटीएच सेवा कंपन्यांना जोरात बसलेली पाहायला मिळाली. पण अॅनिमेशन आणि व्हिजुअल इफेक्ट्स अशा निर्यातप्रधान क्षेत्राला मात्र त्याची झळ तेवढी बसली नाही. प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योगाशी निगडित गोष्टींचा आढावा घेण्यासाठी नुकतेच फिक्की (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) ‘फ्रेम्स-२०१४’ या वार्षिक परिषदेचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते, त्यात मनोरंजन विश्वाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला. फिक्की-केपीएमजी यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मनोरंजन उद्योगाने तब्बल ९१८ अब्ज रु. च्या व्यावसायिक उलाढालीचा टप्पा पार करत, एकंदरीत ११.८% वाढीची नोंद केली आहे. केबल डिजिटायझेशनच्या निर्णयामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा फायदा झाल्याचे दिसून येत असून प्रादेशिक माध्यमांची वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. सर्वात जास्त म्हणजेच ३८.७ % एवढी व्यवसायवृद्धी डिजिटल जाहिरात क्षेत्राने नोंदवली असून त्याखालोखाल गेमिंग क्षेत्राने २५.५% एवढी व्यवसायवृद्धीची नोंद केली आहे. चित्रपट क्षेत्राने गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.५ % एवढय़ा व्यवसायवृद्धीची नोंद केली आहे. ९०-९५ % चित्रपटगृह आता डिजिटल प्रिंट दाखवत असून मल्टिप्लेक्स चित्रपटगृहवाढीचे प्रमाण भविष्यात काहीसे मंदावणार असल्याचे चित्र या अहवालानुसार दिसत आहे.
२०१२ च्या तुलनेत मागच्या वर्षी चित्रपट क्षेत्राची वाढ कमी झालेली असली तरीही बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठा व्यवसाय केला. भारतातील जवळपास ९० ते ९५ टक्के चित्रपटगृह आता डिजिटल स्Rीनची झालेली असल्यामुळे आता नवीन चित्रपटगृह निर्मितीचा ओघ छोटय़ा शहरांकडे वळणार आहे. रियल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे मल्टिप्लेक्स निर्मितीचा वेग काही काळापुरता काहीसा मंदावणार असे चित्र आहे.
२०१८ या वर्षांपर्यंत टेलिव्हिजन क्षेत्राची वाढ जवळपास ८८ कोटीपर्यंत पोहचेल असा निष्कर्ष काढला जात आहे. डिजिटायझेशनच्या प्रक्रियेनंतर टेलिव्हिजन क्षेत्राला प्रत्येक ग्राहकामागचे सर्वसाधारण उत्पन्न वाढण्यास हातभार लागला आहे. ज्याचा परिणाम म्हणून २०१८ सालापर्यंत टेलीव्हिजन क्षेत्राला होणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या वाटय़ापैकी ग्राहकाकडून मिळणाऱ्या वाटय़ाचे प्रमाण ७१ टक्केने वाढलेले असेल. २०१३ साली भारतात टीव्ही सेट असणाऱ्या घरांची एकूण संख्या १६ कोटीएवढी वाढली आहे. केबल आणि सॅटेलाईट टीव्ही कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांची संख्या जवळपास ९० लाखांनी वाढून एकूण १३ कोटी ९० लाख एवढी झाली आहे. हा केबल आणि सॅटेलाईट ग्राहकवर्ग २०१८ सालापर्यंत वाढून १८ कोटी एवढा झालेला असेल, जो
फिक्की-मनोरंजन समितीचे अध्यक्ष उदय शंकर यांच्या मते-२०१३ हे वर्ष मनोरंजन उद्योगासाठी फार महत्त्वाचं होतं. या वर्षी मनोरंजन उद्योगामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडले.
केबलच्या डिजिटायझेशन प्रक्रियेमुळे टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये मागच्या वर्षभरात क्रांतिकारी बदल घडून आले आहेत. फेज- २ शहरांमधे बंधनकारक असलेल्या डासह्ण (DAS-Digital Access System) चे कामही मागच्या वर्षांत सुरू करण्यात आले. त्यामुळे टीव्ही क्षेत्राच्या विकासाला आता एक योग्य दिशा मिळाली आहे. याचा परिणाम असा झाला आहे की एकंदरीत कॅरीएज फी जवळपास १५-२० टक्क्य़ाने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. परंतु डिजिटायझेशन प्रक्रियेचे खरे फायदे मिळण्यासाठी ब्रॉडकास्टर्स आणि मल्टिसिस्टीम ऑपरेटर्स (MSO) यांना अजून २-३ वर्षे तरी वाट पाहावी लागेल. या शिवाय टीव्ही रेटिंग्स काढण्यासाठी क्लास- १ मार्केटपेक्षा खालच्या शहरांचाही आता समावेश करण्यात आला आहे. १२ मिनिटांच्या जाहिरातीच्या बंधनाचा नियम तसेच टीआरपीऐवजी टीव्हीटी अशा काही आमूलाग्र बदलांमुळे मागच्या वर्षी टेलिव्हिजन क्षेत्रात एकदम वेगळेपण निर्माण झालेले पाहायला मिळाले. टेलिव्हिजन आणि डिजिटल क्षेत्रामध्ये मोठे व्यापक आणि मूलभूत बदल घडत आहेत, ज्याचा फायदा या क्षेत्राची क्षमता जाणून घेण्यासाठी होत आहे.
फिक्की-मनोरंजन समितीचे अध्यक्ष उदय शंकर यांच्या मते, ‘‘२०१३ हे वर्ष मनोरंजन उद्योगासाठी फार महत्त्वाचं होतं. या वर्षी मनोरंजन उद्योगामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडले. त्यामुळे हे वर्ष खरं तर खूप आव्हानात्मक होतं. एक तर मनोरंजन क्षेत्राने अनेक वेगवेगळ्या मुद्दय़ांसंदर्भात ठोस निर्णय घेतले, ज्याचा या क्षेत्राला पुढील काळात होणाऱ्या प्रगतीच्या दृष्टीने खूप फायदा होईल. मनोरंजन उद्योगाच्या प्रत्येक विभागात आज आपल्याला प्रगती झालेली पाहायला मिळत आहे. टेलिव्हिजन क्षेत्रात बारा मिनिटांच्या जाहिरातीचं बंधन असो किंवा सेट टॉप बॉक्स बसवण्याची देशव्यापी मोहीम असो, एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळाला आहे. चित्रपट क्षेत्रात प्रगतीचा आलेख अजून रुंदावतो आहे. या वर्षी वेगवेगळ्या विषयावरील अनेक चांगले चित्रपट यशस्वी झालेले आपण पाहिले. रेडिओ आणि वृत्तपत्र क्षेत्रातही जागतिक पातळीवरील बदल घडत आहेत. मला खात्री आहे की सकारात्मक पद्धतीने केलेलं नियमन या क्षेत्राला अजून वरच्या पातळीवर घेऊन जाऊ शकेल.’’
आर्थिक मंदीचा फटका या वर्षी वृत्तपत्र माध्यमांना जोरात बसला. व्यवसायामध्ये कठीण वातावरण असतानाही २०१२ च्या तुलनेत या क्षेत्राने ८.५ टक्के व्यवसाय वृद्धीची नोंद करत २४३ कोटींचा टप्पा पार केला. डिजिटल माध्यमांच्या स्पर्धेमध्येही या वर्षी जाहिरातदारांनी वृत्तपत्र माध्यमांवर विश्वास व्यक्त करत या क्षेत्राला चांगलाच दिलासा दिलाय. जाहिरातीमधील उत्पन्न आणि अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्र माध्यमांनी सरत्या वषा४त तुलनेने चांगला व्यवसाय केलाय. वृत्तपत्र माध्यमाच्या प्रादेशिक भाषेतील वृत्तपत्रांच्या एकूण व्यवसायामध्येही चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उद्य्ोगातील बडय़ा कंपन्यांनी आयआरएस (Indian Readership Survey) च्या डेटासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण केल्यामुळे काही काळ वाचकांची संख्या मोजण्याची कुठलीच पद्धत अस्तित्वात राहिली नव्हती. त्यामुळे कंपन्यांना मीडिया प्लॅनिंगसंदर्भात अनेक मोठे निर्णय घेण्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्वाचा परिणाम वृत्तपत्र माध्यमाच्या व्यवसायावर झाला.
डिजिटल जाहिरात माध्यमाचे प्रमाण इतर कुठल्याही जाहिरात माध्यमापेक्षा वेगाने वाढल्याचे दिसून येत आहे. डिजिटल जाहिरातीवरील खर्चामध्ये आणि इतर डिजिटल जाहिरातीच्या व्यवसायाने जोरात उसळी मारत ३८.७ टक्के एवढी व्यवसाय वृद्धीची नोंद करत ३०० कोटींचा टप्पा पार केलाय. भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्याचे प्रमाण जवळपास २१.४ कोटीपर्यंत पोहचले आहे. त्यातील जवळपास १३ कोटी जण मोबाइल वर इंटरनेटचा वापर करत असल्याचं दिसून आलं आहे आणि त्याचं एकूण प्रमाण ६१ टक्के आहे. मोबाइल जाहिरातींच्या व्यवसायामध्ये भारतात ५०टक्क्य़ांची वाढ होऊ न २०१४ च्या वर्षअखेरीस ५० कोटींचा व्यवसाय केलेला आपल्याला दिसून येईल असा निष्कर्ष आहे. त्यामुळे मोबाइल जाहिरतींचं विपणन करणाऱ्या कंपन्यांनी काळाची गरज ओळखून आतापासूनच त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. डिजिटल माध्यमांवर जाहिरातीच्या केलेल्या खर्चाचे प्रमाण २०१४ च्या वर्षअखेरीस ३७ टक्क्य़ांनी वाढून ४१० कोटी एवढे झालेले असेल. आशियामध्ये गूगल आणि फेसबुकवरील ऑनलाइन जाहिरातींचे प्रमाण एकूण व्यवसायापैकी जवळपास ५० टक्के एवढे आहे. यावरून आपल्याला डिजिटल आणि ऑनलाइन माध्यमांचे महत्त्व लक्षात येईल. स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे इंटरनेटवरून गाण्यांचे डाऊ नलोड करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत राहील असे दिसते. त्यामुळे डिजिटल व्यवसायाचे प्रमाण वाढत राहणार आहे.