१. ४० कामगार ८ दिवसांत २००० रुपये कमावतात. तर दोन दिवसांत किती कामगारांची एकूण मिळकत २०० रुपये असेल?

२. दररोज ८ तास काम करणारी ६ माणसे आठवडय़ाला १६,८०० रुपये कमावतात, तर दररोज सहा तास काम करणारी ९ माणसे आठवडय़ाला किती कमावतील?

३. एका निरीक्षणात पाच कोळी पाच मिनिटांत पाच माश्या पकडतात असे दिसून आले. कोळ्यांची ही सरासरी गती धरल्यास १०० कोळी १०० मिनिटांत किती माश्या पकडतील?

४. एक ट्रेन ताशी ९० किलोमीटर वेगाने प्रवास करीत असेल तर तिचा मीटर प्रतिसेकंद वेग किती?

५. एक बोट प्रवाहाच्या दिशेने १५.५ किलोमीटर प्रतितास या वेगाने गेली आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ८.५ किलोमीटर प्रतितास या वेगाने आली, तर प्रवाहाचा वेग किती?

गणितांची स्पष्टीकरणे :
१. १६ कामगार. स्पष्टीकरण – एक कामगार एका दिवसात सव्वा सहा रुपये कमावतो. या हिशेबाने दोन दिवसाची एका कामगाराची मिळकत १२.५० रुपये. अशा १६ कामगारांची मिळकत २०० रुपये.
२. १८९०० रुपये. स्पष्टीकरण – दररोज आठ तास, सहा माणसे म्हणजेच एकूण ४८ तासांचे काम. मिळकत १६८०० रुपये. तर, प्रतितास मिळकत ३५० रुपये. सहा तास आणि नऊ माणसे म्हणजे कामाचे तास ५४ तास. ५४ गुणिले ३५० म्हणजेच १८९०० रुपये.
३. २००० माश्या. स्पष्टीकरण – पाच कोळी पाच मिनिटांत पाच माशा, म्हणजेच एक कोळी पाच मिनिटांत एक माशी पकडतो. म्हणजेच एक कोळी १०० मिनिटांत २० माशा पकडतो. याचा अर्थ असे शंभर कोळी १०० मिनिटांत २० गुणिले १०० म्हणजेच २००० माश्या पकडतात.
४. २५ मीटर प्रतिसेकंद. स्पष्टीकरण – ताशी ९० किलोमीटर म्हणजेच ३६०० सेकदांमध्ये ९०००० मीटर. म्हणजेच २५ मीटर प्रतिसेकंद.
५. ३.५ किलोमीटर प्रती तास. स्पष्टीकरण – प्रवाहाच्या दिशेने जातानाचा वेग व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातानाचा वेग यांतील फरक सात किलोमीटर आणि एकूण वेळ दोन तास. म्हणजेच प्रवाहाचा वेग साडेतीन किलोमीटर प्रती तास.

Story img Loader