१. दोन क्रमागत विषम संख्यांची बेरीज १३६ असेल तर त्यांच्यातील फरक किती?
२. राहुलने २५ पेन्सच्या छापील किंमतीत ४० पेन्सची खरेदी केली. जर त्याने ही सर्व पेन्स त्यांच्या मूळ किमतीपेक्षा दोन रुपये अधिक किमतीने विकली असतील आणि त्याला २०० रुपये नफा झाला असेल, तर त्याच्या प्रत्येक पेनची खरेदी किंमत किती?
३. अ ही व्यक्ती एक काम ८ तासात करू शकते. तेवढेच काम करण्यासाठी ब या व्यक्तीला १२ तास लागतात. तर दोघे मिळून तेच काम किती वेळात करू शकतील?
४. राजेश आणि विवेक यांनी एका कामास सुरुवात केली. दोघांनाही ते काम पूर्ण करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार होता. मात्र प्रत्यक्षात दोन दिवसांनी विवेक ते काम सोडून गेला. त्यानंतर दोन दिवसांनी राजेशने ते काम पूर्ण केले. तर विवेक एकटा ते काम किती दिवसांत करू शकला असता?
गणितांची स्पष्टीकरणे :
१. कोणत्याही दोन क्रमागत सम अथवा विषय संख्यांमधील फरक दोनच असतो.
२. ८ रुपये; प्रत्येक पेनाची खेरदी किंमत क्ष मानू. राहुलने २५ पेनांच्या किमतीत ४० पेनं खरेदी केली. म्हणजेच २५क्ष किंमतीत ४० पेनं खरेदी केली. अटीनुसार राहुलने निर्धारीत केलेली विक्री किंमत (क्ष+२) आणि एकूण विक्री झाली ४० पेनांची. म्हणजेच ४०(क्ष+२). तेव्हा झालेला नफा २०० रुपये. म्हणजेच २५क्ष +२०० = ४०(क्ष+२). म्हणजेच क्ष बरोबर ८.
३. चार तास ४८ मिनिटे; अ व्यक्तीने एका तासात केलेले काम, १/८. ब व्यक्तीने एका तासात केलेले काम १/१२. या दोघांनी एकत्र काम केल्यास म्हणजेच या दोघांची बेरीज करावी. उत्तर चार तास ४८ मिनिटे येईल.
सहा दिवस; दोघे मिळून एक काम तीन दिवसांत करणार होते आणि दोघांच्या कामाच्या गतीत भिन्नता असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे एका व्यक्तीला ते काम पूर्ण करण्यास लागणारा कालावधी सहा दिवस.