वीरेश वाणी
वीरेश मूळचे श्रीवर्धन गावचे. ते म्हणतात.. ‘‘आमच्या शाळेत दरवर्षी रांगोळीच्या स्पर्धा व्हायच्या. प्रत्येक स्पर्धेत मी भाग घ्यायचो. तेव्हा मी फक्त निसर्गचित्राच्या, ठिपक्यांच्या आणि कार्टूनच्या रांगोळ्या काढायचो. सगळ्यांच्या प्रशंसेतून आपण जरा चांगल्या रांगोळ्या काढतो हे कळलं. मग मुंबईमधल्या रांगोळी स्पर्धामध्ये भाग घेऊ लागलो. प्रत्येक स्पर्धेमधून मिळालेल्या बक्षिसाने मला माझी आवड जपण्यासाठी प्रेरित केलं. त्यातही राजकीय नेते नवाब मलिक यांची पाठीवरची थाप मी कधीही विसरू शकणार नाही.’’ व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीमध्ये तज्ज्ञ असलेले वीरेश वाणी गुरूंबद्दल विचारल्यावर म्हणाले, ‘‘मी मुळात गावात राहात असल्यामुळे आम्हाला
गणेश सालियन
गणेश सालियन हे नायगाव-वसईमधल्या जितेंद्र गावचे रहिवासी. ते सांगतात, जितेंद्र हे गाव कलाकारांनी समृद्ध असं गाव. त्या गावात राहून आपणही काही तरी शिकावं म्हणून चित्रकला शिकायची असं ठरवलं. गावात होणारी रांगोळी प्रदर्शने बघून चित्रकलेच्या जोडीने रांगोळीही शिकावी अशी इच्छा निर्माण झाली. रांगोळी स्पर्धामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. ७ वीमध्ये असल्यापासून रांगोळी काढायला सुरुवात केली. आज १०-१२ वर्षे झाली. छंदाची आवड आणि आवडीचं प्रोफेशन कधी झालं कळलंच नाही. रांगोळी येण्यासाठी चित्रकला महत्त्वाची आहे का, या प्रश्नावर ते म्हणतात, ‘‘रंगसंगतीचं ज्ञान महत्त्वाचं आहे. खरं तर चित्रकला
भारत प्रधान
भारत प्रधान त्यांच्या रांगोळीच्या आवडीबद्दल म्हणतात, ‘‘गणेश आणि मी एकत्रच चित्रकलेच्या आणि रांगोळीच्या आवडीनिशी वाढलो. स्वत:च स्वत:ला शिकवत एकमेकांनाही घडवत गेलो. सगळ्या स्पर्धाना एकत्रच गेलो आणि एकत्रच जिंकून आलो. आज सगळेच आम्हाला ‘गणेश-भारत’ या नावाने ओळखतात. आमची प्रत्येकाची आडनावंसुद्धा माहीत नाहीत. आमच्या गप्पांचा विषयही रांगोळीच असतो.’’ त्यांच्याही बक्षीस मिळालेल्या बऱ्याच आठवणींपैकी त्यांनी एक सांगितली ती म्हणजे दरवर्षी त्यांच्या गावात प्रसिद्ध व्यक्तींच्या हस्ते पार पडणाऱ्या पुरस्कार सोहळ्याची. ते म्हणतात.. ‘‘गणेश आणि मी तेव्हा ९ वीमध्ये असू. परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळे कुठल्याही, कशाही कपडय़ांत फिरायचो. असंच फिरताना मला शरद पोंक्षे दिसले आणि तो दिवस १ जानेवारी आहे हे लक्षात आलं.. एकदा माझ्या कपडय़ांकडे पाहिलं आणि घरी
प्रवीण भोईर
ठाणे जिल्ह्यतील जूचंद्र गाव म्हणजे कलाकारांचं ठाणंच. इथं जवळपास प्रत्येक जण कलाकार आहे. त्यांपैकीच एक म्हणजे प्रवीण भोईर. व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी हा त्यांचा हातखंडा विषय. घरची
हल्ली रांगोळी ही फक्त दिवाळीपुरती मर्यादित नसून वर्षभर तिला मागणी असते. या क्षेत्रात येणाऱ्यांकडे सतत ८ ते ९ तास बसण्याची तयारी हवी असं ते सांगतात. एकदा त्यांनी शिर्डीच्या पालखीत चालता चालता साईबाबांची रांगोळी केवळ अडीच तासात पूर्ण केली, असं करणारी त्यांच्या गावातली ती एकमेव व्यक्ती आहे. रांगोळ्यांबरोबरच ते गणपती आणि दुर्गादेवीच्या मूर्तीच्या रंगकामाचं कामदेखील करतात. घरची परिस्थिती हलाखीची असताना घरातल्या लोकांच्या ‘तू दुसऱ्यांच्या ओटीवर जाऊन रांगोळ्या काढतोस’ अशा टोमण्यांना न जुमानता त्यांनी आपल्यातली कला जिवंत ठेवली ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.
संजय पाटील
नायगावला राहणारे जुचंद्र गावचेच संजय पाटील हेसुद्धा एक उत्तम रांगोळी कलाकार. लहानपणी त्यांनी कधी रांगोळी काढण्याचे फारसे मनावर घेतले नव्हते. पण शाळेत विविध स्पर्धा सुरू झाल्या आणि शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना किमान एका स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले. भाग नाही घेतला तर रु. २५ दंड
जयकुमार भोईर
नायगाववासी असलेल्या कलाकारांनी समृद्ध असलेल्या जितेंद्र गावात राहून रांगोळीची प्रदर्शनं बघून रांगोळीची आवड भोईर यांनाही लागली. त्या आवडीतून त्यांनी स्वत:ला अनुभवातून घडवलं. अनुभवांसोबत त्यांनीही व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीचा अभ्यास केला. ते म्हणतात, ‘‘मला लहानपणापासूनच थोडी चित्रकला येत होती, त्यातूनच पुढे मला रांगोळीची आवड लागली. थोडी चित्रकला, थोडी आवड, थोडे अनुभव आणि थोडा अभ्यास यामुळे रांगोळी हेच माझं प्रोफेशन झालं. हळूहळू स्पर्धामध्ये उतरलो त्यातून मिळालेल्या बक्षिसांनी माझी आवड वृद्धिंगत केली.’’ त्यांना आता स्पर्धामध्ये उतरून बक्षिसं मिळवण्यापेक्षा दौरे करून प्रदर्शनात रांगोळी काढणं जास्त आवडतं. जयवंत, गणेश आणि भारत हे तिघंही गुणवंत मांजरेकर यांच्या गटातील कलाकार. व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी काढताना सगळी बॉर्डर काढून घेऊन मग फिलिंग आणि फिनिशिंग असं त्यांनी त्यांचं स्वतंत्र तंत्र विकसित केलं आहे. त्यांच्या या तंत्रांनी आणि आवडीने अनेकांची वाहवा मिळवली. आपण एकातच मास्टर असावं या मताचे ते असल्यामुळे त्यांनी व्यक्तिचित्रणात्मक रांगोळीमध्ये स्वत:ला मास्टर केलं. ‘‘माझी रांगोळी मला आवडण्याबरोबर ती लोकांना आवडली पाहिजे आणि ते माझी रांगोळी बघून खूश झाले पाहिजेत याकडे माझा कटाक्ष आहे.’’ असंही ते म्हणतात. प्रदर्शनामध्ये आपली रांगोळी वेगळी दिसावी याकरिता तुम्ही काय करता किंवा याकरिता तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतं असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘प्रदर्शनामध्ये रांगोळी काढताना जिथे प्रदर्शन आहे त्यांच्याकडून एक विषय दिला जातो. आपल्याला दिलेल्या विषयामध्ये आपण स्वत: काहीतरी रचावं लागतं. ती रांगोळीची रचनाच आपलं वेगळेपण ठरवते. प्रत्येकाची रांगोळी काढण्याची एक वेगळी लकब असते, वेगळं तंत्र असतं.’’ जयकुमार यांना आपल्या कलेवर मनापासून प्रेम करणं आणि त्याची प्रामाणिकपणे सेवा कारणं आणि त्यात परफेक्शन आणणं महत्त्वाचं वाटतं.
विनायक वाघ
संस्कारभारती रांगोळी म्हटलं की एका विशिष्ट रांगोळीचे चित्र डोळ्यांसमोर येते. जवळपास २५ वर्षांपूर्वी संस्कारभारती या कलांना उत्तेजन देणाऱ्या संस्थेतील वासुदेव कामतांसारख्या मातब्बर कलाकारांनी एकत्र येऊन एक विशिष्ट प्रकारची रांगोळी जी सोपी असेल, सहज असेल अशी निर्मिण्याचे योजले आणि त्यातून संस्कारभारती रांगोळीचा जन्म झाला. आज ही रांगोळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तिला पुढच्या पिढय़ांपर्यंत नेण्यासाठी अनेक रांगोळी कलाकार कार्यरत आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे डोंबिवलीचे विनायक वाघ. गेल्या ८ ते ९ वर्षांपासून ते रांगोळी काढत आहेत. १२वीत असल्यापासून त्यांनी रांगोळीवर काम करायला सुरुवात केली आणि आता संस्कारभारती काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी आणि त्यांच्या ३-४ मित्रांनी डोंबिवलीत सर्वप्रथम संस्कारभारतीची रांगोळी काढण्यास सुरुवात केली. आज ते या रांगोळीची अनेक शिबिरं घेतात. ते सांगतात जेव्हा मी रांगोळी शिकायला शिबिरात जायचे ठरविले तेव्हा मुलांनी रांगोळी काढणं फारसं चांगलं समजलं जायचं नाही. पण मी आणि माझ्या मित्रांनी अगदी ठामपणे रांगोळी शिकायचे ठरविले त्या वेळी त्या शिबिरात ७० महिला आणि दोन-चारच मुलं होतो. आता मात्र हे चित्र बरंच बदललंय. आज मुलंही तितक्याच उत्साहात रांगोळ्या शिकायला तयार असतात. संस्कारभारतीची रांगोळी ही वैशिष्टय़पूर्ण रांगोळी असते. या रांगोळीत सुरुवातीला रंग पसरला जातो आणि त्यानंतर पांढऱ्या रांगोळीने त्यावर रांगोळी काढली जाते तसेच काढताना पाचही बोटांचा वापर केला जातो. टीमवर्कचं उत्तम प्रतीकच ही रांगोळी मानली जाते. पूर्वी दोन बोटांनी काढली जाणारी रांगोळी संस्कारभारतीमुळे पाच बोटांनी काढली जाते. वेगवेगळ्या विचारधारांना एकत्र आणून कलाकार ती साकार करायची हेच या रांगोळीतून सूचित होते. त्यातील फार तुरळक वापरल्या जाणाऱ्या सर्परेषा या प्रकाराचे विनायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून २० प्रकार विकसित केले आहेत तसंच पारंपरिक चिन्ह शंख-चक्राचा वापर करून त्यांनी अनेकविध डिझाइन्स बनविल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रातून मणिपूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथे त्यांनी तेथील लोकांना संस्कारभारती रांगोळीची ओळख करून दिली. रांगोळी शिकणाऱ्या नवीन मुलांना ते आवर्जून सांगतात की, रांगोळीसाठी निरीक्षणशक्तीची खूप आवश्यकता असते. विविध रंगसंगती, डिझाइन्स, कल्पकता या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत अन् सर्वात महत्त्वाचे म्हणजे सराव आणि सातत्य. अखिल भारतीय रांगोळी मंडळाचे अध्यक्ष भय्याजी देशपांडे हे आजसुद्धा रात्री झोपण्यापूर्वी किमान २० मिनिटे बिंदू पाडण्याचा सराव करतात. व्यवसायाने सुलेखनकार आणि ग्राफिक डिझायनर असल्याने त्यांना त्यांच्या रांगोळीत या गोष्टींची मदत होते. संगणकाच्या साहाय्याने विविध रंगसंगती, ग्रेडेशन असे प्रकार करता येत असल्याने रांगोळीत नावीन्यता आणता येते.
विवेक प्रभू केळुस्कर
जोगेश्वरीला गेली ३० वर्षे रंगावली परिवारातर्फे रांगोळ्यांचे प्रदर्शन भरविले जाते. या परिवाराचे सर्वात जुने सभासद असलेले विवेक प्रभू केळुस्कर हे स्वत:सुद्धा एक निष्णात रांगोळी कलाकार आहेत. त्यांनी लहानपणापासूनच रांगोळी काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाविद्यालयीन-आंतरमहाविद्यालयीन असे टप्पे पार करत आज ते आणि त्यांचे सहकारी रंगावली परिवारातर्फे रांगोळ्यांचे प्रदर्शन भरवितात. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ ते सांगतात की आम्ही हे प्रदर्शन फक्त रांगोळ्यांसाठी भरवत नाही तर एक उत्तम माणूस घडविण्यासाठी भरवितो. प्रदर्शनासाठी घेतल्या जाणाऱ्या शाळेची साफसफाई स्वच्छता टीममधले सर्व