१. गणांचा नेता तो गणपती असे आपण म्हणतो. ऋग्वेदातही गणाधीश या नावाचा उल्लेख आला आहे. हा उल्लेख किती वेळा आला आहे?
२. गुरुचरित्राच्या पोथीमध्ये बालगणेशाचे वर्णन आले असून, त्या वर्णनात रामायणातील एका पात्राचा संबंध वर्णन केला आहे. ते पात्र कोणते?
३. महाराष्ट्रामध्ये दशभुजा गणपती कुठे आहे?
४. उद्यान गणेश या नावाचे दोन प्रसिद्ध गणपती आहेत. एक पुणे येथील सारस बागेत असलेला (जो तळ्यातला गणपती म्हणूनही ओळखला जातो) तर दुसरा गणपती कुठे आहे?
५. गणपतीचा भाऊ कार्तिकेय हा कोणकोणत्या नावांनी ओळखला जातो?

उत्तरे :
१. ऋग्वेदातही गणाधीश या नावाचा उल्लेख दोन वेळा आला आहे; २. रावण;
३. महाराष्ट्रामध्ये दशभुजा गणपती हेदवी, रत्नागिरी येथे आहे; ४. शिवाजी पार्क, मुंबई;
५. गणपतीचा भाऊ कार्तिकेय हा स्कंद, मुरुगन, सुब्रमण्य या नावांनी ओळखला जातो.

Story img Loader