वर्षअखेरीस प्रकाशित झालेला भविष्य विशेषांक हा खूपच मार्गदर्शक आहे. भविष्य शास्त्र आहे की थोतांड यावर अनेक वाद झाले आहेत आणि होत राहतील, पण त्याचा उपयोग मार्गदर्शक म्हणून करण्यास काहीच
-अनिल पाटील, औरंगाबाद.
गेमचेदेखील व्यसन लागू शकते…
कॅण्डी क्रश का खेळतात.. व्यसन. आपल्या समाजात व्यसन म्हटलं की ते पान, सिगारेट, तंबाखू, दारू याच गोष्टी समोर येतात. अॅडिक्ट म्हटलं की तो ड्रग अॅडिक्टच असतो अशी आपली समजूत आहे. पण गेमचंदेखील व्यसन असू शकतं आणि त्याच्या पुरता आहारी जाणे हे इतर व्यसनांइतकेच घातकी असते हे आपल्याला अजून कळले नाही. इतर व्यसनांची सुरुवात जशी चव तर घेऊन पाहू या पद्धतीने होते, तसेच
अंकिता माळी, नांदेड.
देखणा आणि समर्पक विवाह विशेषांक
‘लग्नसराई’ विशेष हा अंक अतिशय देखणा आणि वर्तमान लग्नसोहळ्यांचे योग्य वर्णन करणारा आहे. सध्या सामान्य जीवन फक्त फिल्मी नाही तर टीव्ही सीरियलमयही झाले आहे, त्यामुळे स्वत:चे लग्नही तसेच
‘समृद्ध मुंबईसाठी..!’ हा मथितार्थ वर्तमान मुंबई शहराच्या समस्या आणि त्यावरील उपयांचे विशेषत: मुंबईच्या विकासासाठी स्वतंत्र उच्चाधिकार समितीची गरज विशद करणारे आहे. गेल्या दोन दशकात मुंबईच्या बकालपणात प्रचंड भर पडली आहे पण राज्य सरकार आणि मनपा या दोघांनीही त्याकडे साफ दुर्लक्ष केले. संपूर्ण मुंबई ही बिल्डरमाफियाला दत्तक दिल्यागत राज्यकर्त्यांचा आविर्भाव होता/आहे. आज राज्यात सत्ताबदल झाला आहे तेव्हा आता तरी मुंबई आणि मुंबईकर दोघांनाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी स्वतंत्र उच्चाधिकार समिती ज्यात केंद्राचा सहभाग असेल, जर उपयुक्त ठरणार असेल तर ती गठित करावी आणि मध्यम वर्गाची मुंबई मध्यम वर्गाला परत गवसावी.
– माया हेमंत भाटकर,
चारकोप गाव, मुंबई, ई-मेलवरून
आपण सारेच विभूतिपूजक
हृषीकेश जोशी यांचा ‘देव आणि माणूस’ हा लेख आवडला. लेखकाने बरोबर वर्मावर बोट ठेवले आहे. आजकाल सगळीकडे केवळ अभिनिवेश दिसून येतो. अगदी नव्या पिढीचं माध्यम असणाऱ्या सोशल मिडियावर तर अशा अभिनिवेशी पोस्टनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते. शिवाजी महाराज, संभाजी महाराज अथवा अन्य
नव्या सदरांची उत्सुकता आणि जुने संपल्याची हुरहुर
डिसेंबर महिन्यातील शेवटच्या अंकात अनेक सदरांखाली समाप्त लिहिलेले वाचले आणि आपसूकच नव्या सदरांची उत्सुकता आणि जुने संपल्याची हुरहुर लागून राहिली. मागील वर्षांत डॉ. उज्ज्वला दळवी, हृषीकेश जोशी, डॉ. लता काटदरे, वैद्य खडीवाले अशांनी आम्हाला भरपूर वैचारिक खाद्य पुरवले. काशीनाथ जोशी आणि प्रशांत दांडेकर इंग्रजी मराठी भाषेचे विभ्रम मांडले. फॅशन, तरुणाई, भटकंती सर्वच विषयांवर वेगळा विचार देणारे लेखन वाचायला मिळाले. त्यामुळेच ते संपणार याची हुरहुर लागली, पण लोकप्रभा त्यांच्या परंपरेनुसार येणाऱ्या वर्षांत आणखीन दर्जेदार लेखन देणार याची खात्री असल्यामुळे नव्यांची उत्सुकतादेखील लागली आहे.
सुचित्रा भोसले, सोलापूर.
फेडररची ‘फोटीशॉपी दुनिया’ आवडली
‘लोकप्रभा’च्या २६ डिसेंबरच्या अंकात प्रकाशित झालेली फेडररची ‘फोटोशॉपी दुनिया’ आवडली. स्वत:चे मार्केटिंग कसे नेमके आणि क्रिएटीव्ह पद्धतीने करावे याचे हे उत्तम उदाहरण. महत्त्वाचे म्हणजे हे सारे करताना त्याने सामान्य चाहत्यांचा सहभाग आपसूकच मिळवला. आपल्याकडील सेलिब्रिटी केवळ जमा झालेल्या गर्दीच्या हुल्लडबाजीवर टिमकी वाजवताना दिसतात. त्या तुलनेने हे काहीतरी वेगळे होते.
अजित कांबळे, अहमदनगर.
अंधश्रद्धेला चालना देणारा अंक
‘लोकप्रभा’ अनेक नावीन्यपूर्ण विषयांवर विशेषांक काढत असते. अर्थातच त्यातून इतर माध्यमांतून मिळणाऱ्या माहितीव्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळतात. असे असताना केवळ सवंग लोकप्रियता आणि खप डोळ्यासमोर ठेवून अंधश्रद्धेला चालना देणारा भविष्य विशेषांक प्रकाशित करावा हे योग्य नाही. आपल्या परंपरेत हे बसत नाही. कृपया पुनरावृत्ती टाळणे योग्य ठरेल.
– सुरेश पाटील, सांगली.
सामाजिक विषयांचादेखील विचार व्हावा..
‘लोकप्रभा’ नियमित आवडीने वाचतो. दत्तात्रेय विशेषांक आवडला. आपण सर्वच विषय कुशलतेने हाताळता. अशाच प्रकारे काही सामाजिक विषयांवरदेखील प्रकाश टाकावा अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने नदी जोडणी प्रकल्प, भारत-चीन संबधांचे अनेकविध पदर, भारताची परराष्ट्र नीती, क्रीडा क्षेत्रात ग्रामीण भागाचे योगदान अशा विषयांवरील लिखाण वाचायला आवडेल.
– मनोज ह. खरे, घाटकोपर (पूर्व), मुंबई .