हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
साहित्य
३ ते ४ चमचे तीळ
१/२ वाटी अख्खे उडीद (सालासकट)
२—३ चमचे राजमा
२ मोठे चमचे लोणी किंवा बटर
१ मोठा कांदा, बारीक चिरून किंवा किसून
२ टॉमेटो, बारीक किसून
१ चमचा भरून आलं-लसूण पेस्ट
अर्धा चमचा गरम मसाला
१/४ चमचा जिरेपूड
अधा चमचा काश्मिरी लाल तिखट (टीप)
१ चमचा कसुरी मेथी
दिड ते दोन वाटी दुध
१/२ वाटी क्रीम किंवा फेटलेली साय
कृती
उडीद आणि राजमा एकत्र करून १२ ते १४ तास भिजत ठेवावे. पाणी काढून निवडून घ्यावे. कुकरमध्ये एकदम मऊ शिजवावे.
मायक्रोवेव्ह-सेफ काचेच्या मोठय़ा भांडय़ात बटर घ्यावे. ४० सेकंद हाय पॉवरवर वितळू द्यावे. त्यात कांदा घालून ५ ते ६ मिनिटे शिजवावे. २-१-१-१ मिनिटांनी मायक्रोवेव्ह थांबवून कांदा ढवळावा. (कांदा लालसर झाला पाहिजे, त्यामुळे एखाद्दोन मिनिटे कमी किंवा जास्त लागू शकतात.)
कांदा परतला की त्यात आले-लसूण पेस्ट घालून १ मिनिट मायक्रोवेव्ह करावे. टोमॅटो प्युरी घालून ४ ते ५ मिनिटे शिजवावे. दर दीड-दोन मिनिटाला ढवळावे.
टोमॅटोचा कच्चा वास गेला की त्यात लाल तिखट, धणे-जिरेपूड, गरम मसाला आणि मीठ घालावे. मिक्स करावे. यात मऊ शिजलेला राजमा आणि उडीद घालावे. दूध घालून मिक्स करावे. दाल माखनी एकदम दाट किंवा अगदी पातळ नसावी. त्यानुसार दुधाचे प्रमाण घ्यावे.
दूध घातल्यावर मायक्रोवेव्हमध्ये उकळी काढावी. क्रीम, कसूरी मेथी, लागल्यास अजून थोडे लोणी घालून मिक्स करावे. १-२ मिनिटे उकळी काढावी. नंतर झाकण ठेवून मुरू द्यावी.
ल्ल साधा भात, जीरा राईस किंवा पुलावबरोबर दाल-माखनी सव्र्ह करावी.
टीप
काश्मिरी लाल तिखट वापरण्याऐवजी सुक्या लाल मिरच्या वापराव्यात, ज्यामुळे रंग छान येतो. सुक्या मिरच्यांमधील बिया काढून टाकाव्यात. मिरच्या गरम पाण्यात अर्धा-एक तास भिजू द्याव्यात. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटाव्यात. एक-दीड चमचा पेस्ट वापरावी.
साहित्य
२ वाटय़ा गाजराचा किस
१/२ वाटी साखर
पाऊण वाटी दूध
१ चमचा तूप
१/४ चमचा वेलचीपूड
२ ते ३ चमचे भरून खवा
तळून घेतलेले काजू, बेदाणे
कृती
मायक्रोवेव्ह-सेफ काचेच्या भांडय़ात १ चमचा तूप घालावे. ४० सेकंद मायक्रोवेव्ह करून वितळू द्यावे. त्यात गाजराचा किस घालून मिक्स करावे. झाकण ठेवून २ मिनिटे हाय पॉवरवर मायक्रोवेव्ह करावे.
दूध घालून परत २ मिनिटे झाकण ठेवून मायक्रोवेव्ह करावे. ढवळून परत १-२ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. (गाजराचा किस शिजला आणि जर दूध पूर्ण शोषले गेले नसेल तर झाकण न ठेवता १ ते २ मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये शिजवावे.)
साखर घालून २ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. चव पाहून लागल्यास गरजेनुसार थोडी साखर वाढवावी.
लहान काचेच्या बोलमध्ये खवा घेऊन २० ते ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावा. मिक्स करून गाजर हलव्यात घालावा. तसेच तळलेले काजू बेदाणे घालावेत. मिक्स करावे.
भांडय़ावर झाकण ठेवून गाजर हलवावा. साधारण मिनिटभर परत मायक्रोवेव्ह करावा. थोडा वेळ वाफ मुरू द्यावी.
साहित्य
दीड वाटी तांदूळ (शक्यतो बासमती)
२ ते अडीच वाटय़ा भाज्या (मटार, फ्लॉवर, फरसबी, गाजर)
८-१० काजू बी
२ मोठे चमचे तूप
२ वेलची, १ दालचिनी काडी, २-३ तमालपत्र, २ लवंगा, ४-५ मिरीदाणे
चवीपुरते मीठ
कृती
तांदूळ धुऊन २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावेत. भाज्या धुऊन लहान चौकोनी तुकडे करावेत (मटार सोडून.) मायक्रोवेव्ह-सेफ भांडय़ात भाज्यांचे तुकडे, थोडेसे मीठ आणि मटार घालावे. थोडेसे पाणी शिंपडावे. मायक्रोवेव्ह-सेफ झाकण ठेवून १ ते २ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे.
मायक्रोवेव्ह-सेफ काचेच्या भांडय़ात १ चमचा तूप घालावे. ४० सेकंद मायक्रोवेव्ह करून वितळू द्यावे. त्यात वेलची, दालचिनी, तमालपत्र, लवंग व मिरीदाणे घालून १ मिनिट मायक्रोवेव्ह करावे.
तांदळातील पाणी निथळून घ्यावे. लवंग, मिरीदाणे सिझल झाले की त्यात तांदूळ घालावा. तांदळाच्या अडीचपट पाणी घालावे आणि चवीपुरते मीठ घालावे. (तांदूळ नवीन असेल तर दुप्पटच पाणी घालावे.) ५ मिनिटे सलग मायक्रोवेव्ह करावे.
हलकेच चमचा फिरवून परत ४-५ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. बरेचसे पाणी आटले की तांदूळ कितपत शिजलाय ते पहावे. जर थोडा कच्चट वाटला तर अर्धे भांडे पाणी घालावे. भाज्याही घालाव्यात आणि हलके ढवळावे. झाकण ठेवून ३-४ मिनिटे शिजू द्यावे. वेळ संपली की भात ८-१० मिनिटे तसाच झाकलेला ठेवून द्यावा. वाफेवर भात शिजेल.
तयार भातावर तूप सोडावे. तळलेल्या काजू बीने वर सजावट करावी.
टीप
अजून स्वाद वाढवण्यासाठी कांदा पातळ उभा चिरावा. कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यावा. (ब्राऊनिश रंग येईस्तोवर तळावा) वरून पेरावा.
भाज्या वेगळ्या वाफवाव्यात. कारण तांदळाबरोबर गाजर पाण्यात उकळले तर पुलावचा रंग पांढरा शुभ्र राहात नाही. थोडा ऑरेंजिश होतो.
चिरलेल्या भाज्या (गाजर, बीट, फरसबी, शेवग्याच्या शेंगा, बटाटा, भोपळा, वांगी इत्यादी) मायक्रोवेव्हसेफ भांडय़ात ठेवून थोडे पाणी शिंपडावे. झाकण ठेवून वाफवल्यास ३ ते ४ मिनिटांत वाफवल्या जातात.
आदल्या दिवशीच्या इडल्या पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढाव्यात. मायक्रोवेव्हसेफ भांडय़ात ठेवून वर मायक्रोवेव्हसेफ झाकण ठेवावे. २ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. इडल्या परत मऊसूत वाफाळत्या बनतात.
चकल्या, फरसाण, शेव जर मऊ पडले असतील तर कागदावर पसरून ३० सेकंद मायक्रोवेव्ह करा. चकल्या, फरसाण पुन्हा कुरकुरीत होतील.
रवा, शेंगदाणे असे पदार्थ कढईत सतत ढवळत राहावे लागतात. काचेच्या भांडय़ात घालून मायक्रोवेव्हमध्ये ७ ते ८ मिनिटांत (दर १ ते दीड मिनिटांनी ढवळावे) भाजून होतात.
पाणी, दूध असे द्रवपदार्थ गरम करणे मायक्रोवेव्हमुळे अगदी सोपे होते. जाड काचेच्या मगमध्ये ४० सेकंदांत दूध किंवा पाणी गरम होते.
वैदेही भावे