‘जातपंचायतीचा फास- ठेवतोय महाराष्ट्राला मागास’ या कव्हर स्टोरीअंतर्गत असलेले दोन्ही लेख मती गुंग करणारे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात, तेही महाराष्ट्रात जातपंचायत इतकी प्रबळ असावी हे दुर्दैवी आहे. मुळात आपल्या घटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सार्वभौमत्व सर्वाना दिले असले तरी प्रत्यक्षात ५० टक्क्यांहून अधिक जनतेला स्वातंत्र्य म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यामुळे देश स्वतंत्र आहे वा नाही याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, कारण गरिबी, अज्ञान आणि बेरोजगारी हे सर्व हातात हात घालून चालत असल्याने स्वत:च्या जातीसमुदायाशी एकनिष्ठ असणे ही त्यांची मानसिक गरज बनते आणि त्याचा गैरफायदा पंच घेतात. वस्तुत: गावोगावी ग्रामपंचायत असावी जसे ठरविले गेले ते असेच लहान समुदायाच्या अडचणी तिथल्या तिथे सोडविल्या जाव्यात म्हणूनच पण समाजावरील जातीचा पगडा इतका घट्ट आहे, की सरपंचाला वाळीत टाकण्याचा निर्णय जातपंचायत द्यायचे धाडस करते हे अविश्वसनीय आहे. पण आपले समस्त राजकारणच आजही जातिधर्माच्या बेरजा-वजाबाक्यांवर आधारित असेल तर जातपंचायतींच्या उचापत्या कोण पुढाकार घेऊन बंद करणार? जोपर्यंत शिक्षणाची दारे सर्वासाठी उघडत नाहीत आणि बेरोजगारी संपत नाही तोपर्यंत या प्रकारांना आळा घालणे कठीण आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तापालट झालेला आहे तेव्हा या विषयातही ‘अच्छे दिन’ यावेत, हीच जनेच्छा!
वाचक प्रतिसाद : जातपंचायतीच्या उचापत्या कोण बंद करणार?
‘जातपंचायतीचा फास- ठेवतोय महाराष्ट्राला मागास’ या कव्हर स्टोरीअंतर्गत असलेले दोन्ही लेख मती गुंग करणारे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे झाली तरी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून...
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-12-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response