१. एका चौरसाचे क्षेत्रफळ ३६०० चौरस मीटर आहे. त्या चौरसाचे समान क्षेत्रफळाचे चार चौकोन तयार केले. तर त्या प्रत्येक चौकोनाची प्रत्येक बाजू किती मीटर लांबीची असेल?
२. एक गाडी २५ किलोमीटर प्रती तास या वेगाने १२ मिनिटे चालली. नंतर वाहतूक मोकळी झाल्यामुळे चालकाने ताशी ६० किमी वेगाने ९० मिनिटे गाडी चालवली. तर त्याने कापलेले एकूण अंतर व त्याचा सरासरी वेग किती?
३. एका शाळेत ४० मुले आहेत. त्यापैकी काही मुले गणित प्रावीण्य स्पर्धेत उत्तीर्ण झाली. काही मुले इंग्रजी प्रावीण्य स्पर्धेत तर काही चित्रकलेच्या प्रावीण्य स्पर्धेत उत्तीर्ण झाली. एकाही विद्यार्थ्यांने दोन परीक्षा दिलेल्या नाहीत आणि उर्वरित २५ टक्के मुले जर संस्कृत प्रावीण्य परीक्षेत उत्तीर्ण झाली असतील तर संस्कृतमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या मुलांची संख्या किती?
४. राजसने विक्रेता व्हायचे ठरविले. त्यासाठी त्याने बाजारातून ३० पेनं आणली. प्रत्येक पेनाचे मूल्य ८ रुपये असून त्याला २५ पेनांवर पाच पेनं मोफत मिळाली. जर त्याला एकूण विक्रीद्वारे ७० रुपये नफा अपेक्षित असेल तर त्याने एका पेनाचे विक्रीमूल्य काय ठेवावे?
५. राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाची सरासरी २:३ आहे. आणखी पाच वर्षांनी तीच सरासरी ५:७ होणार असेल तर त्यांची आजची वये किती?

उत्तरे :
१. ते चौकोन म्हणजे प्रत्येकी ९०० चौरस मीटर क्षेत्रफळाचे चौरस असून त्यांची प्रत्येक बाजू ३० मीटर असेल.
२. एकूण अंतर ९५ किलोमीटर,
सरासरी वेग ५५.८८ किलोमीटर प्रति तास
३. प्रत्येक मुलाने एकच परीक्षा दिली असून ४० पैकी
२५ टक्के मुले संस्कृत प्रावीण्य उत्तीर्ण झाली म्हणजेच १० मुले ही परीक्षा उत्तीर्ण झाली.
४. एका पेनाचे विक्रीमूल्य ९ रुपये ठेवावे लागेल.
५. राम २० वर्षे आणि श्याम ३० वर्षे.

Story img Loader