साहित्य : टोमॅटो पाव किलो, लसूण १०/१२ पाकळय़ा, आलं १ तुकडा, विनेगर २/३ छोटे चमचे, मीठ चवीनुसार, हिरव्या मिरच्या ७/८, जिरं १ चमचा, मोहरी १/२ चमचा, तेल थोडं, लाल तिखट १ चमचा, हळद-थोडी.
कृती : टोमॅटो धुऊन पुसून बारीक फोडी करा. (मग ४/५ लसून पाकळय़ा, १/२ इंच आलं, २/३ हिरवी मिरची, १/२ चमचा जिरे सर्व जाडसर कुटून घेणे.) बाकी उरलेले लसूण, आलं, हिरव्या मिरचीचे छोटे तुकडे करणे (लसूण, पाकळी मोठी असेल तर २ तुकडे, नाही तर पूर्ण लसून ठेवणे.)
कढईत तेल गरम झाले की जिरे, मोहरी घालणे. त्यात कुटलेला मसाला घालणे, थोडे परतणे लगेच टोमॅटोच्या फोडी घालणे. थोडी हळद, तिखट, विनेगर व लसूण आलं, मिरचीचे तुकडे घालणे, मीठ घालणे व चांगले शिजले की बाऊलमध्ये काढून ठेवणे. ही चटणी पराठा व ब्रेडबरोबर खूपच रुचकर लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मटार पराठा
साहित्य : मटार १/२ कि.ग्रॅ. सोललेले, हिरवी मिरची २, कांदा १ (बारीक चिरलेला), लसूण ७/८ पाकळय़ा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, कणीक २/३ वाटी (रोज पोळय़ांना भिजवतो तशी भिजवणे), लाल तिखट अर्धा चमचा, बेसन ४/५ चमचा, कोथिंबीर (बारीक चिरलेली), तेल.
कृती : मटार सालून थोडय़ा पाण्यात मीठ घालून उकडून घेणे (५ मिनिटे.) मटार पाण्यातून काढून कोरडे करावे. नंतर मटारमध्ये २ मिरची घालून पेस्ट करणे (पाणी घालू नये.)
नंतर कढईत ४/५ चमचे तेल घालून हिंग, मोहरी, जिरे घालून फोडणी करावी, कांदा परतावा, हळद व मिक्स केलेले मटारचे सारण परतावे. लाल तिखट, मीठ, बेसन घालून एक वाफ आणावी. मग कोथिंबीर घालून एकदा परतावे. सारण गार झाले की कणकेच्या गोळय़ात घालून भरावे व पराठे लाटावे. (हे पराठे वरील दिलेल्या टोमॅटोच्या चटणीसोबत खूपच रुचकर लागतात.)

आलू टिक्की
साहित्य : ४/५ मध्यम आकाराचे बटाटे, १/२ चमचा लाल तिखट,
१ चमचा सेजवान चटणी, १/२ शिमला मिरचीचे बारीक तुकडे, कोथिंबीर बारीक चिरलेली, ४/५ बेड सलाइसचा चुरा, मीठ-चवीनुसार, तेल.
कृती : बटाटे उकडून स्मॅश करा व त्यात हे सर्व साहित्य घालून मिक्स करणे. मग छोटे छोटे गोळे करून चपटे आकार द्या. त्यावर तेल घालून श्ॉलोफ्राय करा. ही टिक्की सॉसबरोबर सर्व करावी.

पोळीचा लाडू
साहित्य : ४/५ उरलेल्या पोळय़ा, गूळ थोडा (कमी-जास्त तुमच्या इच्छेनुसार) तूप १ छोटा चमचा, चेरी ४/५ सजावटीसाठी.
कृती : पोळय़ा मिक्सरमधून बारीक करून घ्या. त्यात गूळ, तूप घालून चांगले मिक्स करा. मग हाताने त्याचे गोळे करून लाडूचा आकार द्या. चेरी लाऊन डेकोरेट करा. लहान मुले हे आवडीने खातात.

कढी पकोडा

साहित्य: दही २ वाटी, बेसन दीड चमचा, साखर २ छोटे चमचे, मीठ चवीपुरते, पाणी थांडं. हे सर्व साहित्य रवीने घोटून एकजीव करावे. त्यात थोडे पाणी घालून पातळ करावे.
पकोडाकरिता साहित्य : बेसन ५/६ चमचे, त्यात हिंग, मीठ, हळद, साखर, तिखट सर्व एकत्र करणे व तेलात छोटे छोटे गोळे टाकून तळावे.
फोडणीचे साहित्य: कढीपत्ता ५/६ पाने, कोथिंबीर बारीक चिरलेली, जिरे, मोहरी, २/३ लाल मिरची, १ तुकडा किसलेले आले, हिंग, दीड चमचा तूप, हळद.
कृती : सर्वप्रथम कढी उकळून घ्या. (अर्थात दही बेसन, साखर, मीठ, पाणी घालून तयार केलेले) त्यात फोडणी घाला. नंतर तयार केलेले पकोडे घाला व गरमागरम भातासोबत सर्व करा. सजावटीसाठी कोथिंबीर घाला.
सुरेखा भिडे

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recipe
Show comments