त्याआधी जुहू चौपाटीवर मी एकदाच गेलो होतो, फुटबॉल खेळायला. अनुभव फारसा चांगला नव्हता. वाळूतून धावताना तिच्यात दडलेले पेव्हर ब्लॉक्स पायाला लागले होते. दोन्ही पाय दोन-तीन दिवस चांगलेच ठणकले होते. मग आम्ही जरा थांबलो होतो आणि गोळा खाल्ला होता. त्यानंतर पुन्हा खेळायला गेलो तर गोळ्याची तोंडात राहिलेली चव आणि खारं वातावरण यांचं काहीतरी अजीब मिश्रण होऊन मला उलटी झाली होती. आम्ही जिथे खेळत होतो तिथेच मी ओकल्याने आमच्या खेळाचा खेळखंडोबा झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच माझी जुहूला पुन्हा फेरी होईल असं वाटलं नव्हतं. पण झाली. आणि यावेळचा अनुभव कायच्या काय वेगळा होता.
ओळख फारशी नव्हती. काही दिवसांचीच. दोनदा प्रत्यक्ष भेटलो होतो, आठवडाभर व्हॉट्सअॅपवर चॅट केलं होतं, आणि नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलायचं तेवढं सगळं दोन्ही बाजूंनी बोलून झालं होतं. अचानक लहर आली आणि विचारून टाकलं, ‘मरीन ड्राइव्हला येतेस? माझ्याबरोबर?’ उत्तरादाखल डोळे मोठे करणारा स्माइली आणि त्यापाठोपाठ ‘का?’ हा प्रश्न.
‘कारण मला तुझ्याबरोबर जायचंय कुठेतरी, म्हणून.’
पंधरा मिनिटांनी रिप्लाय आला – ‘माझ्याबरोबर का?’
मी एवढा वेळ वाट पाहून तसंही वैतागलो होतो. ‘आलीये हौस, म्हणून विचारतोय. तुला कसला डाऊट वगैरे येतोय का?’
‘डाऊट? कसला?’
‘कसला ते तुलाच माहिती. येतोय ना?’
‘हो. थोडासा, तू इतक्या लवकर कसा विचारू शकतोस?’
‘मग अजून किती दिवसांनी विचारायला हवं होतं?’
ती हसली असावी. तसा इमोजी आला.
‘मरीन ड्राइव्ह नको. नुकतीच जाऊन आल्येय.’
‘मग?’
‘जुहूला जाऊया?’
काय करावं? मीसुद्धा जुहूला नुकताच जाऊन आलो होतो. आणि मरीन ड्राइव्ह ऐवजी जुहू निवडणारी मुलगी.. असो. असतो चॉईस एकेकाचा काय करणार! मी ओके म्हटलं. आणि शनिवारी सकाळी सकाळी आम्ही जुहूवर जाऊन पोचलो. मघाशी सांगितल्याप्रमाणे फोनवर सगळंच बोलून झालेलं होतं, त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पच बसून होतो. काहीच सुचत नव्हते. ती मला प्लॅटफॉर्मवरच भेटली होती. पण ट्रेनमध्ये लेडीज डब्यात चढली. त्या वेळी विशेष गर्दीसुद्धा नव्हती. म्हणून मी आधीच खट्टू झालो होतो. त्यात आता ती गप्प. काय बोलावं, काही कळेना.
नातं, नव्याने सुरू झालेलं..
तिला जुहू चौपाटीबद्दल वाटत होतं, ते मला मरीन ड्राइव्हबद्दल वाटायचं वाटतं. पण काही केल्या मरीन ड्राइव्ह आणि जुहूची तुलनाच मला खुपत होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-09-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship