द प्लेजर ऑफ रीडिंग या अँटोनिया फ्रेजर यांनी संपादित केलेल्या पुस्तकात जगभरातल्या चाळीस लेखकांनी आपल्या वाचनानंदावर लिखाण केलंय. या चाळीस लेखांसाठी चाळीस चित्रकारांनी चित्रंही काढली आहेत.
मातृभाषा ही निसर्गत: आणि जन्मत: मानवप्राण्याला मिळते. त्यामुळे ती बोलायला शिकण्यासाठी फारसे काही प्रयत्न करावे लागत नाहीत. लहान मूल इतरांचे शब्द ऐकत ऐकत बोलायला शिकतं. पण भाषा लिहायला मात्र रीतसर शिकावी लागते. त्यासाठी अक्षरांची ओळख करून घ्यावी लागते. आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तर आणखी रीतसर प्रयत्न करावे लागतात. असंच वाचनाचं असतं. भाषा बोलायला-लिहायला यायला लागली की वाचताही येतं. त्यामुळे वाचन ही गोष्टही आपल्याला निसर्गत: मिळालेली गोष्ट असावी असा अनेकांचा समज होतो. पण लिखित भाषेवर चांगलं प्रभुत्व मिळवण्यासाठी जसं मार्गदर्शन, अभ्यास, शिस्त आणि काटेकोर नियोजन करावं लागतं, तसंच वाचनाच्या बाबतीतही करावं लागतं. त्याशिवाय चांगला वाचक होता येत नाही. पण अर्थार्जनासाठी रीतसर शिक्षण घ्यावं लागतं, तसंच वाचक म्हणून प्रगल्भावस्था गाठण्यासाठीही रीतसर मार्गदर्शन घेण्याची गरज असते, हे अनेकांच्या गावीही नसतं. त्यामुळे बहुतेक जण आयुष्यभर मिळेल ते वाचत राहतात. काय वाचावं हेच अनेकांना आयुष्यभर कळत नाही. त्यासाठी कुणा चांगल्या मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा असंही त्यांना वाटत नाही. परिणामी ही माणसं कायम कविता-कथा-कादंबऱ्याच वाचत राहतात. वय आणि वाचन यांची सांगड तर अनेकांना घालता येत नाही.
वाचनाच्या बाबतीत प्रगल्भावस्था गाठावयाची असेल तर मार्गदर्शन, शिस्त आणि काटेकोर नियोजन गरजेचं असतं. तरच त्या वाचनाचा फायदा होतो. बालपण, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढपण आणि वृद्धावस्था हे
त्यामुळे चांगलं वाचन करण्यासाठी चांगल्या मार्गदर्शकाची गरज असते. असे मार्गदर्शक आई-बाबा, शिक्षक, मित्र हे जसे असू शकतात, तसेच चांगल्या लेखकांनी आपल्या वाचनाविषयी लिहिलेले लेख वा पुस्तकंही असू शकतात. मराठीमध्ये ज्याला ‘बुक ऑन बुक्स’ म्हणतात अशा प्रकारची पुस्तकं फारशी नसली तरी इंग्रजीमध्ये मात्र अशा प्रकारच्या पुस्तकांचं समृद्ध असं दालन आहे. ‘द प्लेजर ऑफ रीडिंग’ (एडिटेड बाय अँटोनिया फ्रेझर, ब्लूम्सबरी, लंडन, पाने : २५२, किंमत : १७.९९ पौंड.) हे पुस्तक त्यापैकीच एक. रॉयल आकाराचं आर्टपेपरवर छापलेलं आणि संपूर्ण रंगीत असलेलं हे पुस्तक फारच सुंदर आहे.
हे पुस्तक संपादित केलं आहे अँटोनिया फ्रेझर यांनी. ऐतिहासिक चरित्रकार, रहस्यकथा लेखक आणि लंडनमधील पेन या संस्थेच्या माजी अध्यक्ष असलेल्या फ्रेझर यांना नामवंत साहित्यिक-कलांवत कुठली पुस्तकं वाचतात याविषयी अतोनात कुतूहल आहे. म्हणून त्यांनी या पुस्तकासाठी इंग्रजीमध्ये लिहिणाऱ्या जगभरातल्या ४० नामवंत साहित्यिकांना त्यांच्या वाचनाविषयी लिहायला सांगितलं. त्यानुसार स्टिफन स्पेंडर, मायकेल फूट, डोरिस लेसिंग, जॉन मार्टिमर, रुथ रेंडेल, सायमन ग्रे, मार्गारेट अॅटवुड, मेल्विन ग्रेग, गीतचा मेहता, वेंडी कोप यांसारख्या लेखकांनी सुरुवातीला केलेलं वाचन, आपल्या वाचनावर झालेला घरचा – आजूबाजूच्या वातावरणाचा, सहवासातल्या लोकांचा-शिक्षकांचा परिणाम, मनावर परिणाम करून गेलेली पुस्तकं, प्रभावित केलेली पुस्तकं याविषयी समरसून लिहिलं आहे. शिवाय प्रत्येकानं लेखाच्या शेवटी ‘माझी
मायकेल फूट या ब्रिटिश पत्रकार आणि मार्क्सवादी खासदाराचे वडील उत्तम वाचक होते, त्यामुळे घरात भरपूर पुस्तकं होती. तरीही तो वाचनाकडे जरा उशिराच वळला. बट्र्राड रसेल त्याला शिकवायला होते. त्यामुळे रसेलचे ‘द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस’ हे फूटचे आवडते पुस्तक. याशिवाय अनरेल्ड बेनेटच्या ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’ आणि ‘लिटररी टेस्ट -हाऊ टू फॉर्म इट’ या दोन छोटय़ा पुस्तकांविषयी लिहिलं आहे. ‘हाऊ टू लिव्ह ऑन २४ अवर अ डे’ या पुस्तकानं माझं आयुष्य बदलवलं असं फूटनं म्हटलंय. फूट लंडनचा पंतप्रधान होता होता राहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा