१. ३, ४, १२, ४८, ५७६,?

२. अमोलने ३६,००० रुपये किमतीची मोटरसायकल ४ टक्के सूट घेत विकत घेतली तर त्याला ती मोटरसायकल किती रुपयांना पडली?
३. एक विमान ताशी ३६० किमी वेगाने उडत जाते. हवेचा कोणताही विरोध नसताना त्या विमानास ९०० किलोमीटर अंतर कापण्यास लागणारा वेळ किती?
४. केतनचे आजचे वय हे संतोषच्या आजच्या वयाच्या निम्मे आहे. या दोघांच्या वयाची बेरीज ३६ वर्षे आहे. तर अजून सहा वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल?
५. (१,३,५,७), (३,५,७,१), (५,७,१,३), (?)

उत्तरे स्पष्टीकरणासहित

१. उत्तर – २७,६४८; स्पष्टीकरण – या संख्यामालिकेत पहिल्या दोन संख्यांचा गुणाकार ही तिसरी संख्या आहे, त्यापुढे दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार ही चौथी संख्या आहे, तिसऱ्या आणि चौथ्या संख्येचा गुणाकारा ही पाचवी संख्या आहे. त्यामुळे ४८ आणि ५७६ या दोन संख्यांचा गुणाकार ही प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या असेल.
२. उत्तर – ३४,५६०; स्पष्टीकरण – ३६ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकलीवर चार टक्के सूट म्हणजेच एकूण सूट होते – ३६,०००*४/१०० म्हणजेच एकूण १४४० रुपये. ३६ हजारांमधून १४४० रुपये वजा केले असता ३४,५६० हे उत्तर येईल.
३. उत्तर – अडीच तास; स्पष्टीकरण – प्रती तास ३६० किलोमीटर या वेगाने ९०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ – ९००/३६० म्हणजेच २.५. आता मूळ वेळ किलोमीटर प्रती तास या एककात असल्यामुळे आलेले उत्तरही तासांचे निर्देशक असेल. म्हणून उत्तर अडीच तास.
४. उत्तर – ३: ५; स्पष्टीकरण – केतनचे वय क्ष मानू म्हणजेच संतोषचे वय २ क्ष. या दोघांच्या वयाची बेरीज ३६ वर्षे म्हणजेच ३क्ष= ३६ म्हणजेच क्षची किंमत आहे १२ वर्षे. थोडक्यात केतनचे वय १२ वर्षे आणि संतोषचे वय २४ वर्षे. अजून सहा वर्षांनी केतनचे वय १८ वर्षे आणि संतोषचे वय ३० वर्षे. १८ आणि ३० यांचे गुणोत्तर म्हणजेच, १८/३०. म्हणजेच ३/५. (दोन्ही संख्यांना सहा या संख्येने भाग जातो, त्यामुळे हे लघुरूप आहे.)
५. उत्तर – ७,१,३,५; स्पष्टीकरण – या संख्यामालेत पहिला अंक शेवटच्या स्थानी जातो आणि उरलेले सर्व अंक एकेक घर मागे सरकतात. त्यानुसार, पहिल्यांदा १ हा अंक शेवटी गेला, त्यानंतर, ३ हा अंक शेवटी गेला, पुढे ५ हा अंक शेवटी जाईल. म्हणून क्रम उपरोक्त पद्धतीने असेल.

Story img Loader