प्रेमकथा म्हटलं की सहसा कुणाच्याही डोळ्यांसमोर िहदी सिनेमांच्या ग्लॅमरस कहाण्या येतात. कुणाचा तरी विरोध आणि मग त्यातून तरून जाऊन एकत्र येणं म्हणजे प्रेम असं तद्दन फिल्मी प्रेम आपल्याला सहसा माहित असतं. पण खरं तर प्रेम सुरू होतं, सहजीवन सुरू झाल्यानंतर. रोजच्या जगण्यातल्या एकमेकांच्या न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या अनेक गोष्टी, जगण्यातल्या अनेक कटकटी, संसारात आलेली वादळं या सगळ्यांना एकमेकांच्या साथीने तोंड देणं, एकमेकांसाठी पहाडासारखं उभं राहणं यातच प्रेमाची खरी कसोटी लागत असते. तिथे कोणतेही फिल्मी योगायोग घडत नसतात. एकमेकांवरचा विश्वास, आपल्या माणसाबद्दल वाटणारी ओढ, उद्या चांगलंच घडणार आहे, याबद्दलची आश्वस्तता या सगळ्यांनी रोजचा अवकाश भरून काढत प्रेम समृद्ध होत जातं. पहाडासारख्या संकटासमोर पहाडासारख्याच मनाने ठाम उभं राहून त्याला तोंड कसं द्यायचं असतं, ते शून्यातून सूर्याकडे या पुस्तकातून वाचायला मिळतं. डॉ. आरती दातार यांचं हे आत्मचरित्र आहे.

डॉ. आरती आणि अरुण दातार हे दोघंही आता सत्तरीच्या घरात आहेत. पण लग्नानंतर लगेचच म्हणजे तिशीच्या उंबरठय़ावर असताना अरुण दातारांना एसटीची बस पायावरून गेल्यामुळे झालेला जीवघेणा अपघात, महिनोन् महिने हॉस्पिटल, सतत वेगवेगळी ऑपरेशन्स, उपचार, या काळात आलेले लोकांचे वेगवेगळे अनुभव, त्या काळात आणि त्यानंतरही एकमेकांना दिलेली साथसोबत या सगळ्याबद्दल डॉ. आरती दातार यांनी लिहिलेले आहे. सकारात्मक विचारांनी परिस्थितीवर, संकटावर कशी मात करता येते, याचा जिवंत अनुभव पुस्तक वाचताना येतो. आज वैद्यकशास्त्र अतिशय विकसित झालेलं आहे. पण सत्तरच्या दशकात अत्यंत भयंकर अशा अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला शारीरिक आणि मानसिक पातळीवर तोंड देणं अपघातग्रस्त व्यक्तीला आणि तिच्या जवळच्या माणसाला किती उद्ध्वस्त करणारं होतं, हे उपचारांचे तपशील वाचताना समजतं. तेव्हाच्या त्या अपघाताचं स्वरूप पाहता आज स्वत:चं जिम चालवणारे डॉ. अरुण दातार हा चमत्कारच वाटतो. चाळीसेक वर्षांनंतरच्या या घटना अतिशय तपशीलवार तरीही अतिशय संयमितपणे सांगितलेल्या आहेत. पतीपत्नींमधील प्रेमाचं एक अनोखं रूप या पुस्तकातून वाचायला मिळतं.
शून्यातून सूर्याकडे, डॉ. आरती दातार, विहंग प्रकाशन, पृष्ठे- १७६, मूल्य-१५० रुपये
वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com

Premachi Goshta Fame Mrunali Shirke appear in hindi serial ghum hai kisikey pyaar meiin
‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीची लोकप्रिय हिंदी मालिकेत वर्णी, पाहायला मिळणार ‘या’ भूमिकेत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SWARDA THIGALE
‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्तानं खऱ्या आयुष्यात साजरी केली पहिली मकर संक्रांत; फोटो शेअर करीत म्हणाली, “सिद्धार्थ माझ्यासाठी…”
Artists from the upcoming film Ek Radha Ek Meera visit the LokSatta office
स्लोव्हेनियात चित्रीत झालेला प्रेमपट ; ‘एक राधा एक मीरा’ या आगामी चित्रपटातील कलावंतांची ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट
we want old Mukta says netizens on premachi goshta maha episode promo
“आम्हाला जुनी मुक्ता पाहिजे”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तेजश्री प्रधान असती तर…”
News About Marathi Drama
मायबाप रसिक ‘गोष्ट संयुक्त मानापनाची’ नाटकाच्या प्रेमात, दिग्दर्शकाला एक तोळा सोन्याची भेट
Premachi Goshta
Video: आदित्यला मिळवलं मात्र सईला गमावलं? सावनीच्या कारस्थानापुढे मुक्ताचं ममत्व जिंकणार…; पाहा प्रोमो
Marathi actress tejashri Pradhan talk about her love
तेजश्री प्रधानसाठी सध्या प्रेम म्हणजे आहे ‘ही’ गोष्ट, मालिकेशी आहे कनेक्शन, म्हणाली…
Story img Loader